108MP कॅमेरासह itel S24 स्मार्टफोन भारतात लवकरच होणार लाँच, किंमत असेल 10,000 रुपयांपेक्षा कमी। Tech News 

 108MP कॅमेरासह itel S24 स्मार्टफोन भारतात लवकरच होणार लाँच, किंमत असेल 10,000 रुपयांपेक्षा कमी। Tech News 
HIGHLIGHTS

आगामी Itel S24 स्मार्टफोनची भारतील लाँच डेट निश्चित

फोनसोबत कंपनी itel T11 Pro TWS पण सादर करणार आहे.

हा फोन खरेदी करणाऱ्या 500 ग्राहकांना iTel आयकॉन स्मार्टवॉच मोफत मिळणार आहे.

प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता Itel चा आगामी स्मार्टफोन लवकरच भारतात लाँच केला जाणार आहे. होय, आगामी Itel S24 स्मार्टफोनची भारतील लाँच डेट निश्चित झाली आहे. या फोनसोबत कंपनी itel T11 Pro TWS पण सादर करणार आहे. तुम्ही हे दोन्ही उपकरण भारतात Amazon द्वारे खरेदी करू शकता. लॉन्च करण्यापूर्वी कंपनीने फोनच्या किंमत श्रेणी आणि स्पेसिफिकेशनशी संबंधित तपशील देखील उघड केला आहे. हा फोन 10 हजार रुपयांपेक्षा कमी किमतीत सादर केला जाईल. चला तर मग जास्त वेळ न घालवता बघुयात itel S24 चे सर्व तपशील-

itel S24 ची भारतीय लाँच डेट

Itel S24 स्मार्टफोनसाठी समर्पित मायक्रोसाइट Amazon India वर लाईव्ह झाली आहे. आता कंपनीने या साइटद्वारे फोनच्या लाँच डेटची देखील पुष्टी केली आहे. हा फोन 23 एप्रिलला म्हणजेच उद्या भारतात लाँच होणार आहे. यासोबतच कंपनीने फोन बजेट विभागात सादर केला जाईल, हे देखील उघड झाले आहे. या स्मार्टफोनची किंमत 10,000 रुपयांपेक्षा कमी असण्याची शक्यता आहे.

या फोनची किंमत Amazon वर XX99 सह लिस्ट करण्यात आली आहे. Amazon सूचीसोबतच फोनवर उपलब्ध असलेल्या ऑफर्सची माहितीही समोर आली आहे. एवढेच नाही तर, हा फोन खरेदी करणाऱ्या 500 ग्राहकांना iTel आयकॉन स्मार्टवॉच मोफत मिळणार आहे.

itel S24 Amazon लिस्टिंग

Amazon लिस्टिंगच्या माध्यमातून फोनचे अनेक फीचर्स देखील समोर आले आहेत. त्यानुसार, कलर चेंजिंग बॅक पॅनल itel S24 फोनमध्ये उपलब्ध असेल. या फोनमध्ये 6.6 इंच लांबीचा डिस्प्ले 90Hz रिफ्रेश रेटसह येईल. फोनमध्ये सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी पंच-होल कटआउट असेल. याशिवाय, हा फोन MediaTek Helio G91 प्रोसेसरने सुसज्ज असेल.

itel S24 launch date in India
itel S24 launch date in India

फोटोग्राफीसाठी फोनमध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप दिला जाईल. यात 108MP प्रायमरी कॅमेरा असेल. इतर सेन्सरची माहिती अद्याप समोर आलेली नाही. फोनची बॅटरी 5000mAh असेल, ज्यामध्ये 18W फास्ट चार्जिंग सपोर्ट असेल. चार्जिंगसाठी फोनमध्ये USB टाईप-C पोर्ट दिला जाईल. इतर फीचर्सबद्दल बोलायचे झाल्यास, यात ऑडिओसाठी ड्युअल-स्पीकर सेटअप असेल, ज्यामध्ये DTS ऑडिओ सपोर्ट असेल.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo