iPhone SE 4 स्मार्टफोनची लाँचपूर्वीच किंमत Leak! फोनचे Special स्पेसिफिकेशन्स देखील उघड 

iPhone SE 4 स्मार्टफोनची लाँचपूर्वीच किंमत Leak! फोनचे Special स्पेसिफिकेशन्स देखील उघड 
HIGHLIGHTS

Apple च्या iPhone SE 4 ची चर्चा अधिक काळापासून टेक विश्वात सुरु आहे.

Apple कंपनीने 2022 मध्ये iPhone SE 3 लाँच केला होता.

iPhone SE 4 ची किंमत मागील मॉडेलपेक्षा सुमारे 7000 रुपयांनी जास्त असेल, असा अंदाज

जगप्रसिद्ध टेक जायंट Apple च्या iPhone SE 4 ची चर्चा अधिक काळापासून टेक विश्वात सुरु आहे. या फोनबद्दल अनेक लीक्स ऑनलाईन पुढे येत असतात. ताज्या लीक रिपोर्टमध्ये या फोनबद्दल आणखी नवीन माहिती पुढे आली आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, SE लाइनअप Apple ची बजेट-फ्रेंडली लाइनअप आहे, ज्यामध्ये कंपनी स्वस्त मॉडेल लाँच करते. लक्षात घ्या की, कंपनीने 2022 मध्ये iPhone SE 3 लाँच केला होता. त्यानंतर, आता दोन वर्षांच्या प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर आता कंपनी अखेर आपले नवीन मॉडेल बाजारात सादर करणार आहे. फोनची किंमतदेखील ऑनलाईन लीक करण्यात आली आहे. जाणून घेऊयात सविस्तर-

Also Read: Best Gaming Phones 2025: गेमिंग लव्हर्ससाठी सर्वोत्तम आहेत ‘5’ स्मार्टफोन्स, OnePlus, Vivo फोन्स समाविष्ट

not only iphone 17 but upcoming pro models camera design also resemble to google pixel 9 pro
iphone se 4

iPhone SE 4 ची लीक किंमत

ताज्या लीक झालेल्या अहवालामध्ये iPhone SE 4 ची किंमत ऑनलाइन लीक करण्यात आली आहे. एका प्रसिद्ध प्रकाशनाच्या मते, iPhone SE 4 फोनची किंमत $540 म्हणजेच सुमारे 47000 रुपये इतकी असू शकते. त्यामुळे हा फोन भारतात 50,000 रुपयांच्या किमतीत सादर केला जाऊ शकतो, अशी अपेक्षा आहे.

लक्षात घ्या की, ही किंमत मागील मॉडेलपेक्षा सुमारे 7000 रुपयांनी जास्त असेल. iPhone SE 3 बद्दल बोलायचे झाल्यास, कंपनीने हा फोन 2022 मध्ये 43,900 रुपयांना लाँच केला होता. केवळ किंमतच नाही तर, फोनचे अनेक स्पेसिफिकेशन्स देखील लीक झाले आहेत.

iPhone SE 4 चे लीक तपशील

iPhone SE 4 च्या लीक फीचर्सबद्दल बोलायचे झाल्यास, या फोनमध्ये iPhone 8 सारखे डिझाइन मिळेल. हा फोन 6.06 इंच लांबीच्या OLED डिस्प्लेसह असण्याची शक्यता आहे. चांगल्या परफॉर्मन्ससाठी, हा फोन A18 चिपसह येईल. याशिवाय, फोटोग्राफीसाठी या फोनमध्ये 48MP मेन कॅमेरा मिळेल, असे बोलले जात आहे. स्टोरेज सेक्शनबद्दल बोलायचे झल्यास, यात 8GB RAM आणि फोनचे स्टोरेज 128GB असू मिळू शकते.

iPhone SE 4
iPhone SE 4

त्याबरोबरच, आम्ही तुम्हाला सांगतो की, सुमारे 2 वर्षानंतर कंपनी नवीन SE मॉडेल अनेक नवीन अपग्रेडसह सादर करणार आहे. या अपग्रेड्समुळे कंपनी जास्त किंमतीत हा फोन लाँच करेल, अशी शक्यता वर्तवली जात आहे. या अपग्रेडमध्ये UCB-C सपोर्ट, Apple Intellegence फीचर, फेस आयडी इ. वैशिष्ट्ये मिळतील.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo