अरे व्वा! लाँचपूर्वीच आगामी iQOO Z10 स्मार्टफोनची किंमत Leak! आत्ताच प्लॅन करा बजेट 

अरे व्वा! लाँचपूर्वीच आगामी iQOO Z10 स्मार्टफोनची किंमत Leak! आत्ताच प्लॅन करा बजेट 
HIGHLIGHTS

iQOO चा नवीन Z-सिरीज स्मार्टफोनच्या iQOO Z10 भारतीय लाँचची पुष्टी

iQOO Z10 स्मार्टफोन 11 एप्रिल 2025 रोजी लाँच केला जाईल.

फोनमध्ये मेगा बॅटरी असेल, जी फक्त 33 मिनिटांत 50% चार्ज होईल.

प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता iQOO चा नवीन Z-सिरीज स्मार्टफोनच्या iQOO Z10 भारतीय लाँचची पुष्टी अलीकडेच करण्यात आली आहे. सध्या या डिव्हाइसचे अनेक टीझर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर केले जात आहेत. त्यानुसार, फोनबद्दल अधिकतर माहिती पुढे आली आहे. त्याबरोबरच, ताज्या लीकमध्ये आता डिवाइसची किंमत देखील लीक झाली आहे. यासह अनेक तपशील देखील पुढे आले आहेत. जाणून घेऊयात सविस्तर-

Also Read: महागड्या Realme फोनवर तब्बल 9000 रुपयांचा Discount, 32MP सेल्फी कॅमेरासह भारी फीचर्स उपलब्ध

iQOO Z10 स्मार्टफोनची किंमत Leak

ताज्या लीकनुसार, iQOO Z10 स्मार्टफोन भारतीय बाजारात 128GB आणि 256GB अशा दोन स्टोरेज व्हेरिएंटमध्ये लाँच केला जाईल. या स्मार्टफोनची सुरुवातीची किंमत 21,999 रुपये असेल. तर, लाँचऑफर अंतर्गत हा फोन 19,999 रुपयांना खरेदी करता येईल. मात्र, लक्षात घ्या की, ही केवळ स्मार्टफोनची लीक किंमत आहेत. फोनची खरी आणि प्रत्यक्ष किंमत iQOO Z10 फोन लाँच झाल्यावरच पुढे येईल.

iqoo z10

कंपनीने सांगितले की, iQOO Z10 स्मार्टफोन 11 एप्रिल 2025 रोजी लाँच केला जाईल. या फोनच्या आगमनाने हा फोन बाजारात Xiaomi, OPPO आणि Samsung सारख्या कंपन्यांच्या फोनशी स्पर्धा करेल.

iQOO Z10 चे अपेक्षित फीचर्स आणि स्पेक्स

लीकनुसार, डिस्प्लेमध्ये मध्यभागी एक पंच-होल कॅमेरा दिला जाईल. तसेच, iQOO Z10 हा मोबाईल फोन अँड्रॉइड 15 वर आधारित ऑपरेटिंग सिस्टमवर कार्य करेल. चांगली कामगिरी, स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी, या स्मार्टफोनमध्ये क्वालकॉमचा Snapdragon 7s Gen 3 प्रोसेसर दिला जाऊ शकतो. पॉवर बॅकअपसाठी, हा फोन 90W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करणाऱ्या 7300mAh मेगा बॅटरीसह येऊ शकतो.

ही मेगा बॅटरी फक्त 33 मिनिटांत 50% चार्ज होईल, असा दावा देखील केला जात आहे. फोनबद्दल अधिक माहिती अजून पुढे आलेली नाही. मात्र, हा फोन लाँच झाल्यानंतरच फोनचे योग्य कन्फर्म स्पेसिफिकेशन्स पुढे येतील. पुढील महिन्याच्या सुरुवातीला हा फोन लाँच होणार आहे. फोनबद्दल अनेक अपडेट्स करता ‘डिजिट मराठी’ सह कनेक्टेड रहा.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo