टॉप ट्रेंडिंग फोन्स, ज्यांच्याबद्दल जाणून घ्यायाला तुम्हाला नक्की आवडेल…

Updated on 16-Nov-2018
HIGHLIGHTS

जर तुम्ही पण बाजारातील या आठवड्यातील टॉप ट्रेंडिंग फोन्स बद्दल माहिती घेऊ इच्छित असला तर आज आम्ही तुम्हाला त्यांच्याबद्दल सांगणार आहोत.

आपण बघितले आहे कि ऑक्टोबर महिन्यात अनेक स्मार्टफोन्स बाजरात आले आहेत, काही स्मार्टफोन्स भारतात लॉन्च करण्यात आले आहेत तर काही ग्लोबली लॉन्च करण्यात आले आहेत. आता प्रश्न हा येतो कि तुम्ही जेव्हा एक स्मार्टफोन घेता तो कोणत्या आधारावर घेता. तुम्हाला सांगू इच्छितो कि गेल्या आठवड्यात काही स्मार्टफोन्स टॉप ट्रेंड मध्ये होते. जर तुम्ही ट्रेंड मध्ये असणारा स्मार्टफोन घेऊ इच्छित असाल तर ज्याच्याबद्दल जास्त सर्च झाले आहेत, तसेच तुम्ही एक असा स्मार्टफोन घेणार असाल जो चर्चेत असेल तर तुमच्यासाठी चांगला आहे, कारण जेव्हा तुम्ही हा मोबाईल फोन घेता तेव्हा तुमच्या मित्रांना पण याबद्दल आधीपासूनच माहिती असते, आणि मग तो फोन तुमच्या हातात बघून ते बोलतात कि तू नवीन फोन घेतलास आणि तोही…! कंपनीचा. अशावेळी तुम्हाला चांगले वाटते. आज आम्ही तुम्हाला गेल्या आठवड्यापासून आतापर्यंत ट्रेंड मध्ये असणाऱ्या स्मार्टफोन्स बद्दल सांगणार आहोत. चला जाणून घेऊया यांबद्दल… या लिस्ट मध्ये आम्ही XIaomi Redmi Note 5, Galaxy S8, Galaxy A9 (2018), Xiaomi Mi Mix 3, Honor 8X, Poco F1, OnePlus 6T, Huawei Mate 20 Pro, Note 6 Pro, Samsung Galaxy A7 (2018) इत्यादींचा समावेश केला आहे.
 

सॅमसंग गॅलेक्सी A7 (2018)

Samsung Galaxy A7 (2018) मध्ये 6 इंचाचा फुल FHD+ डिस्प्ले देण्यात आला आहे ज्याचे रेजोल्यूशन 1080×2220 पिक्सल आहे आणि हा सुपर AMOLED इनफिनिटी डिस्प्ले आहे. अजूनतरी हा डिवाइस कोणत्या SoC वर चालेल याची माहिती देण्यात आली नाही, पण चिपसेट 2.2GHz वर क्लोक्ड असेल. गॅलेक्सी A7 (2018) मध्ये 3,300mAh ची बॅटरी आहे आणि हा एंड्राइड 8.0 ओरियो वर आधारित आहे.

हा नवीन स्मार्टफोन गॅलेक्सी A7 (2018) 4GB/64GB, 4GB/128GB आणि 6GB/128GB वेरिएंट मध्ये सादर करण्यात येईल. तसेच डिवाइसची स्टोरेज माइक्रो एसडी कार्ड ने 512GB पर्यंत वाढवता येईल. सॉफ्टवेयर फीचर्स बद्दल बोलायचे झाले तर यात डॉल्बी एटमोस, सॅमसंग पे आणि बिक्स्बी (बिक्स्बी वॉयस सपोर्टच्या वीना ) यांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी इथे जा.

शाओमी रेडमी नोट 6 प्रो

Redmi Note 6 Pro मध्ये 6.26 इंचाचा फुल HD+ IPS LCD डिस्प्ले देण्यात आला आहे ज्याचा एस्पेक्ट रेश्यो 19:9 आणि स्क्रीन-टू-बॉडी रेश्यो 86% आहे. स्क्रीला 2.5D गोरिला ग्लास प्रोटेक्शन देण्यात आले आहे. Redmi Note 6 Pro मध्ये पण रेड्मी 6 प्रो प्रमाणे डिस्प्लेच्या वरच्या बाजूला नॉच आहे. तसेच डिवाइस मध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 636 चिपसेट आहे जो आपण रेड्मी नोट 5 प्रो मध्ये पण बघितला होता. शाओमी ने थायलँड मध्ये रेड्मी नोट 6 प्रो चा फक्त एकच वेरीएंट लॉन्च केला आहे ज्यात 4GB रॅम आणि 64GB स्टोरेज आहे आणि याची स्टोरेज माइक्रो SD कार्ड ने वाढवता येते. शाओमी इतर बाजारांत डिवाइसचे अजून काही वेरीएंट सादर करू शकते.

Redmi Note 6 Pro च्या बॅक वर 12MP आणि 5MP चा डुअल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे आणि डिवाइसच्या फ्रंटला 20MP आणि 2MP चा डुअल कॅमेरा देण्यात आला आहे. शाओमी ने या नवीन नोट 6 प्रो मध्ये पण 4000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. अधिक माहितीसाठी इथे जा.

हुवावे मेट 20 प्रो

जर गेल्या वर्षी आलेल्या डिवाइस बद्दल बोलायचे झाले तर Huawei Mate 10 स्मार्टफोन कंपनी ने एका LCD डिस्प्ले सह लॉन्च केला होता, तसेच Huawei Mate 10 Pro स्मार्टफोन एका AMOLED डिस्प्ले सह बाजारात आला होता. आता एका रशियन वेबसाइट hi-tech.mail.ru च्या माध्यमातून माहिती समोर येत आहे कि Huawei Mate 20 Pro स्मार्टफोन एका कर्व्ड OLED पॅनल सह लॉन्च केला जाऊ शकतो. हा डिस्प्ले आपण गेल्या वर्षी आलेल्या Huawei Mate RS Porsche Design वाल्या स्मार्टफोन मध्ये बघितला आहे. अधिक माहितीसाठी इथे जा.

OnePlus 6T

OnePlus 6T मध्ये 6.41 इंचाचा ऑप्टिक AMOLED 19.5:9 डिस्प्ले देण्यात आला आहे ज्याचे रेजोल्यूशन 2340 x 1080p पिक्सल आहे आणि याची पिक्सल डेंसिटी 402 PPI तेच. स्क्रीनला नवीन कोर्निंग गोरिला ग्लास 6 प्रोटेक्शन देण्यात आले आहे आणि वनप्लस चे म्हणणे आहे कि या नवीन नॉच मुळे डिवाइसचा स्क्रीन-टू-बॉडी रेश्यो 86 टक्के होतो जो OnePlus 6 मध्ये 83.8 टक्के होता. OnePlus चे म्हणणे आहे कि कंपनी ने डिस्प्लेची ब्राइटनेस लेवल, कलर एक्यूरेसी आणि कलर रेंज सुधारण्यासाठी पण काम केले आहे.

अपेक्षेप्रमाणेच OnePlus 6T क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 845 SoC द्वारा संचालित आहे आणि याचा क्लॉक स्पीड 2.8GHz पर्यंत आहे तर डिवाइस दोन वेरिएंट्स 6GB रॅम आणि 128GB स्टोरेज तसेच 8GB रॅम आणि 256GB स्टोरेज सह सादर करण्यात आला आहे. हा LPDDR4X रॅम आणि UFS 2.1 2-लेन स्टोरेजला सपोर्ट करतो. फोन लेटेस्ट ऑक्सीजन OS वर लॉन्च करण्यात आला आहे जो एंड्राइड 9 पाई ऑपरेटिंग सिस्टम वर आधारित आहे. नवीन OS अनेक सुधार आणि नवीन फीचर्स सह येतो ज्यात अपडेट झालेला गेमिंग मोड आणि स्मार्ट बूस्ट इत्यादींचा समावेश आहे ज्यामुळे ऍप स्टार्ट अप टाइम 5-20 टक्क्यांनी वाढला आहे. अधिक माहितीसाठी इथे जा.

Poco F1

या डिवाइस मधील हाई-एंड चिपसेट व्यतिरिक्त इतर स्पेक्स बद्दल बोलायचे तर यात तुम्हाला एक 12-मेगापिक्सल + 5-मेगापिक्सलचा ड्यूल कॅमेरा सेटअप मिळत आहे. या कॅमेरा मध्ये AI क्षमता आहे. सोबतच फोन मध्ये एक 20-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा पण मिळत आहे. फोन मध्ये एक 4,000mAh क्षमता असलेली बॅटरी आहे. जी क्वालकॉम च्या क्विक चार्ज 3.0 ला सपोर्ट करते.

फोन मध्ये 6.18-इंचाची एक FHD+ 18.7:9 आस्पेक्ट रेश्यो वाली स्क्रीन मिळत आहे, तसेच यात एक नॉच पण देण्यात आली आहे. फोन मध्ये तुम्हाला एक हाइब्रिड ड्यूल सिम स्लॉट पण मिळेल. तसेच यात डिवाइस ड्यूल-VoLTE सपोर्ट पण आहे. अधिक माहितीसाठी इथे जा.

