Google Pixel 9a लवकरच होणार दाखल! किंमत लीक, लाँचपूर्वीच प्लॅन करा नव्या फोनसाठी बजेट

Google Pixel 9a फोन लवकरच बाजारात लाँच होण्यासाठी सज्ज
Google Pixel A सिरीजचे फोन परवडणाऱ्या किमतीत बाजारात सादर केले जातात.
आगामी Google Pixel 9A अपेक्षित लाँच तारीख, किंमत आणि संपूर्ण तपशील लीक
Google चा Google Pixel 9a फोन लवकरच बाजारात लाँच होण्यासाठी सज्ज झाला आहे. गेल्या अधिक काळापासून या फोनशी संबंधित अनेक तपशील ऑनलाइन उघड झाले आहेत. जर तुम्ही देखील गुगल पिक्सेल सिरीजचे चाहते असाल, पण जास्त किंमतीमुळे पिक्सेल फोन खरेदी करू शकत नसाल, तर गुगल पिक्सेल A सिरीजचे फोन फक्त तुमच्यासाठी लाँच केले आहेत. या वर्षी कंपनी या सिरीजअंतर्गत Google Pixel 9A फोन लाँच करणार आहे.
आम्ही तुम्हाला सांगतो की, फोनच्या लाँचिंगची तारीख, किंमत आणि स्पेसिफिकेशन्सशी संबंधित तपशील ऑनलाइन लीक झाले आहेत. चला तर मग जास्त वेळ न घालवता जाणून घेऊयात सर्व तपशील-
Also Read: Best Offers! 32MP सेल्फी कॅमेरासह Vivo फोनवर तब्बल 6000 रुपयांचा Discount
Google Pixel 9a चे अपेक्षित लाँच तारीख आणि किंमत लीक
ताज्या लीकनुसार, कंपनी 19 मार्च 2025 रोजी Google Pixel 9a फोन लाँच करणार आहे. लक्षात घ्या की, सध्या कंपनीने फोनच्या अधिकृत लाँचिंग तारखेची घोषणा केलेली नाही. जर लीकवर विश्वास ठेवायचा असेल तर, फोनची विक्री 26 मार्चपासून सुरू होईल. एवढेच नाही तर, या फोनची किंमत देखील लीक झाली आहे.
आम्ही तुम्हाला सांगतो की, लीकनुसार कंपनी फोनचा 128GB स्टोरेज व्हेरिएंट $499 म्हणजेच सुमारे 42,000 रुपयांमध्ये लाँच करू शकते. भारतात या फोनची किंमत सुमारे 50,000 रुपये असण्याची शक्यता आहे.
Google Pixel 9a चे अपेक्षित स्पेक्स
वर सांगितल्याप्रमाणे, Google Pixel 9a चे अपेक्षित फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्सदेखील लीक झाले आहेत. त्यानुसार, Google Pixel 9a फोनमध्ये 6.3-इंच लांबीचा OLED डिस्प्ले दिला जाऊ शकतो. स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी, या फोनमध्ये Google Tensor G4 चिप असेल. हा फोन अँड्रॉइड 15 वर कार्य करेल, अशा माहिती पुढे अली आहे. स्टोरेज सेक्शनबद्दल बोलायचे झाल्यास, या फोनमध्ये 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज मिळू शकते.
तसेच, लीकनुसार Google Pixel 9a फोनमध्ये ड्युअल फोटोग्राफीसाठी, रियर कॅमेरा सेटअप दिला जाऊ शकतो. यात 48MP चा प्रायमरी कॅमेरा आणि 13MP चा सेकंडरी कॅमेरा असेल. त्याबरोबरच, आकर्षक सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी या फोनमध्ये 13MP चा फ्रंट कॅमेरा दिला जाऊ शकतो. या फोनमध्ये 5100mAh बॅटरी दिली जाऊ शकते. या बॅटरीसह तुमचा फोन दीर्घकाळ टिकण्याची खात्री असेल.
Reshma Zalke
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile