स्मार्टफोन ब्रँड Honor भारतात पुनरागमन करत आहे. HonorTech हा ब्रँड भारतात रीलाँच करत आहे. कंपनीने आपल्या आगामी फोनच्या लॉन्च तारखेची पुष्टी केली आहे. हा ब्रँड 14 सप्टेंबर रोजी भारतात Honor 90 लाँच करण्यासाठी सज्ज झाला आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, हा फोन Amazonवर विक्रीसाठी उपलब्ध होईल. या फोनची फीचर्स आधीच उघड झाली आहेत. कारण हा स्मार्टफोन चीन आणि जागतिक बाजारपेठेत आधीच लाँच करण्यात आला आहे.
भारतात हा फोन 12GB रॅम आणि 8GB रॅम कॉन्फिगरेशनमध्ये लाँच केला जाऊ शकतो, ज्यामुळे त्याची किंमत 30 हजार रुपयांच्या बजेटमध्ये असेल, अशी अपेक्षा आहे. भारतात कंपनी 8GB रॅम आणि 12GB रॅम पर्यायांमध्ये हा फोन लाँच करू शकते. फोनमध्ये 256GB पर्यंत स्टोरेज दिले जाऊ शकते. हा फोन ब्लॅक, ग्रीन आणि सिल्व्हर कलर ऑप्शन्समध्ये लाँच केला जाऊ शकतो.
चीनमध्ये हा फोन तीन व्हेरिएंटमध्ये लाँच करण्यात आला आहे. त्याच्या 12GB RAM + 256GB स्टोरेज वेरिएंटची किंमत 2499 युआन म्हणजेच अंदाजे 28,800 रुपये आहे. 16GB RAM + 256GB स्टोरेज व्हेरिएंट 2799 युआन म्हणेजच अंदाजे 32,300 रुपये आणि 16GB RAM + 512GB स्टोरेज व्हेरिएंट 2999 युआन म्हणजेच अंदाजे रुपये 34,600 मध्ये येतो.
चीनमध्ये हा फोन आधीच लाँच करण्यात आला आहे. त्यानुसार, Honor 90 मध्ये 6.7-इंच लांबीचा AMOLED डिस्प्ले आहे, जो 120Hz रिफ्रेश रेट सपोर्टसह येतो. हा फोन Qualcomm Snapdragon 7 Gen 1 प्रोसेसरवर काम करतो. हा हँडसेट Android 13 वर आधारित Magic OS 7.1 वर काम करेल.
डिव्हाइस ट्रिपल रियर कॅमेरा सेटअपसह येतो, ज्यामध्ये वापरकर्त्यांना 200MP प्रायमरी कॅमेरा मिळतो. याशिवाय 12MP अल्ट्रा वाइड अँगल लेन्स आणि 2MP डेप्थ सेन्सर मिळेल. फ्रंटमध्ये कंपनी 50MP सेल्फी कॅमेरा देईल. डिव्हाइसमध्ये 5000mAh बॅटरी दिली जाईल, जी 66W फास्ट चार्जिंग सपोर्टसह येईल. फोनच्या सुरक्षेसाठी इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर उपलब्ध असेल.