गेल्या काही काळापासून प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता IQOO चा आगामी स्मार्टफोन iQOO 13 चे लाँच त्याच्या होम मार्केट चीनमध्ये टीज केले जात आहे. दरम्यान, आज प्रथमच ब्रँड प्रमुखाने नाव न घेता भारतात देखील हा स्मार्टफोन टीज केला आहे. तुमच्या माहितीसाठी सांगतो की, चीनमध्ये या महिन्यात सर्वप्रथम हा मोबाईल लाँच केला जाणार आहे. अद्याप लाँच डेट जाहीर झाली नसेल तरी, भारतीय टीझर लवकरच येण्याची अपेक्षा आहे. विशेष बाब म्हणजे स्पेक्सची देखील पुष्टी केली जात आहे. जाणून घेऊयात सविस्तर माहिती-
Also Read: आगामी आणि बहुप्रतीक्षित OnePlus 13 लाँच डेट जाहीर! ‘या’ दिवशी जागतिक बाजारात होणार जबरदस्त Entry
सोशल मीडिया साइट X म्हणजेच पूर्वीच्या ट्विटरवर iQOO 13 संदर्भात एक टीझर समोर आला आहे. ज्यामध्ये iQOO इंडियाचे CEO Nipun Marya यांनी एक पोस्ट शेअर केली आहे. तुम्ही खाली दिलेल्या पोस्टमध्ये पाहू शकता की, भारतात आगामी iQOO 13 लाँच करण्याचे संकेत दिले गेले आहे.
तुम्ही वरील पोस्टमध्ये बघू शकता, या टीझरमध्ये फोनचे नाव दिलेले नाही, पण ‘रेडी फॉर द नेक्स्ट’ असे लिहिलेले दिसत आहे. याद्वारे हे स्पष्टपणे सूचित होते की, iQOO 13 लवकरच भारतीय बाजारात लाँच केला जाऊ शकतो. लीक रिपोर्ट्सनुसार, हा स्मार्टफोन 3 डिसेंबरला भारतात लाँच होईल, असे सांगण्यात आले होते.
वर सांगितल्याप्रमाणे, iQOO 13 चे कन्फर्म स्पेक्स देखील पुढे आले आहेत. होय, ब्रँडने चीनमध्ये लाँच होण्यापूर्वी iQOO 13 च्या फीचर्सची पुष्टी केली आहे. iQOO 13 मध्ये BOE चे नवीन Q10 पॅनेल असेल, याला उद्योगातील सर्वोत्तम 144Hz रिफ्रेश रेट मिळेल. त्याबरोबरच, आगामी फ्लॅगशिप फोनमध्ये Qualcomm चा मजबूत Snapdragon 8 Elite चिपसेट असेल. हा प्रोसेसर स्वयं-विकसित गेमिंग चिप Q2 सह जोडला जाईल. फोन 16GB पर्यंत रॅम आणि 512GB अंतर्गत स्टोरेजसह लाँच होईल.
याव्यतिरिक्त, iQOO 13 मध्ये मोठी 6150mAh बॅटरी असेल. ते त्वरीत चार्ज करण्यासाठी, यात 120W फास्ट चार्जिंगची सुविधा असेल. तसेच, लीकनुसार iQOO 13 मध्ये फोटोग्राफीसाठी 50MP ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप मिळू शकतो. ज्यामध्ये प्राथमिक सेन्सर, अल्ट्रावाइड आणि टेलिफोटो लेन्स असू शकतात. तसेच, या फोनमध्ये डस्ट आणि वॉटर प्रोटेक्शन IP68 रेटिंग मिळण्याची शक्यता आहे.