Vivo ने अलीकडेच आपली नवीनतम बुक स्टाईल फोल्डेबल लाइनअप Vivo X Fold 3 सिरीज चीनमध्ये लाँच केली. या सिरीजमध्ये Vivo X Fold 3 आणि X Fold 3 Pro हे स्मार्टफोन्स समाविष्ट आहेत. आता कंपनीने अधिकृतपणे खुलासा केला आहे की, Vivo X Fold 3 Pro लवकरच भारतीय बाजारात लाँच केला जाईल. दरम्यान, Vivo X Fold 3 Pro ची मायक्रोसाइट ऑनलाइन शॉपिंग वेबसाइट Flipkart वर लाईव्ह झाली आहे. त्यामुळे हा फोल्डेबल स्मार्टफोन भारतात लाँच होणार असल्याची पुष्टी देखील झाली आहे.
हे सुद्धा वाचा: Samsung Galaxy F55 5G ची नवी भारतीय लाँच डेट जाहीर, जाणून घ्या अपेक्षित किंमत आणि सर्व डिटेल्स। Tech News
वर सांगितल्याप्रमाणे, Flipkart वर Vivo X Fold 3 ची मायक्रोसाईट लाईव्ह करण्यात आली आहे. जारी केलेल्या मायक्रो साइटनुसार Vivo X Fold 3 Pro ZEISS कॅमेरा सेटअपसह येणार आहे. या सेटअपसह युजर्स अनेक अप्रतिम आणि आकर्षक फोटोज क्लिक करण्यास सक्षम असतील. याशिवाय फोनशी संबंधित कोणतीही माहिती मिळालेली नाही. तसेच, या फोनची भारतीय लाँच डेटदेखील अजूनही पडद्याआडच आहे.
त्याबरोबरच, कंपनीच्या मते X Fold Pro स्मार्टफोन 100W वायर्ड आणि 50W वायरलेस चार्जिंगसह 5700mAh बॅटरीसह येणारा पहिला फोल्डेबल असेल. एवढेच नाही तर, हा फोन स्नॅपड्रॅगन 8 Gen 3 प्रोसेसरसह येणारा हा भारतातील पहिला फोल्डेबल फोन असेल.
प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता कंपनी Vivo ने अद्याप त्यांच्या आगामी फोल्डेबल स्मार्टफोनबद्दल काहीही माहिती दिलेली नाही. परंतु आतापर्यंत समोर आलेल्या लीक आणि रिपोर्ट्समध्ये असा दावा केला जात आहे की, या आगामी हँडसेटची किंमत 1,10,000 ते 1,15,000 रुपयांच्या दरम्यान ठेवली जाईल, अशी शक्यता वर्तवली जात आहे.
Vivo X Fold 3 Pro च्या मेन स्क्रीनचा साईज 8.03 इंच आहे, जो फोल्ड केल्यावर 6.53 इंच होतो. याचा रीफ्रेश रेट 120Hz इतका आहे. उत्तम परफॉर्मन्ससाठी, यात स्नॅपड्रॅगन 8 Gen 3 प्रोसेसर मिळेल. यासोबतच, फोटोग्राफीसाठी हँडसेटमध्ये 50MP ऑप्टिकल इमेज सेन्सर, 50MP अल्ट्रा-वाइड लेन्स आणि 64MP टेलिफोटो सेन्सर आहे. मात्र, फोनचे कन्फर्म फीचर्स आणि किंमत हा फोन लाँच झाल्यानंतरच समोर येतील.