Xiaomi Redmi Note 5 Pro पासून Asus Zenfone Max Pro M1 पर्यंत हे आहेत मोठ्या बॅटरी सह येणारे काही लेटेस्ट स्मार्टफोन

Updated on 28-May-2018
HIGHLIGHTS

एकीकडे आजकाल स्मार्टफोन्स मध्ये ट्रेंडी फीचर्स येत आहेत, यात बॅटरी पासून ड्यूल कॅमेरा पर्यंत सर्व फीचर येतात, तरी आजही मोठ्या बॅटरी सह येणारे डिवाइस यूजर्सना जास्त आवडतात.

एकीकडे स्मार्टफोंस आपल्या आयुष्याचा एक अविभाज्य भाग बनत आहे, यावीना आपले जीवन अपूर्ण आहे तर दुसरीकडे स्मार्टफोन अजून उपयोगी आणि आकर्षक बनवण्यासाठी सर्व कंपन्यांनी दिवसरात्र एक केली आहे. प्रत्येक कंपनीला स्मार्टफोन बनवायचा आहे जो घेतल्यावर लोकांकडून कोणतीही तक्रार येणार नाही. आजकाल स्मार्टफोंस मध्ये जगभरातील सर्व ट्रेंडी फीचर्स मिळत आहेत, जसे की आजकाल स्मार्टफोंस मध्ये आपल्याला फुल-व्यू डिस्प्ले मिळत आहे, त्याचबरोबर यात ड्यूल कॅमेरा येत आहे, फोंस मध्ये दमदार चिपसेट आणि जास्त रॅम देऊन त्यांना अजून जास्त स्पीड दिला जात आहे. सोबतच डिजाईन वर पण जवळपास सर्व कंपन्या मोठया प्रमाणात काम करत आहेत. 

पण आता या सर्व फीचर्स व्यतिरिक्त फोन ची सुरक्षा, तुमच्या डाटा ची सुरक्षा इत्यादी वर भरपूर लक्ष्य दिले जात आहे, त्यामुळे फोंस मध्ये फेस अनलॉक फीचर मोठ्या प्रमाणात सामील केला जात आहे. पण यासर्व गोष्टीं नंतर एक गोष्ट जी प्रत्येक यूजर ला आपल्या फोन मध्ये हवी असते, ती म्हणजे बॅटरी. सर्व फीचर असूनही स्मार्टफोन मध्ये चांगली बॅटरी नसेल तर तो स्मार्टफोन एक चांगला डिवाइस नाही. पण जर डिवाइस मध्ये काही वेगळे फीचर्स देऊन जलद चार्ज करण्याची क्षमता यात दिल्यास ठीक आहे. पण जर तुमचा फोन चार्ज होण्यास जास्त वेळ घेत असेल तर तुमच्यासाठी ते त्रासदायक ठरू शकते. आज आम्ही तुम्हाला काही अशा डिवाइस बद्दल सांगणार आहोत, जे मिड-रेंज मध्ये येवून पण या ट्रेंडी फीचर्स व्यतिरिक्त एक मोठी बॅटरी पण आहे. चला तर मग बघुया :

Xiaomi Redmi Note 5 Pro 
Redmi Note 5 Pro चे स्पेसफिकेशन पाहता या स्मार्टफोन मध्ये 5.99 इंचाचा फुल HD डिस्प्ले आहे, डिस्प्ले चे रिजॉल्यूशन 1080×2160 पिक्सल आणि एस्पेक्ट रेश्यो 18:9 आहे, सोबतच हा 2.5D कर्व्ड ग्लास सह येतो, हा फोन एड्रीनो 509 GPU सह ऑक्टा कोर स्नॅपड्रॅगन 636 SoC वर चालतो. 
फोन मध्ये फिंगरप्रिंट सेंसर बॅक साइड ला असेल. या फोन मध्ये f/2.2 अपर्चर सह 12MP+5MP चा डुअल रियर कॅमेरा आणि LED सेल्फी लाइट सह 20MP चा फ्रंट कॅमेरा आहे. हा डुअल सिम फोन 4G VoLTE, Wi-Fi, ब्लूटूथ, माइक्रो USB आणि 3.5mm हेडफोन जॅक सपोर्टिव आहे आणि फोन ची बॅटरी 2.0 क्विक चार्ज सह 4000mAh ची आहे. 

Asus Zenfone Max Pro M1 
फोन वेगवेगळ्या रॅम आणि स्टोरेज वेरिएंट मध्ये लॉन्च केला गेला आहे. याचा मॉडेल नंबर ZB601KL पाहता हा एका फुल मेटल डिजाईन व्यतिरिक्त 2.5D कर्व ग्लास डिस्प्ले सह लॉन्च केला गेला आहे. तसेच यात एक 5.99-इंचाचा FHD+ डिस्प्ले 2180×1080 पिक्सल रेजोल्यूशन सह मिळत आहे. 
फोन क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 636 प्रोसेसर सह लॉन्च केला गेला आहे. Redmi Note 5 Pro डिवाइस मध्ये पण तुम्हाला हा चिपसेट मिळत आहे. फोन 3GB रॅम आणि 32GB स्टोरेज व्यतिरिक्त 4GB रॅम आणि 64GB स्टोरेज वेरिएंट मध्ये पण लॉन्च केला गेला आहे. तसेच याचा एक 6GB रॅम आणि 64GB स्टोरेज वर्जन लवकरच Rs 14,999 च्या किंमतीत लॉन्च केला जाऊ शकतो. फोन मध्ये एक ड्यूल कॅमेरा सेटअप मिळत आहे, यात तुम्हाला एक 13-मेगापिक्सल आणि एक 5-मेगापिक्सल चा ड्यूल सेंसर मिळत आहे. सोबतच फोन मध्ये एक 8-मेगापिक्सल चा फ्रंट कॅमेरा मिळत आहे. याव्यतिरिक्त फोन मध्ये तुम्हाला रियर कॅमेरा सह एक LED फ्लॅश मिळत आहे, तसेच तुम्हाला फ्रंट कॅमेरा सोबत एक सॉफ्ट फ्लॅश आहे. फोन मध्ये ड्यूल सिम सपोर्ट आहे. त्याचबरोबर यात एंड्राइड 8.1 Oreo सह 5,000mAh क्षमता असलेली बॅटरी आहे.

Xiaomi Redmi Note 5
Redmi Note 5 च्या 3GB वेरियंट ची किंमत Rs 9,999 आहे, तर याच्या 4GB रॅम वेरियंट ची किंमत Rs 11,999 आहे. Xiaomi Redmi Note 5 चे स्पेक्स पाहता यात 5.99-इंचाचा 18:9 डिस्प्ले देण्यात आला आहे, या डिस्प्ले चे रेजोल्यूशन 2160 x 1080 पिक्सल आहे. हा दोन वेरियंट मध्ये सादर करण्यात आला आहे, 3GB रॅम सह 32GB ची स्टोरेज देण्यात आली आहे, तसेच 4GB रॅम सह 64GB ची स्टोरेज देण्यात आली आहे. हा फोन एंड्राइड 7.1.2 नौगट वर आधारित MIUI 9 वर चालतो. यात 4000mAh ची बॅटरी पण आहे. हा फोन स्नॅपड्रॅगन 625 प्रोसेसर सह येतो. 
Xiaomi redmi note 5 मधील कॅमेरा सेटअप पाहता यात  12MP चा रियर कॅमेरा आहे, जो डुअल LED फ्लॅश सह येतो. यात 5MP चा फ्रंट फेसिंग कॅमेरा पण मिळत आहे. याची जाडी 8.05mm आहे. 

Huawei P20 Pro 
Huawei P20 Pro कंपनी च्या लेटेस्ट किरिन 970 SoC सह येईल जो डेडिकेटेड न्यूरल प्रोसेसिंग यूनिट (NPU) सह येतो आणि हा डिवाइस एंड्राइड ओरियो वर आधारित EMUI 8.1 वर चालतो. या स्मार्टफोन मध्ये 6.1 फुल HD+ OLED फुल व्यू डिस्प्ले आहे आणि डिवाइस च्या फ्रंट ला होम बटन आहे. हा होम बटन एजलेस फिंगरप्रिंट ला सपोर्ट करतो ज्यामुळे हा जेस्चर पण ओळखू शकतो. जसे की होम साठी लॉन्ग टॅप, बॅक साठी शोर्ट टॅप आणि मल्टी टास्किंग साठी उजवीकडे आणि डावीकडे स्वाइप. 
Huawei P20 Pro मधील ट्रिपल कॅमेरा 40 MP RGB 1/1.7-इंच सेंसर, 20 MP मोनोक्रोम सेंसर आणि 8MP टेलीफोटो लेंस सह येतो. डिवाइस च्या फ्रंट ला 24.8MP चा कॅमेरा देण्यात आला आहे जो 3D पोर्ट्रेट लाइट इफेक्ट ला सपोर्ट करतो. हा डिवाइस 360 फेस अनलॉक फीचर सह येतो जो सेकंड्स मध्ये डिवाइस अनलॉक करू शकतो. याव्यतिरिक्त डिवाइस मध्ये 4000mAh ची बॅटरी आहे. 

Xiaomi Mi Max 2
Mi Max 2 मध्ये 6.44 इंचाचा फुल HD IPS डिस्प्ले आणि क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 625 प्रोसेसर देण्यात आला आहे. दोन्ही वेरिएंट्स मध्ये 4GB रॅम आहे. Mi Max 2 एल्युमीनियम यूनीबॉडी डिजाइन देण्यात आली आहे, तसेच या स्मार्टफोन मध्ये 12 मेगापिक्सल चा प्राइमरी कॅमेरा देण्यात आला आहे जो Sony च्या IMX386 सेंसर सह येतो आणि यात f/2.2 अपर्चर लेंस, फेज डिटेक्शन ऑटोफोकस आणि LED फ्लॅश आहे. या हँडसेट मध्ये 5 मेगाप्क्सिल चा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे जो f/2.0 अपर्चर सह येतो. 
Xiaomi Mi Max 2 एंड्राइड 7.1.1 नौगट वर आधारित MIUI 8.0 वर चालतो आणि स्प्लिट-स्क्रीन मल्टी-टास्किंग ला सपोर्ट करतो. या हँडसेट च्या बॅकला रियर माउंटेड फिंगरप्रिंट सेंसर आहे आणि हा 5300mAh बॅटरी सह येतो. 
 

Siddhesh Jadhav

Content Writer - Marathi

Connect On :