आगामी Lava Blaze X स्मार्टफोनचा टीजर जाहीर! Powerful फीचर्ससह लवकरच भारतात होणार दाखल
Lava Blaze सिरीजअंतर्गत Lava Blaze X हा नवा मोबाईल लवकरच लाँच केला जाईल.
Lava ब्रँडने आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर ही माहिती दिली आहे.
प्रसिद्ध इ-कॉमर्स साईट Amazon वर एक मायक्रोसाईट देखील लाईव्ह
Lava Blaze X: भारतीय स्मार्टफोन निर्माता Lava ने नुकतेच आपल्या Blaze सिरीजचा भारतीय बाजारपेठेत विस्तार करण्याची घोषणा केली आहे. या सिरीजअंतर्गत Lava Blaze X हा नवा मोबाईल लवकरच लाँच केला जाणार आहे. हा टीझर ब्रँडने आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आणि ई-कॉमर्स साइट Amazon वर शेअर केला आहे. Lava Blaze X असू शकते. चला तर मग बघुयात आगामी स्मार्टफोनचे टीजर आणि सविस्तर माहिती-
Also Read: Jio, Airtel नंतर आता VI ने देखील वाढवली युजर्सची चिंता! सर्व प्लॅन्सच्या किमतीत संपूर्ण 20% वाढ
Lava Blaze X टीजर
Lava Mobiles ने अधिकृत X म्हणजेच Twitter हॅन्डलवर आणि Amazon वर एक पोस्ट शेअर करत आगामी Lava Blaze X चा टीझर जाहीर केला आहे. या टीजरमध्ये डिवाइस Coming Soon सह टीज करण्यात आले आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, हा स्मार्टफोन पुढील महिन्यात भारतात लाँच केला जाईल, अशी शक्यता वर्तवली जात आहे.
वरील पोस्टनुसार, Lava Blaze X चे पॉवर आणि व्हॉल्यूम रॉकर्स उजव्या बाजूला दिसत आहेत. Lava Blaze X बद्दल आतापर्यंत मिळालेली ही अधिकृत माहिती आहे, परंतु येत्या काही दिवसात अधिक तपशील पुढे येतील.
एवढेच नाही तर, प्रसिद्ध इ-कॉमर्स साईट Amazon वर एक मायक्रोसाईट देखील लाईव्ह करण्यात आली आहे. त्यावरून समजते की, नवीन LAVA स्मार्टफोनमध्ये मागील बाजूस सर्क्युलर कॅमेरा मॉड्यूल असेल. याशिवाय, डिव्हाइसच्या शीर्षस्थानी सेकंडरी मायक्रोफोन प्लेसमेंट देखील मिळू शकते.
Lava Blaze Curve 5G
तुमच्या माहितीसाठी सांगतो की, Lava Blaze Curve 5G या सिरीजमध्ये मार्च महिन्यातच लाँच करण्यात आला आहे. फोनच्या स्पेक्सबद्दल बोलायचे झाल्यास, यामध्ये 6.67 इंच लांबीचा कर्व AMOLED डिस्प्ले प्रदान करण्यात आला होता, तो 120Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी, हा फोन Mediatek Dimensity 7050 चिपसेटद्वारे सुसज्ज आहे. डिव्हाइसमध्ये 8GB RAM + 256 GB स्टोरेज आहे. फोटोग्राफीसाठी, या डिव्हाइसमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आहे, ज्यामध्ये 64MP प्रायमरी कॅमेरा उपलब्ध आहे. तर, सेल्फीसाठी या फोनमध्ये 32MP लेन्स मिळेल. बॅटरीबाबत बोलायचे झाल्यास, या फोनमध्ये मोठी 5000mAh बॅटरी आणि 33W जलद चार्जिंग आहे.
Reshma Zalke
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile