प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता Infinix चा नवा स्मार्टफोन Infinix Hot 50 5G लवकरच भारतात सादर केला जाणार आहे. या स्मार्टफोनची लाँच डेट देखील जाहीर करण्यात आली आहे. पुढे आलेल्या अहवालांवर विश्वास ठेवला तर, आगामी मोबाईल फोनमध्ये मीडियाटेक प्रोसेसर दिला जाणार आहे. या फोनच्या आगमनाने Itel, Lava, Realme आणि Xiaomi सारख्या कंपन्यांना भारतीय बाजारपेठेत जबरदस्त स्पर्धा मिळणार आहे, असे म्हटले जात आहे. चला तर मग जाणून घेऊयात Infinix Hot 50 5G चे भारतीय लॉन्चिंग डिटेल्स-
Also Read: 50MP मेन कॅमेरासह Vivo T3 Pro 5G भारतात दाखल, तुमच्या बजेटमध्ये येईल का नव्या फोनची किंमत?
Infinix ने आपल्या अधिकृत साईटवर आगामी स्मार्टफोनची भारतीय लाँच डेट जाहीर केली आहे. त्यानुसार, आगामी Infinix Hot 50 5G स्मार्टफोन 5 सप्टेंबर 2024 रोजी लाँच होणार आहे. मात्र, उपलब्धतेबद्दल बोलायचे झाल्यास, हा स्मार्टफोन कोणत्या साईटवरून खरेदी उपलब्ध असेल, याबद्दल कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.
Infinix ने अद्याप आपल्या आगामी Hot 50 5G ची किंमत अधिकृतपणे जाहीर केलेली नाही. परंतु लीक झालेल्या रिपोर्ट्समध्ये दावा केला जात आहे की, या फोनची किंमत जवळपास 12 हजार रुपये असण्याची शक्यता आहे. हा फोन ब्लॅक, ब्लु आणि ग्रीन कलर ऑप्शन्ससह सादर केला जाईल.
वेबसाइटवर उपलब्ध असलेला Infinix Hot 50 5G चा फोटो पाहता, स्मार्टफोनच्या मागील बाजूस सलग तीन कॅमेरे दिसत आहेत. तर, फोनच्या डाव्या बाजूला एक सिम स्लॉट देखील आहे आणि उजव्या बाजूला व्हॉल्यूम आणि पॉवर बटन्स देण्यात आली आहेत. उत्तम परफॉर्मन्ससाठी, या स्मार्टफोनमध्ये MediaTek Dimensity 6300 चिप दिली जाऊ शकते. स्टोरेजबद्दल बोलायचे झाल्यास, फोनमध्ये 4GB रॅम आणि 128GB स्टोरेज असेल. तर, यामध्ये IP54 ची रेटिंग मिळेल. याशिवाय, फोनशी संबंधित इतर माहिती फोन लाँच झाल्यानंतरच पुढे येईल.