Honor चा नवा स्मार्टफोन Honor 200 Lite भारतीय बाजारात लाँचसाठी सज्ज
Honor 200 Lite 5G स्मार्टफोन येत्या 19 सप्टेंबर 2024 रोजी दुपारी 12 वाजता लाँच केला जाईल.
Honor 200 Lite 5G च्या Amazon प्रोडक्ट पेजवरून काही स्पेक्सचा खुलासा झाला आहे.
लोकप्रिय स्मार्टफोन निर्माता Honor चा नवा स्मार्टफोन Honor 200 Lite भारतीय बाजारात लाँचसाठी सज्ज झाला आहे. कंपनीने काही काळापूर्वी Honor 200 फोन भारतात लाँच केला होता. आता या सिरीजमध्ये नवीन हँडसेट Honor 200 Lite लाँच होत आहे. कंपनीने नुकतेच या फोनची लाँच डेट जाहीर केली आहे. तसेच, स्मार्टफोन फोन ई-कॉमर्स वेबसाइट Amazon वर सूचिबद्ध करण्यात आला आहे. चला तर मग जास्त वेळ न घालवता जाणून घेऊयात Honor 200 Lite 5G फोनचे भारतीय लॉन्चिंग डिटेल्स-
लेटेस्ट स्मार्टफोन Honor 200 Lite 5G स्मार्टफोन येत्या 19 सप्टेंबर 2024 रोजी दुपारी 12 वाजता लाँच करण्यात येईल. उपलब्धतेबद्दल बोलायचे झाल्यास, या फोनची विक्री इ-कॉमर्स साईट Amazon च्या माध्यमातून केली जाणार आहे. एवढेच नाही तर, Amazon वर या फोनसाठी प्रोडक्ट पेज देखील लाईव्ह करण्यात आले आहे. हा फोन स्टाररी ब्लू, सायन लेक आणि मिडनाईट ब्लॅक या तीन कलर ऑप्शन्समध्ये लाँच केला जाईल.
Honor 200 Lite 5G चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स
Honor 200 Lite 5G च्या Amazon प्रोडक्ट पेजवरून काही स्पेक्सचा खुलासा झाला आहे. त्यावरून या फोनमध्ये AMOLED डिस्प्ले दिला जाईल. तर, Honor चा हा स्मार्टफोन MagicOS 8.0 AI वर कार्य करेल. फोटोग्राफीसाठी, हँडसेटच्या मागील बाजूस 108MP मुख्य कॅमेरा, डेप्थ कॅमेरा आणि मॅक्रो लेन्स आहे. आकर्षक सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी फोनच्या पुढील बाजूस 50MP फ्रंट कॅमेरा उपलब्ध असेल. स्मार्टफोनचे इतर स्पेसिफिकेशन्स अजून समोर आलेले नाहीत.
आम्ही तुम्हाला सांगतो की, हा फोन 6.7 इंच लांबीच्या AMOLED डिस्प्लेसह येतो. आगामी Honor 200 फोनमध्ये 50MP मुख्य कॅमेरा देण्यात आला आहे. स्टोरेजबद्दल बोलायचे झाल्यास, हा स्मार्टफोन 12GB पर्यंत रॅम आणि 512GB पर्यंत अंतर्गत स्टोरेजसह येतो. पॉवरसाठी, या फोनमध्ये 5200mAh बॅटरी आहे, जी 100W वायर्ड चार्जिंगला सपोर्टसह येते.
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.