देशी स्मार्टफोन निर्माता Lava ने अलिडकेच नवीनतम Lava Blaze X स्मार्टफोनच्या लाँचची घोषणा केली होती. मात्र, अखेर आता कंपनीने Lava Blaze X फोनच्या भारतीय लाँच डेटची पुष्टी केली आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, हा कंपनीचा नवीन बजेट स्मार्टफोन असेल. कंपनीने लाँच डेट सोबत एक टीझर व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये फोनचा फर्स्ट लूक बघायला मिळेल. एवढेच नाही तर, या टीझर Video द्वारे फोनचे अनेक फीचर्सही समोर आले आहेत. जाणून घेउयात Lava Blaze X स्मार्टफोनचे लॉन्चिंग डिटेल्स-
Lava Mobiles ने त्यांच्या अधिकृत Twitter (X) हँडलवर Lava Blaze X स्मार्टफोनच्या भारतीय लाँच डेटची पुष्टी केली आहे. हा फोन भारतात 10 जुलै रोजी दुपारी 12 वाजता लाँच केला जाणार आहे. वर सांगितल्याप्रमाणे, कंपनीने या पोस्टमध्ये फोनचा एक टीझर व्हिडिओ देखील जारी केला आहे. या व्हीडिओमध्ये फोनचा फर्स्ट लूक, काही फीचर्स आणि कलर ऑप्शन्स रिव्हिल केले गेले आहेत.
वरील पोस्टनुसार फोनच्या डिझाईनबद्दल बोलायचे झाल्यास, फोनच्या मागील बाजूस एक सर्क्युलर कॅमेरा मॉड्यूल आहे. तर, फोनच्या बॉटमला LAVA ब्रँडिंग दिसत आहे. तर, फोनच्या पुढील बाजूस सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी डिस्प्लेमध्ये पंच-होल कटआउट प्रदान केला जाईल. याशिवाय, फोनच्या उजव्या काठावर व्हॉल्यूम रॉकर आणि पॉवर बटण दिसत आहे.
एवढेच नाही तर, टिझर व्हिडिओमध्ये फोन दोन कलर ऑप्शनमध्ये दिसतोय. ज्यापैकी एक व्हाईट आणि दुसरा ब्लु आहे. Lava Blaze X स्मार्टफोन प्रसिद्ध इ-कॉमर्स साईट Amazon वर व्रिक्रीसाठी उपलब्ध करून दिला जाईल.
Lava Blaze X मध्ये फोटोग्राफीसाठी फोनमध्ये 64MP प्राथमिक कॅमेरा असेल. यासोबतच, LED फ्लॅशला स्थान देखील दिले जाईल. त्याबरोबरच, फोनमध्ये 8GB रॅम आणि 8GB व्हर्च्युअल रॅमचा पर्याय असेल. तर, फोनमध्ये 4GB आणि 6GB रॅमचे व्हेरियंट देखील असतील. हे सर्व या स्मार्टफोनचे कन्फर्म फीचर्स आहेत. इतर सर्व तपशील हा फोन लाँच झाल्यावर पुढे येतील.