कॅनोनिकलचा उबंतू स्मार्टफोनसुद्धा असेल ‘मेड इन इंडिया’

कॅनोनिकलचा उबंतू स्मार्टफोनसुद्धा असेल ‘मेड इन इंडिया’
HIGHLIGHTS

कॅनोनिकल लायनेक्स ऑपरेटिंग सिस्टमवर आधारित उबंतू स्मार्टफोनची निर्मिती कंपनी आहे. त्यांनी ह्याच वर्षी ऑगस्टमध्ये भारतात दोन स्मार्टफोन एक्वारिस E4.5 उबंंतू एडिशन आणि एक्वारिश E5 उंबतू एडिशन लाँच केले होते.

लायनेक्स ऑपरेटिंग सिस्टम आधारित उंबतू स्मार्टफोनची निर्माता कंपनी कॅनोनिकलचे मोबाईलसुद्धा आता भारतात बनवेल. कंपनीने ह्याला मेक इन इंडियाच्या पुढाकाराअंतर्गत भारतातच निर्माण करण्याची योजना बनवली आहे.

 

ह्या कंपनीने भारतीय बाजारात ऑगस्टमध्ये प्रवेश केला होता. कॅनोनिकल लायनेक्स ऑपरेटिंग सिस्टमवर आधारित उबंतू स्मार्टफोन निर्माता कंपनी आहे. त्यांनी ह्याच वर्षी ऑगस्टमध्ये भारतात २ स्मार्टफोन एक्वारिश E4.5 उबंतू एडिशन आणि एक्वारिश E5 उबंतू एडिशन लाँच केले होते. उबंतू स्मार्टफोन भारतीय बाजारात फक्त ऑनलाईन शॉपिंग साइट स्नॅपडीलवरच उपलब्ध आहे. जेथे ह्याची किंमत ११,९९९ रुपये आणि १३,४९९ रुपये आहे. दोघांची वैशिष्ट्ये आणि तपशील जवळपास सारखीच आहेत.

ही माहिती बिझनेस लाइनद्वारा उपलब्ध केली आहे. रिपोर्टनुसार कॅनोनिकलचे म्हणणे आहे की, ते लोकल हँडसेट निर्मात्यांसोबत उत्पादनासाठी बातचीत करत आहे. रिपोर्टनुसार जॉर्डन शेरमन, मार्केटिंग डायरेक्टर, डिवाइस कॅनोनिकलचे म्हणणे आहे की, “आम्ही भारतात लक्ष केेंद्रीत करु इच्छितो आणि त्यासाठी आम्ही अनेक ओईएम भागीदाराशी सतत बोलणी करत आहोत. तसेच कंपनी इंटरनेट ऑफ थिंग्सच्या क्षेत्रातसुद्धा विचार करत आहे. ”

त्याशिवाय भारतात आसुस, अल्काटेल आणि विवोने आधीच आपल्या प्रोडक्शन योजनेची सुरुवात केली आहे. तर वनप्लस, जिओनी आणि श्याओमीने भारतात स्मार्टफोनच्या उत्पादनासाठी फॉक्सकॉनशी भागीदारी केली आहे. त्याशिवाय लिनोवो आणि मोटोरोला चेन्नईमध्ये स्मार्टफोनचे उत्पादन करेल.

Digit NewsDesk

Digit NewsDesk

Digit News Desk writes news stories across a range of topics. Getting you news updates on the latest in the world of tech. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo