Lava ने नुकतेच आपल्या आगामी Lava Storm 5G स्मार्टफोनची घोषणा अधिकृतपणे केली होती. आता अखेर कंपनीने Lava Storm 5G ची लाँच डेट कन्फर्म केली आहे. Lava चा हा 5G स्मार्टफोन याच महिन्यात सादर केला जाईल. गेल्या काही दिवसांपासून कंपनी या फोनला टीज करत होती. एवढेच नाही तर, यासाठी Amazon वर एक पेजही लाईव्ह करण्यात आले आहे.
दरम्यान, आता कंपनीने आगामी स्मार्टफोनची लाँच डेट जाहीर केली आहे. होय, Lava ने आपल्या अधिकृत X म्हणजेच ट्विटर अकाऊंट फोच्या लाँच डेटची घोषणा केली आहे. कंपनीने लाँच डेटसोबतच कंपनीने एक टीझर व्हिडिओही शेअर केला आहे.
Lava Storm 5G स्मार्टफोन भारतात 21 डिसेंबर 2023 रोजी लाँच करण्यात येईल. Lava Mobiles च्या अधिकृत X हँडलवर या टीजर व्हीडिओद्वारे आगामी स्मार्टफोनची पहिली झलक दाखवण्यात आली आहे. तसेच, पोस्टद्वारे काही स्पेसिफिकेशन्स देखील पुढे आले आहेत. स्मार्टफोनच्या टीझरनुसार हा स्मार्टफोन ग्रीन शेडसह आणला जाईल, असे लक्षात येते. स्मार्टफोन आधीच Amazon वर लिस्ट झाला आहे. म्हणजेच Amazon च्या माध्यमातून त्याची विक्री केली जाईल.
टीझरमध्ये, Lava Storm 5G फ्लॅट एज डिझाइनसह दिसत आहे. Lava चा आगामी 5G फोन ड्युअल रियर कॅमेरा सेटअपने सुसज्ज आहे. सेन्सरसोबतच मागील बाजूस LED फ्लॅशही देण्यात आला आहे. याशिवाय, फोनमध्ये साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर पॉवर बटणवर असेल.
नुकतेच कंपनीने आपल्या अधिकृत X म्हणजेच ट्विटर हॅन्डलवर आणखी एक पोस्ट ट्विट करत फोनच्या प्रोसेसरबद्दल माहिती दिली आहे. या पोस्टमध्ये आगामी Lava Storm 5G फोनमध्ये प्रोसेसिंगसाठी MediaTek Dimensity 6080 प्रोसेसर मिळेल, असे सांगण्यात आले आहे.