आकर्षक फोटोग्राफीसाठी Google Pixel 8 सिरीजमध्ये येणार भारी फीचर्स, कॅमेरा डिटेल्स लीक

आकर्षक फोटोग्राफीसाठी Google Pixel 8 सिरीजमध्ये येणार भारी फीचर्स, कॅमेरा डिटेल्स लीक
HIGHLIGHTS

Google Pixel 8 सिरीजचे कॅमेरा डिटेल्स लीक

दोन्ही फोनमध्ये सॅमसंग GN1 सेन्सरसह 50-मेगापिक्सेलचा सेन्सर मिळण्याची शक्यता आहे.

या सिरीजच्या फोनमध्ये ऍडॉप्टिव्ह टॉर्च दिली जाऊ शकते.

सध्या Google Pixel 8 आणि Pixel 8 Pro बाबत बरीच चर्चा सुरु आहे. फोन लवकरच मार्केटमध्ये लाँच केले जाणार आहेत. हा फोन हाय-रिझोल्यूशन सेन्सरसह सादर केले जाऊ शकतात. या दोन्ही फोनमध्ये Tensor G3 प्रोसेसर दिला जाईल, असे बोलले जात आहे. फोटोग्राफीसाठी यात मस्त कॅमेरा फीचर्स देण्यात येणार आहेत. 

Google Pixel 8 सिरीजचे कॅमेरा डिटेल्स लीक 

वृत्तानुसार, दोन्ही फोनमध्ये सॅमसंग GN1 सेन्सरसह 50-मेगापिक्सेलचा सेन्सर आहे. Pixel 8 Pro मध्ये अल्ट्रा-वाइड-एंगल कॅमेरा दिला जाईल. त्याबरोबरच, यामध्ये ऑप्टिकल इमेज स्टॅबिलायझेशन (OIS) सह 64MP चा Sony IMX787 कॅमेरा दिला जाऊ शकतो. आता म्हत्त्वाव्हे म्हणजजे सेल्फी कॅमेर्‍याबद्दल बोलायचे झाले तर, दोन्ही फोनमध्ये 11MPचा सेन्सर दिला जाऊ शकतो. 

याव्यतिरिक्त, Pixel 8 Pro मध्ये 5X ऑप्टिकल टेलीफोटो कॅमेरा देखील दिला जाणार आहे. तसेच, Pixel 8 Pro अधिक चांगला टाइम-ऑफ-लाइट (ToF) देऊ शकतो. वृत्तानुसार, डिव्हाइसमध्ये नवीन 8×8 ToF VL53L8 सेन्सर आहे, ज्यामुळे ऑटोफोकस आणखी चांगले होणार आहे.

या सिरीजच्या फोनमध्ये ऍडॉप्टिव्ह टॉर्च दिली जाऊ शकते. हे फ्लॅश इंटेन्सिटीसह डायनॅमिकली ऍडजस्ट होते. यामध्ये कॅप्चर मोड देखील दिला जाईल. सिनेमॅटिक मोडसह या फोनमध्ये ब्लर लेव्हल सिलेक्शन फीचर देखील जोडले जाईल. Pixel 8 Pro मध्ये थर्मामीटर सेंसर दिला जाऊ शकतो. 

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo