iQOO 13 India Launch: आगामी स्मार्टफोनची लाँच टाइमलाईन, किंमत आणि स्पेसिफिकेशन Leak! वाचा सर्व डिटेल्स 

iQOO 13 India Launch: आगामी स्मार्टफोनची लाँच टाइमलाईन, किंमत आणि स्पेसिफिकेशन Leak! वाचा सर्व डिटेल्स 
HIGHLIGHTS

iQOO ची नवी नंबर सिरीज iQOO 13 लवकरच लाँच होणार आहे.

iQOO 13 फोन भारतात 1 डिसेंबर ते 10 डिसेंबर दरम्यान दाखल होऊ शकतो.

मागील मॉडेल iQOO 12 भारतात 52,999 रुपयांना लाँच करण्यात आला होता.

प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता iQOO आगामी काळात आपल्या नंबर सिरीजचा विस्तार करण्याच्या तयारीत आहे. होय, कंपनीची नवी नंबर सिरीज iQOO 13 लवकरच लाँच होणार आहे. लक्षात घ्या की, ब्रँडने अद्याप याबाबत कोणतीही घोषणा केली नाही. त्यापूर्वीच या फोनबाबत अनेक लीक्स पुढे आले आहेत. ताज्या लीकनुसार, डिव्हाइसची लाँच टाइमलाइन, फीचर्स आणि किंमत लीक झाली आहे. चला तर मग जास्त वेळ न घालवता आगामी स्मार्टफोनबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात-

iQOO-13-1.jpg

Also Read: नव्या रंग रूपात लाँच झाला OPPO K12x 5G नवा स्मार्टफोन! प्रत्येकाच्या बजेटमध्ये आहे किंमत

iQOO 13 लीक

लीकनुसार आगामी iQOO 13 लाँच टाइमलाइन चीनमध्ये घोषित झाल्यानंतर iQOO 13 फोन भारतात 1 डिसेंबर ते 10 डिसेंबर दरम्यान दाखल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, याबाबत अधिकृतपणे अद्याप कोणतीही पुष्टी झालेली नाही. तुमच्या माहितीसाठी सांगतो की, सिरीजचे मागील मॉडेल म्हणजेच iQOO 13 देखील मागील वर्षी डिसेंबर महिन्यात भारतात लाँच करण्यात आले होते.

हा फोन महागड्या बजेट श्रेणीमध्ये लाँच होण्याची शक्यता आहे. ताज्या लीकनुसार, iQOO 13 ची भारतात सुरुवातीची किंमत 55,000 रुपयांपर्यंत असण्याच्या अंदाज आहे. तर, मागील मॉडेल iQOO 12 भारतात 52,999 रुपयांना लाँच करण्यात आला होता.

iQOO 13 चे लीक स्पेसिफिकेशन्स

लीक रिपोर्टनुसार, iQOO 13 मध्ये 6.7-इंच लांबीचा AMOLED 2K डिस्प्ले, 144Hz रिफ्रेश रेटच्या सपोर्टसह येऊ शकतो. उत्तम परफॉर्मन्ससाठी, Qualcomm Snapdragon 8 Gen 4 SoC फोनमध्ये मिळू शकते. ही आगामी चिपसेट ऑक्टोबर महिन्यात लाँच होईल. फोनमध्ये तब्बल 16GB पर्यंत RAM आणि 512GB पर्यंत स्टोरेज मिळेल.

फोटोग्राफीसाठी, iQOO 13 मध्ये LED फ्लॅशसह ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप मिळू शकतो. ज्यामध्ये 50MP प्रायमरी कॅमेरा, 50MP अल्ट्रा-वाइड सेन्सर आणि 50MP 2x टेलीफोटो सेन्सर मिळण्याची अपेक्षा आहे. फोनमध्ये 6,150mAh बॅटरी मिळणे, अपेक्षित आहे. लक्षात घ्या की, वरील सर्व माहिती केवळ लीक्सच्या आधारावर आहे, फोनबद्दल सर्व खात्रीशीर माहिती फोन लाँच झाल्यानंतरच पुढे येईल.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo