लक्ष द्या! सुप्रसिद्ध CMF Phone 1 च्या स्फोटामुळे महाराष्ट्रात दुचाकीचा अपघात, एकाचा दुर्दैवी मृत्यू

Updated on 09-Dec-2024
HIGHLIGHTS

दुचाकीवरून जात असताना CMF Phone 1 चा स्फोट झाल्याने सुरेश संग्रामे यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

ही घटना महाराष्ट्रातील अर्जुनी मोरगाव मार्गावर सानगडीजवळ, भंडारा जिल्ह्यात घडली आहे.

Nothing च्या फोनची कॉलिटी आणि सिक्योरिटीवर मोठे प्रश्न उपस्थित

CMF Phone 1 Blast: अलीकडेच झालेल्या एका प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माताच्या मोबाईल फोन स्फोटाच्या अपघातामुळे एकाच्या मृत्यू झाल्याची चिंताजनक बातमी पुढे आली आहे. सविस्तर सांगायचे झाल्यास, शनिवारी रात्री एका 55 वर्षीय शाळेच्या मुख्याध्यापकाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली. दुचाकीवरून जात असताना खिशातील मोबाईलचा स्फोट झाल्याने जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक सुरेश संग्रामे यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना महाराष्ट्रातील अर्जुनी मोरगाव मार्गावर सानगडीजवळ, भंडारा जिल्ह्यात घडली आहे.

Also Read: 50MP कॅमेरासह येणाऱ्या Motorola edge 50 Fusion स्वस्तात खरेदीची संधी, पहा ऑफर

आम्ही तुम्हाला सांगतो की, संग्रामे यांच्या खिशात केवळ एक महिन्यापूर्वी नव्याने घेतलेला CMF Phone 1 होता, ते 56 वर्षीय नथू गायकवाड यांच्यासोबत दुचाकीवरून जात असताना या फोनचा स्फोट झाला आहे. हे दोघे एका कौटुंबिक मेळाव्यासाठी जात असताना फोनचा स्फोट झाला आहे. सोबती गायकवाड हे दुचाकीवरून पडले आणि त्यांना अनेक दुखापती झाल्या असून त्यांच्या सध्या उपचार सुरू आहेत. तर, या स्फोटात संग्रामे गंभीर भाजले, ज्यामुळे आग लागली. त्यानंतर, उपचारासाठी तातडीने रुग्णालयात नेण्यात आले असताना त्यांचा मृत्यू झाला.

फोन ब्लास्टचे कारण काय?

सध्या तरी फोनच्या स्फोटामागील नेमके कारण पुढे आलेले नाही, परंतु एका अहवालानुसार स्फोट मोबाईल फोनची बॅटरी जास्त तापल्यामुळे झाला, असा अंदाज वर्तवला जात आहे. मात्र, स्फोटाचे नेमके कारण शोधण्याचा पोलिस अजूनही प्रयत्न करत आहेत. या घटनेबाबत अद्याप काहीही माहिती देण्यात आलेली नाही. मात्र, ज्या व्यक्तीसोबत ही घटना घडली त्या व्यक्तीचा फोन फक्त अवघा एक महिना जुना होता. अशा परिस्थितीत CMF च्या फोनची कॉलिटी आणि सिक्योरिटीवर मोठे प्रश्न उपस्थित केले जात आहे.

फोन ओवरहीटिंग होण्यापासून कसे थांबवायचे?

CMF Phone 1 हा कंपनीचा पहिला वाहिला स्मार्टफोन आहे, जो अवघ्या काही महिन्यांपूर्वी लाँच करण्यात आला होता. तुमच्या माहितीसाठी सांगतो की, मोबाईल फोन तज्ञांच्या मते असे फोन स्फोट खूपच दुर्मिळ आहेत. हे स्फोट सहसा बॅटरी संबंधित समस्यांमुळे असतात. जास्त चार्जिंग, अनधिकृत चार्जर वापरणे किंवा फोनला जास्त उष्णतेच्या संपर्कात आणणे यामुळे बॅटरी खराब होण्याचा धोका वाढतो.

त्याबरोबरच, फोन जबाबदारीने चार्ज करणे आणि फोन रात्रभर चार्ज करणे टाळा. फोन थेट सूर्यप्रकाशाचा संपर्कात येऊ देऊ नका. फोनमध्ये सेकंड हँड बॅटरी वापरू नका. कुठल्याही दुकानांमधून तुमचा फोन दुरुस्त करून घेऊ नका, शक्य असल्यास अधिकृत स्टोअरमध्ये जा.

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :