Apple च्या आगामी iPhone 16 सिरीजची सर्व iPhone लव्हर्स आतुरतेने प्रतीक्षा करत आहेत. लक्षात घ्या की, आगामी Apple iPhone 16 सीरीज 10 सप्टेंबर रोजी लाँच होणार आहे. ही फोन सीरीज दरवर्षीप्रमाणे Apple लाँच इव्हेंटमध्ये सादर केली जाणार आहे. या लॉन्च इव्हेंटमध्ये Apple Apple iPhone 16, iPhone 16 Plus, iPhone 16 Pro आणि iPhone 16 Pro Max सादर करणार आहे.
आम्ही तुम्हाला सांगतो की, Apple चा आगामी लाँच इव्हेंट भारतात रात्री 10:30 वाजता आयोजित करण्यात आला आहे. स्मार्टफोनसोबतच कंपनी या इव्हेंटमधेय आपली Watch Series 10, Watch Ultra 3, Watch SE 3 देखील सादर करणार आहे. तसेच , AirPods 4 आणि AirPods Max 2 हे उपकरणे देखील लाँच होऊ शकतात. जाणून घेऊयात Apple iPhone 16 सीरीजबाबत पुढे आलेले सर्व तपशील-
प्रसिद्ध Bloomberg के Mark Gurman ने दिलेल्या माहितीनुसार Apple iPhone 16 चा लॉन्च इव्हेंट 10 सप्टेंबर रोजी आयोजित होणार आहे. याशिवाय, iPhone 16 सीरीजच्या उपलब्धतेबद्दल बोलायचे झाल्यास, हे स्मार्टफोन्स 20 सप्टेंबर 2024 पासून खरेदीसाठी उपलब्ध होतील. होय, फोनची विक्री लाँच तारखेच्या 10 दिवसांनी सुरु होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
आतापर्यंत पुढे आलेल्या लीकनुसार, iPhone 16 सीरीजची किंमत यावर्षी जास्त असू शकते, त्याचे कारण जास्त उत्पादन खर्च असल्याचे सांगितले जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, iPhone 16 आणि iPhone 16 Plus या वर्षी अनुक्रमे 79,900 रुपये आणि 89,900 रुपयांना लाँच केले जाऊ शकतात.
तर, iPhone 16 Pro आणि iPhone 16 Pro Max या दोन्ही फोनच्या किमतीत गेल्या वर्षीच्या मॉडेल्सपेक्षा सुमारे 10,000 रुपयांची वाढ दिसू शकते. तुमच्या माहितीसाठी सांगतो की, iPhone 15 Pro आणि iPhone 15 Pro Max हे दोन्ही स्मार्टफोन्स 1,34,900 आणि 1,59,900 रुपये लाँच केले गेले होते. मात्र, महत्त्वाचे लक्षात घ्या की, Apple ने iPhone 16 सिरीजच्या किमतीबाबत अधिकृतपणे अद्याप कोणतीही माहिती दिलेली नाही.
काही अहवालांमध्ये असे समोर आले आहे की, स्टॅंडर्ड iPhone 16 आणि iPhone 16 Plus स्मार्टफोन ब्लॅक, ग्रीन, पिंक व्यतिरिक्त ब्लु आणि व्हाईट कलर ऑप्शन्समध्ये ऑफर केले जाऊ शकतात. याशिवाय, जर आपण iPhone 16 प्रो मॉडेल्स ब्लॅक, व्हाइट किंवा सिल्व्हर, ग्रे किंवा नॅचरल टायटॅनियम आणि न्यू रोज गोल्ड कलरमध्ये सादर करू शकतात. या फोनचा कॅमेरादेखील मागील फोन मॉडेल्सपेक्षा अपग्रेड केला जाणार आहे. या फोनच्या अपेक्षित कॅमेरा डिटेल्स आणि इतर अपेक्षित स्पेसिफिकेशन्सबद्दल सविस्तर माहितीसाठी येथे क्लिक करा.