5G Smartphones under 10,000: स्वस्तात भारी फीचर्ससह येणाऱ्या लेटेस्ट स्मार्टफोन्सची यादी, बघा टॉप-5 Best ऑप्शन्स

Updated on 27-Dec-2023
HIGHLIGHTS

10,000 रुपयांपेक्षा कमी किमतीत येणाऱ्या 5G स्मार्टफोनची यादी

Itel P55 5G स्मार्टफोनची किंमत 9,996 रुपये इतकी आहे.

Lava Blaze 2 5G ची किंमत देखील 10 हजार रुपयांअंतर्गत आहे.

जर तुमचे बजेट कमी असेल आणि तुम्ही चांगला 5G स्मार्टफोन शोधत असाल, तर हा रिपोर्ट तुमच्यासाठी अगदी महत्त्वाचा आहे. कारण आज आम्ही तुम्हाला 5 सर्वोत्तम 5G स्मार्टफोन्सबद्दल सांगणार आहोत, ज्यांची किंमत 10,000 रुपयांपेक्षा कमी आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, हे स्मार्टफोन्स बॅटरी, डिस्प्ले आणि प्रोसेसरच्या बाबतीत अप्रतिम आहेत. यामध्ये Itel, Redmi, Realme इ. ब्रँडेड स्मार्टफोनचा समावेश आहे. यादीतील सर्व स्मार्टफोन्स तुम्ही इ-कॉमर्स साईटवरून खरेदी करू शकता.

Redmi 13C 5G

Redmi 13C 5G स्मार्टफोनची किंमत 10,999 रुपये इतकी आहे. स्पेसीफिकेशन्स बद्दल बोलायचे झाल्यास, Redmi 13C फोनमध्ये 6.74 इंच HD+ डिस्प्ले 90Hz रिफ्रेश रेटसह आहे. तर, हा स्मार्टफोन MediaTek Dimensity 6100+ 5G चिपसेटसह येतो. फोटोग्राफीसाठी फोनमध्ये 50MP AI ड्युअल कॅमेरा सेन्सर आहे आणि पॉवर बॅकअपसाठी फोनमध्ये 5000mAh बॅटरी सपोर्ट देखील मिळेल.

Itel P55 5G

Itel P55 5G स्मार्टफोनची किंमत 9,996 रुपये इतकी आहे. फोनमध्ये 6.56 इंच लांबीचा IPS डिस्प्ले मिळेल. तर, फोन ऑक्टाकोर क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 480 प्लस चिपसेटसह येतो. पॉवर बॅकअपसाठी 5000mAh बॅटरी देण्यात आली आहे. फोटोग्राफीसाठी या फोनमध्ये 50MP ट्रिपल रियर कॅमेरा सेटअपसह येतो.

Lava Blaze 5G

Lava Blaze 5G स्मार्टफोनची किंमत 9,299 रुपये इतकी आहे. फोनमध्ये 6.51 इंच लांबीचा HD प्लस डिस्प्ले आहे, ज्याचे रिफ्रेश रेट 90Hz आहे. फोनमध्ये MediaTek Dimensity 700 प्रोसेसर मिळेल. फोनमध्ये तीन मागील कॅमेरे आहेत, ज्यात प्रायमरी लेन्स 50MP AI सेन्सर आहे आणि समोर 8MP सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. या फोनमध्ये देखील 5000mAh बॅटरी देण्यात आली आहे.

Lava Blaze 2 5G Price in India

Lava Blaze 2 5G

Lava Blaze 2 5G स्मार्टफोनची किंमत देखील 10 हजार रुपयांअंतर्गत म्हणजेच फक्त 9,999 रुपये आहे. फोनमध्ये 6.5 इंच लांबीचा HD+ डिस्प्ले देण्यात आला आहे. त्याबरोबरच, फोनमध्ये MediaTek Dimension 6020 octacore प्रोसेसर मिळेल. फोनच्या मागील पॅनलवर LED फ्लॅशसह 50MP प्रायमरी सेन्सर आणि 8MP चा सेल्फी कॅमेरा आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, फोनमध्ये 5,000 mAh बॅटरी उपलब्ध आहे.

POCO M6 Pro 5G

POCO M6 Pro 5G स्मार्टफोनची किंमत थोडी महाग म्हणजे 10,999 रुपये इतकी आहे. फोनमध्ये फुल HD+ रिझोल्यूशन आणि 90Hz रिफ्रेश रेट, 240Hz टच सॅम्पलिंग रेटसह 6.79-इंचाचा LCD डिस्प्ले आहे. हा स्मार्टफोन Qualcomm Snapdragon 4 Gen 2 SoC ने सुसज्ज आहे. या फोनमध्ये 5,000mAh बॅटरी आहे जी 18W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :