iQOO Z9x 5G लवकरच भारतीय बाजारात लाँच होणार आहे. या आगामी फोनबाबत सोशल मीडियावर अनेक चर्चा सुरु आहेत. मात्र, आता कंपनीने या फोनची लाँच डेट जाहीर केली आहे. हा स्मार्टफोन ई-कॉमर्स वेबसाइट Amazon वर लिस्ट करण्यात आला आहे. एवढेच नाही तर, कंपनीने आगामी फोनचा पहिला टीझरही जारी केला आहे. टीझरसोबतच या आगामी स्मार्टफोनची लाँच डेटही समोर आली आहे. चला तर मग जास्त वेळ न घालवता स्मार्टफोनची लाँच डेट आणि सर्व तपशील जाणून घेऊयात.
हे सुद्धा वाचा: Jio Plans Under Rs.200: कमीत कमी किमतीत कंपनीचे Best प्लॅन्स, मिळेल भरपूर डेटा आणि Unlimited कॉलिंग
iQOO चा हा स्मार्टफोन भारतीय बाजारात याच महिन्यात लाँच केला जाईल. या फोनची विक्री लोकप्रिय ई-कॉमर्स वेबसाइट Amazon च्या माध्यमातून केली जाणार आहे. त्याबरोबरच, iQOO Z9x 5G स्मार्टफोन लाँच करण्यासाठी मायक्रो वेबसाईट Amazon वर लाईव्ह करण्यात आली आहे. हा स्मार्टफोन 16 मे 2024 रोजी भारतात लाँच केला जाणार आहे. हा iQOO Z सीरीजचा सर्वात स्वस्त स्मार्टफोन असेल अशी अपेक्षा आहे.
Amazon वरील मायक्रो वेबसाइटनुसार, स्मार्टफोन स्क्वेअर कॅमेरा मॉड्यूलसह येईल. कंपनीने शेअर केलेल्या टीझरमध्ये स्मार्टफोन ग्रीन कलरमध्ये दाखवला आहे. हा फोन साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सरसह येईल. तर, iQOO चे ब्रँडिंग फोनच्या मागील बाजूस करण्यात आले आहे, याबाबत पुष्टी करण्यात आली आहे.
टीझरमध्ये दाखवलेला फोन iQOO Z9x 5G च्या चायनीज व्हेरिएंटसारखा दिसतो. डिझाइन व्यतिरिक्त, आगामी स्मार्टफोनची फीचर्स देखील चायनीज व्हेरिएंटसारखी असतील, अशी अपेक्षा आहे.
iQOO Z9x 5G स्मार्टफोनच्या चायनीज व्हेरिएंटमध्ये 6.72 इंच लांबीचा LCD डिस्प्ले आहे, ज्याचा रिफ्रेश रेट 120Hz आहे. स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी, या फोनमध्ये Qualcomm Snapdragon 6 Gen 1 SoC प्रोसेसर देण्यात आला आहे. फोटोग्राफीसाठी, फोनमध्ये 50MP मुख्य कॅमेरा आणि 2MP ब्लर लेन्स आहे. तर, फोनच्या समोर 8MP कॅमेरा देण्यात आला आहे. या फोनमध्ये 6000mAh बॅटरी मिळेल, जी 44W FlashCharge फास्ट चार्जिंगला सपोर्ट करेल.