अरे व्वा! iQOO Z9 Lite 5G ची भारतीय लाँच डेट कन्फर्म, सर्वांच्या बजेटमध्ये असेल किंमत? 

अरे व्वा! iQOO Z9 Lite 5G ची भारतीय लाँच डेट कन्फर्म, सर्वांच्या बजेटमध्ये असेल किंमत? 
HIGHLIGHTS

iQOO Z9 Lite 5G स्मार्टफोनची भारतीय लाँच डेट कन्फर्म

iQOO Z9 Lite 5G स्मार्टफोनसाठी डेडिकेटेड मायक्रोसाइट Amazon वर लाइव्ह

iQOO Z9 Lite 5G कंपनीचा नवीनतम बजेट 5G स्मार्टफोन आहे.

लोकप्रिय स्मार्टफोन निर्माता iQOO Z9 Lite 5G स्मार्टफोनची भारतीय लाँच डेट कन्फर्म झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हा कंपनीचा नवीनतम बजेट 5G स्मार्टफोन आहे. आगामी स्मार्टफोनच्या भारतीय लाँचची चर्चा सुरु होती. आज अखेर या फोनची लाँच डेट जाहीर करण्यात आली आहे. तसेच, हा फोन Amazon वर खरेदीसाठी उपलब्ध असेल. फोनची एक समर्पित मायक्रोसाइट देखील Amazon वर लाईव्ह करण्यात आली आहे. चला तर मग जास्त वेळ न घालवता जाणून घेऊयात iQOO Z9 Lite 5G इंडिया लॉन्चिंग डिटेल्स-

Also Read: OnePlus 12R वर मिळतोय तब्बल 4000 रुपयांचा Discount, मिळतात 100W फास्ट चार्जिंगसह जबरदस्त फीचर्स

iQOO Z9 Lite 5G ची भारतीय लाँच डेट

वर सांगितल्याप्रमाणे, iQOO Z9 Lite 5G स्मार्टफोनसाठी डेडिकेटेड मायक्रोसाइट Amazon वर लाइव्ह झाली आहे. फोनच्या लाँचची तारीख या लिस्टिंगद्वारे समोर आली आहे. होय, हा फोन भारतीय बाजारात 15 जुलै रोजी दाखल होईल.

iQOO Z9 Lite 5G तपशील

Amazon मायक्रोसाइटद्वारे फोनचा लुक आणि काही फीचर्स देखील समोर आले आहेत. फोनच्या मागील बाजूस ड्युअल रियर कॅमेरा सेटअप दिसू शकतो, ज्याच्या पुढे LED फ्लॅश असेल. हा कॅमेरा सेटअप एका चौरस मॉड्यूलमध्ये आहे, दोन्ही सेन्सरसाठी सर्क्युलर रिंग देखील प्रदान केल्या आहेत.

त्याबरोबरच, हा फोन MediaTek Dimensity 6300 प्रोसेसरने सुसज्ज असेल, ज्यामध्ये तुम्हाला 6GB RAM + 128GB स्टोरेज मॉडेल मिळेल. तसेच, हा फोन पावडर ब्लू कलर ऑप्शन मध्ये दिसू शकतो, ज्यात ड्युअल टोन डिझाइन आहे. फोनच्या वरच्या बाजूला एक व्हाईट टोन दिसत आहे.

iQOO Z9 Lite 5G launching on July 15 in India: Expected Specs & more

iQOO Z9 Lite 5G चे लीक फीचर्स

लीकनुसार, iQOO Z9 Lite 5G फोन 6.56 इंच लांबीच्या HD + LCD डिस्प्लेसह येईल, ज्याचा रिफ्रेश रेट 90Hz असेल. फोटोग्राफीसाठी कंपनी फोनमध्ये 50MP चा प्रायमरी, 2MP सेकंडरी कॅमेरा देण्याची शक्यता आहे. तसेच, सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी फोनमध्ये 8MP फ्रंट कॅमेरा असण्याची अपेक्षा आहे. फोनची बॅटरी 5000mAh असू शकते. मात्र, iQOO Z9 Lite 5G चे खरे फीचर्स फोन लाँच झाल्यानंतरच पुढे येतील.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo