Amazon Great Indian Festival Sale 2024 मध्ये ‘हे’ महागडे स्मार्टफोन्स होणार स्वस्त, अप्रतिम डील्स अजिबात चुकवू नका!

Updated on 23-Sep-2024
HIGHLIGHTS

Amazon Great Indian Festival 2024 सेल 27 सप्टेंबरपासून सुरू होणार

सेल सुरू होण्यापूर्वी Amazon ने सेलदरम्यान उपलब्ध अनेक स्मार्टफोन डील्सचे अनावरण केले आहे.

Amazon Sale दरम्यान अनेक महागडे फोन स्वस्तात खरेदी करण्याची संधी आहे.

ऑनलाईन शॉपिंग करणाऱ्या ग्राहकांसाठी वर्षातील सर्वात मोठा उत्सव सुरु होणार आहे. Amazon Great Indian Festival 2024 सेलची घोषणा करण्यात आली आहे. सर्वत्र या सेलची आतुरतेने प्रतीक्षा सुरु आहे. ही विक्री येत्या 27 सप्टेंबरपासून सुरू होणार असून प्राइम सदस्यांसाठी हा सेल 1 दिवस आधी म्हणजेच 26 सप्टेंबरपासून सुरू होईल. ही सेल सुरू होण्यापूर्वी ई-कॉमर्स दिग्गज कंपनीने सेल दरम्यान उपलब्ध अनेक स्मार्टफोन डील्सचे अनावरण केले आहे. या सेलदरम्यान तुम्हाला अनेक महागडे स्मार्टफोन्स मोठ्या डिस्काउंट ऑफरसह खरेदी करता येतील.

Also Read: OnePlus Nord CE 3 5G: लोकप्रिय स्मार्टफोन मिळतोय तब्बल 9000 रुपयांचा Discount, पहा आकर्षक ऑफर

Samsung Galaxy S23 Ultra

Samsung Galaxy S23 Ultra

Samsung Galaxy S23 Ultra फोनवर किंमत 1,49,999 रुपये आहे, परंतु आगामी Amazon सेल दरम्यान तुम्ही हा फोन केवळ 69,999 रुपयांना खरेदी करू शकता. फोनच्या विशेष स्पेक्सबद्दल बोलायचे झाल्यास, या फोनमध्ये 200MP चा प्रायमरी कॅमेरा मिळणार आहे. उत्तम परफॉर्मन्ससाठी, हा फोन Snapdragon 8 Gen 2 प्रोसेसरने सुसज्ज आहे. तुम्हाला देखील हा स्मार्टफोन खरेदी करायचा असेल तर, Amazon Sale दरम्यान ही डील 27 सप्टेंबरपासून सर्व सदस्यांसाठी LIVE होईल. Buy From Here

OnePlus 12R

Amazon वर फ्लॅगशिप किलरचा लेटेस्ट फोन OnePlus 12R केवळ 42,999 रुपयांना लिस्टेड आहे. परंतु सेल दरम्यान, हा फोन तुम्ही केवळ 35,249 रुपयांना खरेदी करण्यास सक्षम असाल. फोनच्या विशेष फीचर्सबद्दल बोलायचे झाल्यास, या फोनमध्ये 1.5K डिस्प्ले देण्यात आला आहे. परफॉर्मन्ससाठी, हा फोन Snapdragon 8 Gen 2 प्रोसेसरने सुसज्ज आहे.फोटोग्राफीसाठी यात 50MP कॅमेरा मिळेल. तर, पॉवरसाठी या फोनमध्ये 5500mAh बॅटरी आहे, जी 100W फास्ट चार्जिंगच्या सपोर्टसह मिळेल. Buy From Here

iPhone 13

तुमच्या माहितीसाठी सांगतो की, आगामी Amazon सेल दरम्यान iPhone 13 ला सर्व ‘किंग ऑफ ऑल डील्स’ म्हणून नाव देण्यात आले आहे. या सेल दरम्यान तुम्ही iPhone 13 सर्वात कमी किमतीत खरेदी करण्यास सक्षम असाल. या फोनची किंमत 49,990 रुपये असेल, परंतु सेल दरम्यान हा फोन फक्त 37,999 रुपयांमध्ये खरेदी करता येईल. विशेष स्पेक्सबद्दल बोलायचे झाल्यास, यात iPhone 13 मध्ये 6.1 इंच लांबीचा डिस्प्ले, 12MP कॅमेरा आणि A15 बायोनिक चिप सारखे जबरदस्त फीचर्स उपलब्ध आहेत. Buy From Here

महत्त्वाचे लक्षात घ्या की, वर सांगितलेल्या सर्व डील्स प्राईम मेम्बर्ससाठी 26 सप्टेंबरपासून सुरु होतील. तर, सर्व सदस्यांसाठी 27 सप्टेंबरपासून सुरू होणार आहेत. महागडे फोन स्वस्तात खरेदी करण्याची ही संधी अजिबात दवडू नका.

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :