भारीच की! आगामी Lava O2 लवकरच भारतात होणार दाखल, जाणून घ्या फोनमध्ये काय मिळेल विशेष? 

भारीच की! आगामी Lava O2 लवकरच भारतात होणार दाखल, जाणून घ्या फोनमध्ये काय मिळेल विशेष? 
HIGHLIGHTS

Lava O2 स्मार्टफोन लवकरच भारतात लाँच होणार आहे.

Lava O2 स्मार्टफोन Amazon India च्या वेबसाइटवर लिस्ट करण्यात आला आहे.

फोन साइड-फेसिंग फिंगरप्रिंट सेन्सर आणि फेस अनलॉकसह येईल.

Lava आपला Lava O2 स्मार्टफोन लवकरच भारतात लाँच करणार आहे. कंपनीने Lava O2 स्मार्टफोनच्या भारतीय लॉन्चची घोषणा केली आहे. मात्र, आगामी फोनची लाँच डेट अद्याप समोर आलेली नाही. हा फोन लवकरच भारतीय स्मार्टफोन मार्केटमध्ये लॉन्च केला जाऊ शकतो, कंपनीने निश्चितपणे सांगितले आहे. या फोनचे स्पेक्स देखील ऑनलाईन समोर आले आहेत. बघुयात आगामी फोनमध्ये काय मिळेल विशेष-

हे सुद्धा वाचा: WhatsApp वापरकर्त्यांसाठी नवीन फीचर लवकरच Important होणार सादर, सहज करता येईल ऑनलाइन पेमेंट। Tech News

Lava O2 लॉन्चिंग डिटेल्स

Lava कंपनीने आपल्या अधिकृत X म्हणजेच ट्विटरवर आगामी Lava O2 फोनचा टीजर रिलीज केला आहे . या आगामी फोनचे लाँच टीज करण्यात आले आहे. या टीझरमध्ये तुम्हाला आगामी फोनची डिझाईन दिसत आहे. Lava O2 समर फोनमध्ये वरच्या डाव्या कोपऱ्यात ड्युअल कॅमेरा सेटअप देखील असणार आहे. तर, फोनच्या तळाशी डाव्या कोपऱ्यात लावा लोगो दिसत आहे.

त्याबरोबरच, फोनमध्ये तुम्हाला बॉटमला स्पीकर ग्रिल मिळणार आहेत. तुमच्या फोनसाठी चार्जिंग पोर्ट देखील येथे मिळेल. तसेच, तुम्हाला फोनच्या उजव्या बाजूला पॉवर आणि व्हॉल्यूम रॉकर बटन्स मिळतील. तुम्ही बघू शकता की, Lava O2 ग्रीन कलर मध्ये भारतात लाँच केला जाऊ शकतो.

Lava O2 Amazon लिस्टिंग

lava o2
#Lava O2

Lava O2 स्मार्टफोन Amazon India च्या वेबसाइटवर लिस्ट करण्यात आला आहे. याद्वारे फोनचे काही स्पेक्स समोर येत आहेत. जर आपण Amazon Listing बद्दल बोललो तर त्यानुसार, Unisoc T616 Octa-core प्रोसेसर Lava O2 स्मार्टफोन मध्ये उपलब्ध होणार आहे. याशिवाय, या फोनमध्ये 128GB स्टोरेजसह 8GB रॅम व्यतिरिक्त, 8GB व्हर्चुअल रॅम देखील असेल.

याव्यतिरिक्त, फोनमध्ये 18W चार्जिंग सह 5000mAh ची बॅटरी असणार आहे. हा फोन साइड-फेसिंग फिंगरप्रिंट सेन्सर आणि फेस अनलॉकसह येईल, त्यात AG ग्लास बॅक असणार आहे. फोनमध्ये वाय-फाय, ब्लूटूथ, यूएसबी कनेक्टिव्हिटी, जीपीएस आणि 3.5 मिमी ऑडिओ जॅक देखील असेल. मात्र, फोनचे सर्व कन्फर्म फीचर्स फोन लाँच झाल्यावरच पुढे येतील.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo