Amazing! iPhone मध्ये येणार ‘Underwater Mode’, आता पाण्यामध्येही घेता येतील फोटोज आणि व्हीडिओ। Tech News

Updated on 08-Feb-2024
HIGHLIGHTS

आगामी iPhone 16 सिरीजमध्ये नवे आणि अनोखे फिचर मिळेल.

कंपनी आता आपल्या नवीन iPhone मध्ये 'Underwater Mode' आणणार आहे.

युजर्स पाण्याखालील फोटो आणि व्हिडिओ सहजपणे कॅप्चर करण्यास सक्षम असतील.

iPhone लव्हर्स आणि युजर्ससाठी एक आनंदाची आणि अप्रतिम बातमी समोर आली आहे. Apple iPhone 15 सिरीज नुकतेच लाँच झाली आहे आणि त्यानंतर iPhone लव्हर्सना आता iPhone 16 सिरीजची आतुरतेने प्रतीक्षा आहे. सध्या सतत iPhone 16 सिरीजशी संबंधित माहिती ऑनलाइन समोर येत आहे. दरम्यान, ताज्या लीकनुसार, एक नवीन आणि अनोखे फीचर आगामी सिरीजमध्ये येईल, असे सांगितले जात आहे.

हे सुद्धा वाचा: आगामी iQOO Neo 9 Pro सुरुवातीची किंमत लीक! स्मार्टफोनचे Important फीचर्स देखील उघड। Tech News

होय, आम्ही तुम्हाला सांगतो की, iPhone लव्हर्सना या फीचरमुळे नक्कीच आनंद होणार आहे. ताज्या लीकवर विश्वास ठेवला तर, कंपनी आता आपल्या नवीन iPhone मध्ये ‘Underwater Mode’ आणणार आहे. नावाप्रमाणेच या नवीन फिचरच्या मदतीने, वापरकर्ते पाण्याखालील फोटो आणि व्हिडिओ सहजपणे कॅप्चर करण्यास सक्षम असतील. चला तर मग जास्त वेळ न घालवता अनोख्या फीचर्सबाबत सर्व तपशील जाणून घेऊयात-

iPhone 16 चे अनोखे फिचर

नवीनतम 78-पानांचे पेटंट युनायटेड स्टेट्स पेटंट आणि ट्रेडमार्क ऑफिस (USPTO) येथून महत्त्वाची माहिती समोर आली आहे. येथे पाण्याच्या आत वापरासाठी खास iPhone इंटरफेस पेटंटमध्ये दिसला आहे. कंपनी ते ‘Underwater Mode’ सह आणू शकते. सध्याचे iOS सॉफ्टवेअर ओला iPhone वापरण्यासाठी पुरेसे सक्षम नसल्याची माहितीही पेटंटमध्ये देण्यात आली आहे.

त्यामुळे ही उणीव दूर करण्यासाठी आता इंटरवॉटर यूजर इंटरफेस सादर करण्यात येणार आहे. या इंटरफेसमध्ये मोठी बटणे, स्ट्रीमलाइन मेनू आणि हार्डवेअर बटणांचा अधिक वापर करण्यात येईल, असे देखील अहवालातून पुढे आले आहे.

Underwater Mode

तुमच्या माहितीसाठी सांगतो की, पाण्याच्या आत कॅमेरा नियंत्रित करण्यासाठी वापरकर्त्यांना व्हॉल्यूम रॉकर बटण वापरावे लागेल. त्याबरोबरच, व्हिडिओ किंवा फोटो झूम इन किंवा झूम आउट करण्यासाठी वापरकर्ते व्हॉल्यूम रॉकर बटणे वापरण्यास सक्षम असतील. हे नवे फंक्शनिंग मोड आगामी iPhone 16 मध्ये सादर केले जाऊ शकते, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :