Best Gaming Phones 2025: आपण पाहतच आहोत की, सध्या गेमिंगकडे तरुणाईचे कल अधिक वाढत चालले आहे. तरुणाईमध्ये आता स्मार्टफोन्सवर गेम्स खेळण्याचे क्रेझ वाढताना दिसत आहे. अनेक लोकांना त्यांच्या स्मार्टफोनवर गेमिंग करायला आवडते. त्यामुळे, स्मार्टफोन निर्माता देखील त्यांचे प्रोडक्ट गेमिंग केंद्रित बनविण्याचे काम करत आहेत. या रिपोर्टमध्ये आम्ही तुम्हाला जगातील सर्वोत्तम गेमिंग फोनबद्दल माहिती देणार आहोत. चला तर मग जाणून घेऊयात बेस्ट टॉप 5 गेमिंग स्मार्टफोन्स-
Realme ने अलीकडेच आपला नवीन गेमिंग फोन Realme GT 7 Pro भारतात सादर केला आहे. हा फोन Qualcomm च्या सर्वात पॉवरफुल मोबाईल प्लॅटफॉर्म Snapdragon 8 Elite प्रोसेसरवर लाँच करण्यात आला आहे. फोनमध्ये 6.78 इंच लांबीचा कर्व डिस्प्ले देण्यात आला आहे, जो तुम्हाला प्रीमियम फील देतो. याचा स्क्रीन रिफ्रेश रेट 120Hz इतका आहे. पॉवर बॅकअपसाठी, यात 5800mAh बॅटरी देण्यात आली आहे. स्टोरेज सेक्शनबद्दल बोलायचे झाल्यास, Realme GT 7 Pro मध्ये तुम्हाला 16GB रॅम सह 512GB स्टोरेज मिळेल.
कंपनीने गेल्या महिन्यात डिसेंबरच्या सुरुवातीला आपला नवा स्मार्टफोन लाँच केला आहे. नवीनतम iQOO 13 Qualcomm च्या सर्वात शक्तिशाली मोबाइल चिपसेट, Snapdragon 8 Elite वर कार्य करतो. हेवी गेमिंग दरम्यान, हा फोन थंड ठेवण्यासाठी, यात सुपरकॉम्प्युटिंग चिप Q2 आहे, जी व्हेपर चेंबर कूलिंग सिस्टमसह प्रदान केली गेली आहे. तुम्हाला हा फोन 6.82-इंच लांबीची पंच-होल स्क्रीन, 144Hz रिफ्रेश रेट आहे. पॉवर बॅकअपसाठी, कंपनीने 6,150mAh बॅटरीसह iQOO 13 सादर केला आहे, यात 120W फास्ट चार्जिंग सपोर्ट आहे.
जर जगातील सर्वात पॉवरफुल गेमिंग फोनचा उल्लेख केला जात असेल, तर OnePlus 13 चे नाव समोर येणे स्वाभाविक आहे. स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी, हा फोन क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 8 एलिट प्रोसेसरवर देखील काम करतो. कंपनीने हा 6.82-इंच लांबीच्या 2K+ डिस्प्लेसह सादर केला आहे. यात 2160Hz PWM dimming आणि 120Hz रिफ्रेश रेटसह डॉल्बी व्हिजनसाठी सपोर्ट आहे. स्टोरेज सेक्शनबद्दल बोलायचे झाल्यास, हा फोन 16GB रॅमसह 1TB पर्यंत स्टोरेजला सपोर्ट करतो.
Samsung Galaxy S24 Ultra फोनची स्क्रीन अँटी-रिफ्लेक्टिव्ह आहे, त्यामुळे गेमिंग दरम्यान बाह्य प्रकाशाचा त्रास होणार नाही. फोन क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 8 Gen 3 चिपसेटवर कार्य करतो, जो 4 नॅनोमीटर फॅब्रिकेशनवर बनवला आहे. कंपनीने हा 6.8-इंच लांबीच्या स्क्रीनसह सादर केला आहे आणि त्यात डायनॅमिक AMOLED पॅनेल आहे, जे पूर्णपणे वायरलेस आहे. हा फोन 120Hz रिफ्रेश रेटसह व्हिजन बूस्टर तंत्रज्ञानाने सुसज्ज आहे, जो स्क्रीन आउटपुटनुसार व्हिज्युअल प्रदान करतो. पॉवर बॅकअपसाठी, यात 5,000mAh बॅटरी आहे जी 45W वायर्ड चार्जिंगला सपोर्ट करते.
Vivo X200 Pro फोनमध्ये Vivo X200 Pro मध्ये 6.78-इंच लांबीचा 2K OLED डिस्प्ले आहे, हे 120Hz रिफ्रेश रेट आहे. डिस्प्लेला आर्मर ग्लास प्रोटेक्शन देण्यात आले आहे. स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी, MediaTek Dimensity 9400 चिपसेटवर कार्य करते. त्यात तुम्हाला वेगळे ग्राफिक इंजिन मिळेल, जे गेमिंगमध्ये उत्तम ग्राफिक्सची खात्री देते. पॉवर बॅकअपसाठी, फोनमध्ये 6,000mAh बॅटरी आहे. तुम्हाला फोनमध्ये 90W वायर्ड फास्ट चार्जिंगसाठी सपोर्ट देखील मिळतो.