iQOO Neo 9 Pro ची भारतीय किंमत लीक, तुमच्या बजेटमध्ये बसेल का फोन? जाणून घ्या सर्व डिटेल्स। Tech News 

iQOO Neo 9 Pro ची भारतीय किंमत लीक, तुमच्या बजेटमध्ये बसेल का फोन? जाणून घ्या सर्व डिटेल्स। Tech News 
HIGHLIGHTS

iQOO Neo 9 सिरीज भारतात फेब्रुवारीमध्ये लाँच होऊ शकते.

हा फोन Amazon आणि iQOO इंडियाच्या वेबसाइटवर उपलब्ध होऊ शकतो.

प्रसिद्ध टीपस्टरने लाँचपूर्वीच आगामी फोनची अपेक्षित किंमत जाहीर केली.

iQOO ची Neo 9 सिरीज डिसेंबर महिन्यात चीनच्या देशांतर्गत बाजारपेठेत सादर करण्यात आली आहे. दरम्यान, ब्रँडने भारतात ही सिरीज iQOO Neo 9 Pro फोन लाँचचा तपशील देखील सादर केला आहे. तुमच्या माहितीसाठी सांगतो की, फेब्रुवारी महिन्यात हे उपकरण भारतीय बाजारपेठेत दाखल होईल. फोनच्या लाँचसाठी आणखी बराच वेळ असला तरी, टिपस्टरने किंमत आणि फीचर्स आधीच उघड केली आहेत. चला तर मग जाणून घेऊयात आगामी फोनचे सर्व तपशील-

हे सुद्धा वाचा: 200MP कॅमेरासह Redmi Note 13 सिरीज अखेर भारतात लाँच, जाणून घ्या किंमत आणि Best ऑफर्स। Tech News

iQOO Neo 9 Pro इंडिया लाँच

iQOO ने घोषणा केली आहे की, नवीन Neo सिरीज स्मार्टफोन फेब्रुवारीमध्ये भारतात लाँच केला जाईल. हा फोन Amazon आणि iQOO इंडियाच्या वेबसाइटवरून खरेदीसाठी उपलब्ध होण्याची शक्यता आहे. हा फोन भारतात नॉटिकल ब्लू कलर व्हेरियंटसह लेदरेट मटेरियलमध्ये ड्युअल-टोन कलरमध्ये उपलब्ध होऊ शकतो.

iQOO Neo 9 Pro अपेक्षित भारतीय किंमत

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X म्हणजेच ट्विटरवर टिपस्टर योगेश ब्रार यांनी iQOO Neo 9 Pro च्या किंमती आणि फीचर्सशी संबंधित एक पोस्ट शेअर केली आहे. तुम्ही पोस्टमध्ये पाहू शकता की, हा फोन भारतीय बाजारपेठेत 40,000 रुपयांच्या बजेटमध्ये लाँच केला जाण्याची शक्यता आहे. हा डिवाइस फेब्रुवारीच्या सुरुवातीच्या आठवड्यात लाँच केला जाऊ शकतो, असे देखील पोस्टमध्ये सांगण्यात आले आहे.

iQOO Neo 9 Pro चे संभावित फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

प्रसिद्ध टीपस्टरने iQOO Neo 9 Pro च्या अपेक्षित भारतीय किमतीसह डिव्हाइसच्या फीचर्सचा तपशील देखील शेअर केला आहे. स्मार्टफोनमध्ये 6.78 इंच लांबीचा OLED डिस्प्ले दिला जाऊ शकतो, जो 144Hz रिफ्रेश रेट सपोर्टसह असण्याची अपेक्षा आहे. Neo 9 Pro मॉडेलमध्ये कंपनी Qualcomm Snapdragon 8 Gen 2 चिपसेट मिळू शकतो.

iQOO Neo 9 Pro appears on 3C certification with 120W charging support, design officially teased

लीकनुसार, iQOO Neo 9 Pro मध्ये OIS सपोर्टसह ड्युअल रियर कॅमेरा असू शकतो. ज्यामध्ये 50MP Sony VCS IMX92 + 50 MP चा इतर कॅमेरा दिला जाऊ शकतो. तर, सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 16MP चा फ्रंट कॅमेरा असू शकतो. iQOO Neo 9 Pro मध्ये 5160mAh बॅटरी आणि 120W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करू शकतो.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo