Lava Agni 3 Launch: देशी कंपनीच्या आगामी स्मार्टफोनची लाँच डेट जाहीर, मिळणार आकर्षक फीचर्स 

Lava Agni 3 Launch: देशी कंपनीच्या आगामी स्मार्टफोनची लाँच डेट जाहीर, मिळणार आकर्षक फीचर्स 
HIGHLIGHTS

Lava च्या आगामी स्मार्टफोन Lava Agni 3 स्मार्टफोनची लाँच डेट निश्चित

Lava Agni 3 फोन गेल्या वर्षी लाँच झालेल्या Lava Agni 2 ची अपग्रेडेड आवृत्ती असेल.

Lava Agni 3 कंपनीचा नवीनतम मिड-रेंज स्मार्टफोन असेल.

Lava Agni 3: देशी कंपनीचा Lava चा आगामी स्मार्टफोन Lava Agni 3 स्मार्टफोनची लाँच डेट निश्चित करण्यात आली आहे. कंपनी अनेक दिवसांपासून आगामी फोनला टीज करत आहे. आता अखेर फोनची लाँच तारीख निश्चित झाली आहे. हा फोन पुढील आठवड्यात भारतीय बाजारात दाखल होणार आहे. हा फोन गेल्या वर्षी लाँच झालेल्या Lava Agni 2 ची अपग्रेडेड आवृत्ती असेल. तुमच्या माहितीसाठी सांगतो की, Lava Agni 2 कंपनीचा बेस्ट सेलर स्मार्टफोन आहे. जाणून घेऊयात Lava Agni 3 फोनचे लॉन्चिंग डिटेल्स-

Also Read: नव्या रंगरूपात लाँच झाला नवा Vivo X Fold3 Pro स्मार्टफोन, जाणून घ्या किंमत आणि आकर्षक ऑफर्स

Lava Agni 3 ची भारतीय लाँच डेट

वर सांगितल्याप्रमाणे, Lava कंपनीने Lava Agni 3 फोनच्या लाँच डेटची पुष्टी करण्यात आली आहे. हा स्मार्टफोन भारतात 4 ऑक्टोबर रोजी लाँच केला जाणार आहे. हा कंपनीचा नवीनतम मिड-रेंज स्मार्टफोन असेल, ज्यामध्ये अनेक उत्कृष्ट फीचर्स मिळणार आहेत.

कंपनीने आपल्या अधिकृत X म्हणजेच आधीच्या ट्विटर अकाउंटवर Lava Agni 3 फोनच्या संदर्भात एक टीझर पोस्टर शेअर केला आहे. या पोस्टरमध्ये फोनचा बॅक पॅनल दिसत आहे. विशेषतः या फोनचा बॅक पॅनल पाहता कंपनी या फोनच्या मागील बाजूस वेगळा डिस्प्ले देऊ शकते, अशी शक्यता आहे.

Lava Agni 2 चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

मागील Lava Agni 2 या नवीन फोनमध्ये 6.78-इंच लांबीचा फुल HD+ कर्व AMOLED डिस्प्ले आहे, जो 120 Hz रिफ्रेश रेटसह येतो. हा डिस्प्ले HDR, HDR10 आणि HDR10+ आणि Widevine L1 ला सपोर्ट करतो. Lava Agni 2 5G स्मार्टफोन MediaTek Dimensity 7050 सह सुसज्ज आहे. फोनमध्ये 8GB रॅमचा सपोर्ट आहे. RAM अक्षरशः 16GB पर्यंत वाढवता येईल, या फोनमध्ये 256GB पर्यंत स्टोरेज उपलब्ध आहे.

Lava Agni 2 5G

फोटोग्राफीसाठी Lava Agni 2 फोनच्या कॅमेरा सेटअपबद्दल बोलायचे झाल्यास, यात तुम्हाला तब्बल चार रियर कॅमेऱ्यांचा सपोर्ट मिळणार आहे. या फोनमधील प्रायमरी कॅमेरा 50MP चा आहे. पॉवर बॅकअपसाठी, या फोनमध्ये 4700 mAh बॅटरी आहे, जी 66W फास्ट चार्जिंगसाठी सपोर्ट आहे. हा फोन Android 13.0 सह कार्य करेल. कंपनी यात तीन वर्षांचे सिक्युरिटी अपडेट्स आणि दोन वर्षांचे अँड्रॉइड अपडेट्स देते.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo