iPhone SE 4 5G: प्रसिद्ध टेक जायंट Apple चा आगामी स्मार्टफोन iPhone SE 4 5G स्मार्टफोनची चर्चा टेक विश्वात अनेक दिवसांपासून सुरु आहे. लाँचपूर्वीच या स्मार्टफोनशी संबंधित अनेक तपशील समोर पुढे आले आहेत. एवढेच नाही तर, फोनचे लॉन्चिंग तपशील देखील लीक झाले आहेत. ताज्या लीक रिपोर्टनुसार, या आगामी iPhone ची डिझाईन iPhone 14 सारखी असेल. हा स्मार्टफोन 2025 च्या पहिल्या तिमाहीत लाँच केला जाणार आहे. होय, स्मार्टफोनची लाँच टाइमलाइन ताज्या रिपोर्टमध्ये लीक झाली आहे. चला तर मग पाहुयात तपशील-
Also Read: लाँचपूर्वीच Oppo Find X8 सिरीजची भारतीय किंमत लीक! तुमच्या बजेटमध्ये आहे का किंमत?
ताज्या लीक झालेल्या रिपोर्टनुसार, हा परवडणारा iPhone मार्च 2025 मध्ये लाँच केला जाईल. मॅकरुमर्सच्या अहवालानुसार, 2025 च्या पहिल्या तिमाहीच्या शेवटी iPhone SE 4 स्मार्टफोन लॉन्च केला जाईल, असे सांगितले जात आहे. अहवालाने पुष्टी करण्यात आली आहे की, iPhone SE 4 मध्ये Apple ने डिझाइन केलेले 5G मॉडेम असेल. आधीच्या अहवालात असेही सुचवण्यात आले होते की, iPhone SE 4 स्मार्टफोन Apple च्या इन-हाउस 5G मॉडेमसह येणारा पहिला iPhone असू शकतो.
आगामी iPhone मध्ये 6.06 इंच लांबीचा LTPS OLED डिस्प्ले दिला जाऊ शकतो. तसेच, या फोनमध्ये Apple A18 चिपसेट आणि 8GB रॅम मिळण्याची शक्यता आहे. याव्यतिरिक्त, हा स्मार्टफोन iPhone iOS 18 वर कार्य करेल, असे देखील पुढे आले आहे. याशिवाय या स्मार्टफोनला FaceID आणि IP86 रेटिंग मिळण्याची शक्यता आहे. या सर्व अप्रतिम फीचर्ससह हा Apple चा आगामी परवडणारा स्मार्टफोन असणार आहे.
त्याबरोबरच, फोटोग्राफीसाठी Apple चे स्मार्टफोन्स प्रसिद्ध आहेत. या फोनमध्ये फोटोग्राफीसाठी मागील बाजूस 48MP मुख्य कॅमेरा दिला जाऊ शकतो. त्याबरोबरच, फोनच्या समोर 12MP सेल्फी कॅमेरा देखील मिळण्याची शक्यता आहे. पॉवर बॅकअपसाठी, या स्मार्टफोनमध्ये 20W फास्ट चार्जिंगसह बॅटरी मिळू शकते. आम्ही तुम्हाला सांगतो की, कंपनी लवकरच या स्मार्टफोनची लाँच तारीख जाहीर करणार आहे. त्याबरोबरच, फोनचे इतर स्पेसिफिकेशन्स देखील लवकरच पुढे येतील.