iPhone 16 Series लवकरच होणार लाँच! आगामी सिरीजमध्ये ‘हे’ Powerful फीचर्स मिळण्याची शक्यता

Updated on 04-Sep-2024
HIGHLIGHTS

Apple iPhone 16 सिरीज आगामी Apple इव्हेंटमध्ये पदार्पण करण्यासाठी सज्ज

9 सप्टेंबर रोजी iPhone 16 सिरीज टेक विश्वात दाखल होणार आहे.

लाँच पूर्वी Apple iPhone 16 सिरीजचे अनेक तपशील पुढे आले आहेत.

बहुप्रतीक्षित Apple iPhone 16 सिरीज आगामी Apple इव्हेंटमध्ये पदार्पण करण्यासाठी सज्ज झाली आहे आम्ही तुम्हाला सांगतो की, 9 सप्टेंबर रोजी ही सिरीज टेक विश्वात दाखल होणार आहे. लक्षात घ्या की, या वर्षी iPhone 16 लाइनअपमध्ये चार मॉडेल्सचा समावेश असेल. होय, iPhone 16, iPhone 16 Plus, iPhone 16 Pro, आणि iPhone 16 Pro Max हे व्हेरिएंट सिरीजअंतर्गत सादर केले जातील. याव्यतिरिक्त, आयफोन 16 प्रो व्हेरिएंट हे भारतात असेम्बल केलेले पहिले iPhone प्रो मॉडेल असेल, अशी देखील माहिती मिळाली आहे.

लाँच पूर्वी Apple iPhone 16 सिरीजबद्दल अधिकाधिक माहिती पुढे आली आहे. या सिरीजचे अनेक तपशील लीक झाले आहेत. iPhone 16 सिरीजमध्ये तुम्हाला पुढीलप्रमाणे वैशिष्ट्ये मिळणे, अपेक्षित आहे.

डिझाईन

iPhone 16 च्या स्टँडर्ड मॉडेलच्या मागील बाजूस एक नवीन लुक दिसू शकतो. लीकनुसार, आयफोन 16 लाइनअपमध्ये नियमित मॉडेलसाठी नवीन व्हर्टिकल कॅमेरा लेन्स डिझाइन वैशिष्ट्यीकृत केले जाईल. हे आयफोन 11 आणि आयफोन 12 च्या उभ्या कॅमेरा सेटअप सारखे असेल. परंतु चांगले कॅमेरे आणि मोठ्या लेन्ससह येईल, अशी माहिती मिळाली आहे. आयफोन 16 मॉडेल्स फ्रॉस्टेड लुक आणि स्लिम मॅग्सेफ अलाइनमेंट मॅग्नेटसह कलर-इन्फ्युज्ड बॅक ग्लास असेल.

Apple इंटेलिजिन्स

यापूर्वी फक्त iPhone 15 Pro आणि iPhone 15 Pro Max Apple Intelligence ला सपोर्ट करत होते. परंतु, अहवालांवर विश्वास ठेवला तर, यावेळी संपूर्ण iPhone 16 सिरीजमध्ये Apple च्या संपूर्ण AI सूटचा समावेश असेल. ऍपल इंटेलिजन्स वैशिष्ट्ये जसे की, इमेज प्लेग्राउंड, जेनमोजी, लेखन साधने आणि इतर वैशिष्ट्ये आयफोन सॉफ्टवेअरचा अनुभव सुधारतील.

कॅप्चर बटण

Apple एक नवीन कॅप्चर बटण सादर करू शकते, जे कॅमेरा शटरप्रमाणे काम करेल. फोकस करण्यासाठी आणि फोटो किंवा व्हीडिओ काढण्यासाठी यात वेगवेगळ्या प्रमाणात प्रेशर सेन्सीटीव्हिटी असेल. हे बटण कंटेंट कॅप्चर करणे सोपे करेल. विशेषतः लँडस्केप मोडमध्ये हे बटन फिचर अप्रतिम कार्य करेल.

कॅमेरा अपग्रेड

iPhone 16 प्रो आवृत्तीमध्ये एक प्रमुख कॅमेरा अपडेट समाविष्ट असू शकतो. ज्यामध्ये नवीन 48MP अल्ट्रावाइड लेन्स समाविष्ट आहे. याव्यतिरिक्त, आयफोन 16 प्रो मॉडेल्सना बहुधा टेट्रा प्रिझम 5x ऑप्टिकल झूम लेन्स मिळेल, जो आता फक्त प्रो मॅक्स ऐवजी दोन्ही प्रो आवृत्त्यांवर उपलब्ध होऊ शकतो.

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :