Qualcomm Snapdragon 8 Gen 3 चिपसेटसह भारतातील पहिला स्मार्टफोन iQOO 12 5G येत्या 12 डिसेंबर रोजी लाँच होणार आहे. हा फोन आधीच चीनमध्ये लाँच झाला असून या फोनचे ग्लोबल स्पेसिफिकेशन्स आधीच सार्वजनिक झाले आहेत. एवढेच नाही तर, नुकतेच IQOO 12 इंडिया म्हणजेच भारतीय किंमत देखील ऑनलाईन लीकमध्ये आली आहे. हा फोन 16GB RAM च्या पॉवरने सुसज्ज असेल. बघुयात लीक किमतीनुसार हा फोन तुमच्या बजेटमध्ये बसेल की नाही?
लीकनुसार, iQOO 12 5G फोन दोन मेमरी वेरिएंटमध्ये लाँच केला जाऊ शकतो. या स्मार्टफोनचा बेस मॉडेल 12GB रॅम + 256GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 52,999 रुपये असल्याचे सांगितले जात आहे. तर, फोनचा टॉप व्हेरिएंट 16GB रॅम + 512GB स्टोरेजला सपोर्टहं येईल, ज्याची किंमत 57,999 रुपये असण्याची शक्यता आहे.
मात्र, लक्षात घ्या की सध्या ही किंमत केवळ लीक म्हणून पुढे आली आहे. स्मार्टफोन 12 डिसेंबर रोजी अधिकृतपणे लाँच झाल्यावरच खरी किंमत पुढे येईल.
वर सांगितल्याप्रमाणे, या फोचे स्पेक्स आधीच सार्वजनिक करण्यात आले आहेत. नवीन iQOO 12 फोन 6.78 इंच लांबीच्या OLED फ्लॅट डिस्प्लेसह सुसज्ज आहे, ज्याचा रिफ्रेश रेट 144Hz आहे. स्क्रीनच्या प्रोटेक्शनसाठी यात ऑप्टिकल इन-स्क्रीन फिंगरप्रिंट सेन्सर देखील मिळेल. मोबाईलमध्ये 16GB पर्यंत LPDDR5x रॅम आणि 1TB पर्यंत UFS 4.0 स्टोरेज आहे. तर, यात Qualcomm Snapdragon 8 Gen 3 चिपसेट असल्याची पुष्टी देखील कंपनीने केली आहे.
फोटोग्राफीसाठी, यात मागील कॅमेरा सेटअपमध्ये OIS सपोर्टसह 50MP OmniVision OV50H प्रायमरी सेन्सर, 50MP Samsung JN1 अल्ट्रावाइड कॅमेरा, 3x ऑप्टिकल झूम आणि 1000 डिजिटल झूमसह 64MP OV64B टेलिफोटो लेन्स समाविष्ट आहे. तर आकर्षक सेल्फीसाठी फोनमध्ये 16MP लेन्स देखील बसवण्यात आले आहेत. फोनमध्ये 5,000mAh ची बॅटरी आहे, जी 120W वायर्ड चार्जिंग सपोर्टसह येते.