2024 मध्ये Powerful फीचर्ससह भारतात लाँच झालेले टॉप 5 फ्लॅगशिप Smartphones, पहा संपूर्ण यादी

Updated on 18-Dec-2024
HIGHLIGHTS

2024 हे वर्ष सुरु झाल्यासपासून स्मार्टफोन लाँचच्या नावावर झाले आहे.

यावर्षी भारतीय बाजारात अनेक भारी प्रिमियम स्मार्टफोन लाँच झाले आहेत.

2024 मध्ये लाँच झालेल्या टॉप-5 प्रीमियम स्मार्टफोनची यादी पाहुयात

Top 5 Flagship Smartphones in 2024: 2024 हे वर्ष संपायला केवळ थोडे दिवस उरले आहेत. 2024 हे वर्ष सुरु झाल्यासपासून स्मार्टफोन लाँचच्या नावावर झाले आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, यावर्षी भारतीय बाजारात अनेक स्मार्टफोन लाँच झाले आहेत. बजेटपासून ते प्रीमियम रेंजपर्यंत विविध प्रकारचे स्मार्टफोन लाँच करण्यात आले आहेत. या वर्षी स्मार्टफोन्समध्ये निरनिराळे AI फीचर्स देण्यात आले आहे. चला तर मग जास्त वेळ न घालवता, या वर्षी लाँच झालेल्या टॉप-5 प्रीमियम स्मार्टफोनची यादी पाहुयात-

Also Read: Best Offer! 50MP कॅमेरासह येणाऱ्या Samsung Galaxy S23 FE 5G वर बंपर Discount, मिळतात Powerful फीचर्स

iPhone 16 Pro Max

सुप्रसिद्ध टेक जायंट Apple ने या वर्षी सप्टेंबर महिन्यात आपली नवी iPhone 16 सिरीज लाँच केली आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, iPhone 16 Pro Max हे नवीन iPhone सिरीजमधील सर्वात प्रीमियम मॉडेल आहे. किमतीबद्दल बोलायचे झाल्यास, या फोनच्या 256GB स्टोरेज वेरिएंटची किंमत 1,44,900 रुपये इतकी आहे. तर, फीचर्सबद्दल बोलायचे झाल्यास, या फोनमध्ये 6.90 इंच लांबीचा डिस्प्ले आहे. तर, फोटोग्राफीसाठी फोनमध्ये 48MP + 12MP + 48MP कॅमेरा सेटअप मिळेल. तर सेल्फी आणि व्हीडिओ कॉलिंगसाठी समोर 12MP फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.

Samsung Galaxy S24 Ultra

साऊथ कोरियाची प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता Samsung ने देखील या वर्षी सुरुवातीलाच आपली नवी नंबर सिरीज Samsung Galaxy S24 लाँच केली आहे. तर, Samsung Galaxy S24 Ultra फोनची किंमत 1,29,999 रुपये इतकी आहे. स्पेसिफिकेशन्सबद्दल बोलायचे झाल्यास, या फोनमध्ये 6.80 इंच लांबीचा डिस्प्ले देण्यात आला आहे. उत्तम परफॉर्मन्ससाठी, हा फोन Snapdragon 8 Gen 3 चिपने सुसज्ज आहे. फोटोग्राफीसाठी, या फोनमध्ये 200MP + 12MP + 50MP + 10MP बॅक आणि 12MP फ्रंट कॅमेरा आहे. तर, पॉवर बॅकअपसाठी, या फोनची बॅटरी 5000mAh आहे.

Google Pixel 9 Pro XL

प्रसिद्ध टेक कंपनी Google ने Google Pixel 9 Pro XL फोनची किंमत 1,24,999 रुपये इतकी निश्चित केली आहे. लक्षात घ्या की, हे Google Pixel 9 सिरीजमधील सर्वात प्रीमियम मॉडेल आहे. स्पेसिफिकेशन्सबद्दल बोलायचे झाल्यास, या फोनमध्ये 6.80 इंच लांबीचा डिस्प्ले देण्यात अल्ला आहे. चांगल्या परफॉर्मन्ससाठी, हा फोन Google Tensor G4 चिपने सुसज्ज आहे. फोटोग्राफीसाठी, या फोनमध्ये 50MP + 48MP + 48MP बॅक आणि 42MP फ्रंट कॅमेरा आहे. तर पॉवर बॅकअपसाठी, या फोनमध्ये 5060mAh बॅटरी देण्यात आली आहे.

Vivo X200 Pro

Vivo या वर्षातील टॉपची स्मार्टफोन निर्माता बनली आहे. कंपनीने अलीकडेच Vivo X200 Pro स्मार्टफोन भारतात लाँच केला आहे. या फोनची किंमत 94,899 रुपये इतकी निश्चित केली गेली आहे. फीचर्सबद्दल बोलायचे झाल्यास, या फोनमध्ये 6.78 इंच लांबीचा डिस्प्ले देण्यात आला आहे. हा फोन सर्वात मजबूत MediaTek Dimensity 9400 प्रोसेसरने सुसज्ज आहे. फोटोग्राफीसाठी, या फोनमध्ये 50MP + 50MP + 50MP बॅक आणि 32MP फ्रंट कॅमेरा आहे. पॉवर बॅकअपसाठी, या फोनमध्ये 6000mAh बॅटरी मिळेल.

iQOO 13 5G

iQOO-13-5G

प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता iQOO ने या महिन्याच्या सुरुवातीला आपला नवा स्मार्टफोन iQOO 13 5G भारतात लाँच केला आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, या स्मार्टफोनची किंमत 54,999 रुपये इतकी आहे. स्पेक्सबद्दल बोलायचे झाल्यास, या फोनमध्ये 6.82 इंच लांबीचा डिस्प्ले देण्यात आला आहे. उत्तम परफॉर्मन्ससाठी हा फोन सर्वात मजबूत स्नॅपड्रॅगन 8 एलिट प्रोसेसरने सुसज्ज आहे. तर, फोटोग्राफीसाठी या फोनमध्ये 50MP + 50MP + 50MP बॅक आणि 32MP फ्रंट कॅमेरा मिळेल. बॅटरीबद्दल बोलायचे झाल्यास, या फोनची बॅटरी 6000mAh इतकी आहे.

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :