देशी कंपनीच्या आगमी Lava Blaze 3 5G स्मार्टफोनच्या भारतीय लाँचची पुष्टी! टीझर Video मध्ये दिसली पहिली झलक 

देशी कंपनीच्या आगमी Lava Blaze 3 5G स्मार्टफोनच्या भारतीय लाँचची पुष्टी! टीझर Video मध्ये दिसली पहिली झलक 
HIGHLIGHTS

Lava कंपनी आपल्या लोकप्रिय Blaze सिरीजचा विस्तार करण्यास सज्ज

आगामी स्मार्टफोन Lava Blaze 3 5G च्या लाँचची पुष्टी करण्यात आली आहे.

कंपनीने सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर Lava Blaze 3 5G बद्दल नवीन टीझर व्हिडिओ जारी केला.

देशी स्मार्टफोन निर्माता Lava आपल्या लोकप्रिय Blaze सिरीजचा विस्तार करण्यास सज्ज झाली आहे. कंपनी गेल्या काही दिवसांपासून आपल्या ब्लेझ सिरीजच्या आगामी स्मार्टफोनला टीज करत आहे. अखेर कंपनीने आगामी डिव्हाइस Lava Blaze 3 5G फोनच्या लाँचची पुष्टी केली आहे. कंपनीने सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक नवीन टीझर व्हिडिओ जारी करून याची पुष्टी केली आहे. चला तर मग जास्त वेळ न घालवता जाणून घेऊयात Lava Blaze 3 5G चे भारतीय लॉन्चिंग डिटेल्स-

Lava Blaze 3 5G चे भारतीय लाँच

आगामी स्मार्टफोन Lava Blaze 3 5G च्या लाँचची पुष्टी Lava कंपनीच्या अधिकृत हँडलवरून सोशल मीडिया साइट X म्हणजेच Twitter द्वारे करण्यात आली आहे. ब्रँडने सध्या हा फोन Coming Soon सह टीज केला आहे. परंतु, हा फोन या महिन्यातच लाँच होणार, अशी अपेक्षा आहे. तुम्ही टीझर व्हिडिओमध्ये पाहू शकता की, डिव्हाइसमध्ये आधीच अपग्रेड केलेला कॅमेरा मॉड्यूल आहे.

वरील पोस्टमधील व्हीडिओमध्ये कंपनी Lava Blaze 3 5G च्या कॅमेरा मॉड्यूल जवळ एक नवीन Vibe Light LED फ्लॅश आणत आहे, हे स्पष्ट होते. म्हणजेच यासह नाईट फोटोग्राफीचा उत्तम अनुभव मिळेल. Lava Blaze 3 5G फोनच्या लाँचची तारीख आणि इतर तपशील येत्या काही दिवसांत उघड होतील.

Lava Blaze Curve 5G चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

कंपनीने अलीकडेच ब्लेझ सिरीजमध्ये Lava Blaze Curve 5G स्मार्टफोन लाँच केला आहे. या फोनमध्ये 120Hz रिफ्रेश रेटसह 6.67-इंच लांबीचा FHD+ AMOLED 3D कर्व डिस्प्ले मिळणार आहे. स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी, या स्मार्टफोनमध्ये MediaTek Dimensity 7050 चिपसेट उपलब्ध आहे. स्टोरेज सेक्शनबद्दल बोलायचे झाल्यास, 8GB RAM + 256GB पर्यंत अंतर्गत स्टोरेजसह येईल.

lava Blaze Curve 5G Specification
Lava Blaze Curve 5G

फोटोग्राफीसाठी, या स्मार्टफोनमध्ये EIS आणि 20X ऑप्टिकल झूमसह 64MP प्रायमरी कॅमेरा देण्यात आला आहे. त्याबरोबरच, यात 8MP वाइड-एंगल कॅमेरा आणि मागील पॅनलवर 2MP मॅक्रो कॅमेरा लेन्स मिळणार आहे. आकर्षक सेल्फी आणि व्हीडिओ कॉलिंगसाठी फोनमध्ये 32MP फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. बॅटरीबद्दल बोलायचे झाल्यास, या स्मार्टफोनमध्ये 33W फास्ट चार्जिंग सपोर्टसह मोठी 5,000mAh बॅटरी आहे.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo