Honor ची आगामी HONOR 200 सिरीज लवकरच भारतीय बाजारात लाँच होणार
या सिरीजअंतर्गत HONOR 200 आणि HONOR 200 Pro मॉडेल्सचा समावेश आहे.
HONOR 200 सीरीजचे डिवाइस ऑन-डिव्हाइस AI फीचर्सने सुसज्ज असतील.
प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता Honor ची आगामी HONOR 200 सिरीज लवकरच भारतीय बाजारात लाँच होण्याची शक्यता आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की,ही सिरीज नुकतीच कंपनीने चीनमध्ये लाँच केली आहे. या सिरीजअंतर्गत HONOR 200 आणि HONOR 200 Pro मॉडेल्सचा समावेश आहे. फीचर्सबद्दल बोलायचे झाले तर ही सिरीज पॉवरफुल फीचर्ससह येते. जाणून घेऊयात HONOR 200 सिरीजबद्दल सविस्तर माहिती-
HTech चे संयुक्त व्यवस्थापकीय संचालक (Joint Managing Director CP Khandelwal) CP खंडेलवाल यांनी त्यांच्या अधिकृत X म्हणेजच Twitter हँडलवर एक टीझर व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये HONOR 200 सिरीज लवकरच भारतात लाँच होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
वरील टीझर व्हिडीओ बद्दल बोलायचे झाल्यास, या सीरीजचे डिवाइस ऑन-डिव्हाइस AI फीचर्सने सुसज्ज असतील. यामध्ये Copilot, GPT, Gemini, Lamma, Imagen-2 आणि Dall-E साठी समर्थन समाविष्ट असेल.
HONOR 200 सिरीजचे फिचर्स
वर सांगितल्याप्रमाणे, कंपनीने अलीकडेच चीनमध्ये HONOR 200 सिरीज लाँच केली. या सिरीज अंतर्गत येणाऱ्या दोन्ही फोनमध्ये जवळपास समान फीचर्स प्रदान करण्यात आली आहेत. या फोनमध्ये 6.7 इंच लांबीचा कर्व फुल HD+ OLED डिस्प्ले आहे, ज्याचा रिफ्रेश रेट 120Hz इतका आहे. लक्षात घ्या की, HONOR 200 फोन Qualcomm Snapdragon 7 Gen 3 ने सुसज्ज आहे. तर, HONOR 200 Pro फोन Qualcomm Snapdragon 8s Gen 3 प्रोसेसरने सुसज्ज आहे.
फोटोग्राफीसाठी फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आहे. ज्यामध्ये OIS च्या सपोर्टसह 50MP Sony IMX906 प्रायमरी कॅमेरा, 20MP Sony IMX856 पोर्ट्रेट लेन्स आणि 12MP अल्ट्रा-वाइड कॅमेरा प्रदान करण्यात आला आहे. आकर्षक सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी फोनमध्ये 50MP फ्रंट कॅमेरा आहे. पॉवरचा फोनमध्ये 5200mAh बॅटरी 100W फास्ट चार्जिंग सपोर्टसह आहे. तर, 66W वायरलेस चार्जिंग पोर्ट देखील उपलब्ध आहे.
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.