 

Honor 8X

Honor 8X मोबाईल मध्ये एक 6.5-इंचाचा FHD+ TFT IPS नॉच डिस्प्ले मिळत आहे, जो 1080×2340 पिक्सल रेजोल्यूशन सह आला आहे. फोन मध्ये ओक्टा-कोर हीसिलिकॉन किरिन 710 प्रोसेसर आहे, जो कंपनीच्या GPU टर्बो टेक सह आला आहे. तसेच यात तुम्हाला दोन स्टोरेज आणि रॅम वेरीएंट मिळत आहेत. हा डिवाइस तुम्ही 4GB रॅम आणि 64GB स्टोरेज सह घेऊ शकता, त्याचबरोबर यात तुम्हाला 6GB चा रॅम पण मिळत आहे, या रॅम वेरीएंट मध्ये तुम्हाला दोन वेगवेगळे स्टोरेज वेरीएंट पण मिळत आहेत, तुम्ही हा 64GB आणि 128GB स्टोरेज मध्ये घेऊ शकता. हि स्टोरेज तुम्ही वाढवू पण शकता. फोन एंड्राइड 8.1 Oreo वर चालतो, तसेच यात 3,750mAh क्षमता असलेली बॅटरी मिळत आहे. अधिक माहितीसाठी इथे जा.

शाओमी मी मिक्स 3

Xiaomi Mi Mix 3 6.3 इंचाच्या FHD+ AMOLED डिस्प्ले सह येतो ज्याचे रेजोल्यूशन 1080×2340 पिक्स्ल आहे. स्मार्टफोन मध्ये 93.4 टक्के स्क्रीन टू बॉडी रेश्यो आणि 19.5:9 चा एस्पेक्ट रेश्यो आहे. डिवाइस ओक्टा-कोर Snapdragon 845 चिपसेट प्रोसेसर वर चालतो. या स्मार्टफोन मध्ये तुम्हाला रॅम चे 3 ऑप्शन मिळतील ज्यात 6GB, 8GB आणि 10GB चा समावेश आहे. स्टोरेज बदललं बोलायचे तर फोनच्या 6GB वेरीएंट मध्ये तुम्हाला 128GB ची इंटरनल स्टोरेज, 8GB वेरीएंट मध्ये 128GB आणि 256GB ची  इंटरनल स्टोरेज मिळते. त्याचबरोबर 10GB च्या स्पेशल एडिशन वेरीएंट मध्ये तुम्हाला 256GB ची इंटरनल स्टोरेज देण्यात येत आहे. तसेच 10GB च्या स्पेशल एडिशन वेरीएंट मध्ये तुम्हाला 256GB ची इंटरनल स्टोरेज मिळत आहे. कॅमेरा पाहता या फोन मध्ये Sony IMX363 सेंसर आहे. यात OIS आणि f/1,8 अपर्चर सह 12MP चा रियर कॅमेरा देण्यात आला आहे. शाओमीचा हा नवीन मॉडेल नॉच-फ्री असून सोबत बेजल लेस पण आहे. अधिक माहितीसाठी इथे जा.

सॅमसंग गॅलेक्सी A9

स्पेसिफिकेशन्स बद्दल बोलायचे झाले तर Samsung Galaxy A9 मोबाईल फोन मध्ये तुम्हाला एक 6.3-इंचाचा FHD+ AMOLED डिस्प्ले 18:9 आस्पेक्ट रेश्यो सह देण्यात आला आहे, तसेच यात तुम्हाला क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 660 ओक्टा-कोर प्रोसेसर देण्यात आला आहे. त्याचबरोबर फोन मध्ये तुम्हाला 6GB आणि 8GB रॅम वेरीएंट मिळतील. या दोन्हींमध्ये तुम्हाला 128GB ची इंटरनल स्टोरेज मिळत आहे. स्मार्टफोन मध्ये एक 3800mAh क्षमता असलेली बॅटरी पण आहे. हा फास्ट चार्जिंगला सपोर्ट करतो. फोन एंड्राइड 8.0 Oreo वर चालतो.

सॅमसंग गॅलेक्सी ए9 मध्ये तुम्हाला एक 3D कर्व ग्लास रियर पॅनल मिळत आहे, तसेच यात तुम्हाला फोटोग्राफी साठी एक 24-मेगापिक्सलचा मेन कॅमेरा मिळत आहे, त्याचबरोबर यात तुम्हाला एक 8-मेगापिक्सलचा 120-डिग्री वाला अल्ट्रा वाइड कॅमेरा मिळत आहे. यात एक 10-मेगापिक्सलची टेलीफोटो लेंस पण आहे आणि तुम्हाला यात एक 5-मेगापिक्सलचा डेप्थ सेंसर पण मिळत आहे. फोनच्या फ्रंट वर तुम्हाला एक 24-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा पण मिळतो. फोन ब्लूटूथ 5 व्यतिरिक्त LTE Cat 9 कनेक्टिविटीला सपोर्ट करतो.तसेच यात तुम्हाला चार्जिंग साठी USB Type C पोर्ट देण्यात आला आहे. सोबतच फोन मध्ये एक 3.5mm चा हेडफोन जॅक पण आहे. अधिक माहितीसाठी इथे जा.

 

Siddhesh Jadhav

Content Writer - Marathi

Connect On :