महत्वाचे मुद्दे:
काही दिवसांपूर्वी Telecom Regulatory Authority of India ने एक निर्देश जाहीर केला होता ज्यानुसार चॅनल प्रोवाइडर्स कडून ब्रॉडकास्ट केल्या जाणाऱ्या चॅनल्सची किंमत ठरवली जाते. यामुळे केबल किंवा DTH यूजर्स फक्त त्या चॅनल्स साठी पैसे देतील जे त्यांनी स्वतः निवडले आहेत किंवा ज्यांचा वापर ते करतात. तसेच त्यांना कोटीही चॅनल साठी वेगळे पैसे दयावे लागणार नाहीत. त्याचबरोबर यामुळे इन्स्टॉलेशन चार्जेस, मंथली रेंटल फी अशा चार्ज पासून पण यूजर्सची सुटका होईल.
यात DTH प्रोवाइडर्स आणि सब्सक्राइबर्स सोबतच TRAI ला पण अडचण येऊ शकते. सब्सक्राइबर्स अशाप्रकारे नवीन नियम स्वीकारायला वेळ घेऊ शकतात. Tata Sky सारखे काही DTH प्रोवाइडर्स आतापर्यंत चॅनलसाठी आपली प्राइसिंग ठरवण्यास उशीर करत आहेत ज्यामुळे सब्सक्राइबर्सची चिंता वाढू शकते कि 31 जानेवारी नंतर त्यांची सर्विस बंद तर होणार नाही ना.
ट्राई नुसार हि असेल नवीन नेटवर्क कपॅसिटी फी
ट्राईच्या या नवीन ऍप मधून यूजर्स सहज आपले आवडीचे चॅनल निवडू शकतात. तसेच ते आपले मंथली रेंट पण माहिती करू शकतात. TRAI ने यूजर्ससाठी 100 SD free to air (FTA) चॅनल्स साठी Network Capacity Fee (NCF) 130 रुपये मंथली निर्धारित करून दिली आहे. तसेच ट्राई ने दोन प्रकरचे चॅनल्स, FTA आणि pay चॅनल्स निर्धारित केले आहेत. जर यूजर्स 100 पेक्षा जास्त चॅनल बघू इच्छित असतील तर 20 रुपये देऊन ते सहजरित्या चॅनल घेऊ शकतात. उदाहरणार्थ जर तुम्ही 110 चॅनल्स घेत असाल तर तुम्हाला 150 रुपये दार महिना द्वावे लागतील, ज्यात 130 रुपये network capacity fee आणि 20 रुपये एडिशनल फी असेल.
Trai Channel Selector Application मध्ये काय होते?
ट्राई च्या Channel Selector Application च्या मदतीने यूजर आपल्या चॅनल पॅकेजची MRP जाणून घेऊ शकतात. जसे जसे चॅनल ऍड केले जातील, हे ऍप त्या चॅनलची टोटल किंमत दाखवेल जी सब्सक्राइबर्सना द्यावी लागेल. चॅनल सिलेक्शन म्हणजे यूजरने ऑनलाइन शॉपिंग साइट वर आपले प्रोडक्ट्स शॉपिंग कार्ट मध्ये ऍड करण्याइतके सोप्पे असेल. यूजर्स आपले सर्व सिलेक्टेड चॅनल बघू शकतील. तसेच जर तुम्हाला एखादी ऑफर मिळणार असेल तर हे ऍप तुमच्या चॅनलच्या प्राइसिंग मध्ये ती ऑफर ऍड करून तुमच्या त्या चॅनलची किंमत कमी करेल, तेही तुमच्या चॅनल मध्ये कपात न करता. यूजर्स या ऍप मधून आपले चॅनल प्रिंट आणि डाउनलोड पण करू शकतात.
जेव्हा तुम्ही TRAI चॅनेल सिलेक्टर उघडाल तेव्हा तुम्हाला तुमचे नाव, भाषा, राज्य, आवडीचे जेनर सारखी काही माहिती दयावी लागेल त्यानंतर तुम्ही सिलेक्शन प्रोसेस वर जाल.