देशी कंपनीच्या आगामी Lava Blaze Duo ची लाँच डेट Confirm! सामान्य फोनमध्ये मिळतील 2 डिस्प्ले
Lava ने अलीकडेच ड्युअल डिस्प्लेसह येणारा पहिला स्मार्टफोन Lava Agni 3 लाँच केला होता.
कंपनीने आगामी Lava Blaze Duo स्मार्टफोनच्या भारतीय लाँच डेटची पुष्टी केली.
हा फोन भारतात पुढील आठवड्यात म्हणजेच येत्या 16 डिसेंबर 2024 रोजी लाँच केला जाईल.
देशी स्मार्टफोन निर्माता Lava एकामागे एक अप्रतिम स्मार्टफोन्स बाजारात सादर करत आहे. कंपनीने अलीकडेच आपला ड्युअल डिस्प्लेसह येणारा पहिला स्मार्टफोन Lava Agni 3 लाँच केला होता. आता कंपनी या विशेषतेसह दुसरा स्मार्टफोनदेखील सादर करणार आहे. दरम्यान, आता कंपनीने आगामी Lava Blaze Duo स्मार्टफोनच्या भारतीय लाँच डेटची पुष्टी केली आहे. तसेच, या फोनसाठी डेडिकेटेड मायक्रोसाइट देखील Amazon वर लाईव्ह झाली आहे. या साइटच्या माध्यमातून आगामी फोनची लॉन्चिंग डेट आणि अनेक प्रमुख फीचर्स उघड झाले आहेत. जाणून घेऊयात Lava Blaze Duo चे लॉन्चिंग डिटेल्स-
Also Read: 10,000 रुपयांअंतर्गत मिळतायेत 32 इंचचे Smart TV, मोठ्या Discount ऑफर्ससुद्धा उपलब्ध
Lava Blaze Duo ची लाँच डेट
Brace yourself to experience the DUO Life!
— Lava Mobiles (@LavaMobile) December 8, 2024
Coming soon.#LavaMobiles #ProudlyIndian pic.twitter.com/hjzziDKxPP
वर सांगितल्याप्रमाणे, भारतीय स्मार्टफोन निर्माता Lava कंपनीने Lava Blaze Duo फोनसाठी डेडिकेटेड मायक्रोसाइट Amazon वर लाईव्ह केली आहे. तसेच, Amazon लिस्टिंगद्वारे फोनच्या लाँच डेटची देखील पुष्टी करण्यात आली आहे. हा फोन भारतात पुढील आठवड्यात म्हणजेच येत्या 16 डिसेंबर 2024 रोजी लाँच केला जाईल. याशिवाय, लावाचा हा स्मार्टफोन सेलेस्टियल ब्लू आणि आर्क्टिक व्हाईट या दोन कलर ऑप्शन्ससह उपलब्ध आहे.
Lava Blaze Duo चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स
वर सांगितल्याप्रमाणे, Amazon लिस्टिंगद्वारे या फोनचे डिझाइन आणि अनेक फीचर्स समोर आले आहेत. त्यानुसार, Lava Blaze Duo फोन 6.67 इंच लांबीच्या 3D AMOLED डिस्प्लेसह दाखल होईल, ज्याचा रिफ्रेश रेट 120Hz इतका असेल. विशेष म्हणजे फोनच्या मागील बाजूस देखील सेकंडरी डिस्प्ले मिळणार आहे. सेकंडरी डिस्प्लेसह तुम्ही नोटिफिकेशन्स, कॉल्स, सेल्फी घेण्यासदेखील सक्षम असाल. हा डिस्प्ले 1.58 इंच लांबीचा असणार आहे. चांगल्या परफॉर्मन्ससाठी, हा फोन MediaTek Dimensity 7025 प्रोसेसरद्वारे सुसज्ज असेल. फोनच्या मागील बाजूस प्रीमियम मॅट फिनिश असेल.
स्टोरेज सेक्शनबद्दल बोलायचे झाल्यास, फोनमध्ये 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज मिळेल, या फोनचे स्टोरेज वाढवता येते. तसेच, हा फोन Android 14 वर कार्य करेल. याव्यतिरिक्त, फोटोग्राफीसाठी या फोनमध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप असेल. या सेटअपमध्ये 64MP Sony प्राथमिक कॅमेरा प्रदान केला जाईल. त्याबरोबरच, आकर्षक सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी या फोनमध्ये 16MP फ्रंट कॅमेरा मिळणार आहे. पॉवर बॅकअपसाठी, या फोनची बॅटरी 5000mAh असेल, जी 33W फास्ट चार्जिंग सपोर्टसह मिळेल.
Reshma Zalke
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile