बजेट स्मार्टफोन्स देण्यासाठी प्रसिद्ध असलेली स्मार्टफोन कंपनी Itel च्या Itel A80 स्मार्टफोनच्या भारतीय लाँचची पुष्टी करण्यात आली आहे. हा कंपनीचा नवीनतम एंट्री-लेव्हल स्मार्टफोन असेल. कंपनीने अधिकृतपणे आपल्या वेबसाइटवर हा स्मार्टफोन टीज करण्यास सुरुवात केली आहे. एवढेच नाही तर, टीझर पोस्टरच्या माध्यमातून लाँचपूर्वी फोनच्या डिझाईनचाही खुलासा करण्यात आला आहे. चला तर मग जास्त वेळ न घालवता जाणून घेऊयात itel A80 फोनचे भारतीय लॉंचिंग डिटेल्स-
Also Read: AI फीचर्सने सज्ज Redmi 14 Pro+ 5G स्मार्टफोनवर भारी Discount, मिळतेय तब्बल 5000 रुपयांची सूट
प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता itel India ने अधिकृतपणे त्याच्या अधिकृत वेबसाईटवर itel A80 स्मार्टफोन टीज करण्यास सुरुवात केली आहे. यामुळे हा फोन लवकरच भारतीय बाजारात लाँच होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. सध्या, कंपनीने फोनच्या लाँच डेट कन्फर्म केलेली नाही. फोनचे टीझर पोस्टर iTel वेबसाइटवर समोर आले आहे, ज्यामध्ये फोनचे बॅक पॅनल डिझाइन देखील दिसत आहे.
itel A80 फोन जागतिक बाजारपेठेत आधीच दाखल झाला आहे. त्यामुळे, या फोनचे फीचर्स आधीच समोर आले आहेत. त्यानुसार, स्पेक्सबद्दल बोलायचे झाल्यास हा फोन 6.7 इंच लांबीच्या डिस्प्लेसह येतो, ज्याचा रिफ्रेश रेट 120Hz इतका आहे. डिस्प्लेमध्ये सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंग कॅमेरासाठी पंच-होल कटआउट आहे. हे फीचर्स ग्लोबल व्हेरियंटमध्ये उपलब्ध आहेत. मात्र, भारतीय व्हेरियंट जागतिक मॉडेलपेक्षा किती वेगळे असेल हे लॉन्चच्या वेळीच स्पष्ट होईल.
याव्यतिरिक्त, फोटोग्राफीसाठी या फोनमध्ये 50MP चा बॅक कॅमेरा असेल. त्याबरोबरच, आकर्षक सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 8MP फ्रंट कॅमेरा दिला जाऊ शकतो. बॅटरीबद्दल बोलायचे जलायस, या फोनमध्ये 5000mAh बॅटरी देण्यात आली आहे. वॉटर प्रोटेक्शनसाठी या फोनला IP54 रेटिंग देण्यात आली आहे. तसेच, चार्जिंगसाठी फोनमध्ये टाइप-C सपोर्ट उपलब्ध देखील आहे. सध्या कंपनीने या फोनच्या भारतातील लाँच तारखेची पुष्टी केलेली नाही. मात्र, लवकरच लॉन्चची तारीख देखील निश्चित केली जाऊ शकते.