नवा Lava Agni 3 मार्केटमध्ये धुमाकूळ घालण्यासाठी सज्ज, पहा आगामी फोनचा टिझर Video

नवा Lava Agni 3 मार्केटमध्ये धुमाकूळ घालण्यासाठी सज्ज, पहा आगामी फोनचा टिझर Video
HIGHLIGHTS

Lava Agni 3 स्मार्टफोन भारतात 4 ऑक्टोबर रोजी लाँच होणार आहे.

Lava ने टीझर व्हिडिओद्वारे Lava Agni 3 चा फर्स्ट लुक उघड केला आहे.

Lava Agni 3 फोन विशेषतः दोन डिस्प्लेसह बाजारात दाखल होणार

सध्या देशी स्मार्टफोन कंपनी Lava च्या Lava Agni 3 स्मार्टफोनच्या लाँचची चर्चा सुरु आहे. कंपनीने अलीकडेच या फोनच्या लाँच डेटची पुष्टी देखील केली आहे. त्यानंतर, आज कंपनीने एका टीझर व्हिडिओद्वारे फोनचा फर्स्ट लुक उघड केला आहे. देशी कंपनी स्मार्टफोन इंडस्ट्रीत मोठा धमाल करणार आहे, हे फोनचा फर्स्ट लूक पाहूनच लक्षात येईल. विशेष म्हणजे हा फोन दोन डिस्प्लेसह येतो. मात्र, हा फ्लिप किंवा फोल्ड नसून एक सामान्य फोन असेल. पाहुयात Lava Agni 3 चा फर्स्ट लुक-

Also Read: Price Cut! लेटेस्ट Oppo F27 5G फोनच्या किमतीत 2000 रुपयांची कपात, जाणून घ्या नवी किंमत

Lava Agni 3 चे फर्स्ट लुक

कंपनीने जाहीर केल्याप्रमाणे, Lava Agni 3 स्मार्टफोन भारतात 4 ऑक्टोबर रोजी लाँच होणार आहे. आगामी फोन लाँच होण्यापूर्वी कंपनीने फोनशी संबंधित तपशील देखील उघड करण्यास सुरुवात केली आहे. Lava Mobiles ने त्यांच्या अधिकृत X म्हणजेच आधीच्या ट्विटर हँडलवर Lava Agni 3 चा टीझर व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये फोनची पहिली झलक दाखवण्यात आली आहे. त्याबरोबरच, अलीकडेच फोनचे अनेक फिचर्स समोर आले आहेत.

एवढेच नाही तर, कंपनीने फोन लाँच होण्यापूर्वी त्याची किंमत देखील उघड केली आहे. हा फोन 30,000 रुपयांपेक्षा कमी किमतीत सादर केला जाईल. हा एक मिड बजेट स्मार्टफोन असला तरी, या फोनमध्ये तुम्हाला अनेक आकर्षक आणि वेगळे फीचर्स मिळणार आहेत.

Lava Agni 3
Lava Agni 3

Lava Agni 3 अपेक्षित फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

वर सांगितल्याप्रमाणे, Lava चा आगामी फोन Lava Agni 3 फोन 2 डिस्प्लेसह दाखल होईल. त्यापैकी एक फ्रंट डिस्प्ले आणि दुसरा कव्हर डिस्प्ले असणार आहे. हा कोणताही फोल्डेबल स्मार्टफोन नसून एक सामान्य स्मार्टफोन आहे. Lava Agni 3 फोनचे डिस्प्ले फीचर्स समोर आले आहेत. फोनमध्ये 1.5K कर्व AMOLED डिस्प्ले असेल, ज्याचा रीफ्रेश दर 120Hz असेल. तसेच, फोनच्या मागील बाजूस 1.74 इंच लांबीचा AMOLED कव्हर डिस्प्ले दिला जाईल. या फोनची विक्री प्रसिद्ध इ-कॉमर्स साईट Amazon वरून होणार आहे.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo