मोबाईल निर्माता कंपनी TP-Link ने अमेरिकेत चाललेल्या CES 2016 दरम्याने आपले तीन नवीन स्मार्टफोन्स लाँच केले. ह्या स्मार्टफोन्सची नावे आहेत- Neffos C5 Max, Neffos C5, Neffos C5L सध्यातरी कंपनीने ह्या स्मार्टफोन्सच्या किंमतीविषयी कोणतीही माहिती दिलेली नाही.
हे तीनही स्मार्टफोन्स खूप खास आहेत. हा 4G ला सपोर्ट करतो आणि अॅनड्रॉईड ऑपरेटिंग सिस्टमवर काम करतो. तसेच ह्या तीनही स्मार्टफोन्समध्ये चांगला कॅमेरा देण्यात आला आहे.
Neffos C5 Max ह्या स्मार्टफोनच्या वैशिष्ट्यांविषयी बोलायचे झाले तर, ह्यात 5.5 इंचाची पुर्ण HD डिस्प्ले देण्यात आली आहे, ज्याचे रिझोल्युशन 1080×1920 पिक्सेल आहे. हा स्मार्टफोन 1.3GHz 64 बिट ऑक्टा-कोर मिडियाटेक प्रोसेसर आणि 2GB रॅमने सुसज्ज आहे. ह्यात 16GB चे अंतर्गत स्टोरेज देण्यात आले आहे. त्याचबरोबर ह्यात १६ मेगापिक्सेलचा रियर कॅमेरा आणि ५ मेगापिक्सेलचा फ्रंट फेसिंग कॅमेरा देण्यात आला आहे. ह्यात 3045mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. हा स्मार्टफोन अॅनड्रॉईड ऑपरेटिंग सिस्टम 5.1 लॉलॉपॉपवर चालतो.
Neffos C5 स्मार्टफोनमध्ये 5 इंचाची HD डिस्प्ले आहे, ज्याचे रिझोल्युशन 720×1280 पिक्सेल आहे. हा 1.3GHz 64 बिट ऑक्टा-कोर मिडियाटेक प्रोसेसर आणि 2GB रॅमने सुसज्ज आहे. ह्या स्मार्टफोनमध्ये 16GB चे अंतर्गत स्टोरेजसुद्धा दिले गेले आहे. त्याचबरोबर ह्यात ८ मेगापिक्सेलचा रियर कॅमेरा आणि २ मेगापिक्सेलचा फ्रंट फेसिंग कॅमेरा देण्यात आला आहे. ह्यात 2200mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. हा अॅनड्रॉईड ऑपरेटिंग सिस्टम 5.1 लॉलीपॉपवर चालतो.
Neffos C5L स्मार्टफोनमध्ये 4.5 इंचाची FWVGA डिस्प्ले आहे, ज्याचे रिझोल्युशन 484×853 पिक्सेल आहे. ह्यात 1.1GHz क्वाड-कोर क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 210 प्रोसेसर आणि 1GB ची रॅम देण्यात आली आहे. ह्यात 8GB चे अंतर्गत स्टोरेजसुद्धा आहे. हा स्मार्टफोन ८ मेगापिक्सेलच्या रियर कॅमेरा आणि ५ मेगापिक्सेलच्या फ्रंट फेसिंग कॅमे-याने सुसज्ज आहे. ह्यात 2000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे.