टॉप 10 बेस्ट परफॉर्मन्स असलेले मोबाईल फोन जे मिळतात Rs 15,000 च्या आत
जर तुम्ही Rs 15,000 मध्ये काही सर्वात खास स्मार्टफोन्स घेण्याचा विचार करत असला तर आज तुम्हाला आम्ही अशाच काही दमदार फोन्स बद्दल सांगणार आहोत, जे परफॉर्मन्स, कॅमेरा, डिस्प्ले, डिजाईन आणि इत्तर बाबतीती खूप खास आहेत.
जर तुम्ही Rs 15,000 च्या आत टॉप 10 मोबाईल फोन्सचा शोध घेत असाल तर आज आम्ही तुम्हाला भारतात मिळणाऱ्या टॉप 10 एंड्राइड स्मार्टफोन्स व्यतिरिक्त टॉप मोबाईल फोन्स बद्दल पण सांगणार आहोत. या लिस्ट मध्ये आम्ही Rs 15,000 मध्ये येणारे टॉप 10 मोबाईल फोन्सचा समावेश केला आहे, जे तुम्हाला कुठल्याना कुठल्या बाबतीती नक्कीच आवडतील, तसेच परफॉर्मन्स, कॅमेरा आणि डिस्प्ले सोबतच या डिवाइसेस मध्ये खास डिजाईन पण आहे.
तुम्हाला तर माहितीच आहे कि या किंमतीती भारतात असे भरपूर स्मार्टफोन्स आहेत, जे लोकांसमोर येण्याचा प्रयत्न लार्त आहेत. याचा अर्थ असा कि या श्रेणी मध्ये म्हणजे Rs 15,000 आणि त्याच्या आत आणि त्याच्या वर येणाऱ्या स्मार्टफोन्सचा बाजार भारतात खूप मोठा आहे. या लिस्ट मध्ये तुम्हाला सर्वात आधी Xiaomi मिळेल, याव्यतिरिक्त तुम्हाला या श्रेणी मध्ये Asus मिळेल, या श्रेणी मध्ये इतर अनेक कंपन्या जसे कि Nokia, Oppo आणि Honor यांचा पण समावेश आहे. तसेच सॅमसंग आणि इतर अनेक मोठ्या कंपन्यांच्या स्मार्टफोन्सचा पण या लिस्ट मध्ये समावेश करण्यात आला आहे. तुम्ही इतके सर्व स्मार्टफोन्स बघून तुम्ही नक्कीच हैराण झाला असाल आणि या किंमतीती कोणता डिवाइस घ्यावा याचा विचार करत तुम्ही बसला असाल. चाल तर मग तुमची हि अडचण दूर करूया आणि बघूया Rs 15,000 मध्ये येणारे टॉप 10 मोबाईल फोन्स.
शाओमी रेडमी नोट 5 प्रो
जर Xiaomi Redmi Note 5 Pro बद्दल बोलायचे झाले तर यात क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 636 प्रोसेसर आहे. यात 6GB चा रॅम पण आहे. या फोन मध्ये 20MP चा फ्रंट फेसिंग कॅमेरा देण्यात आला आहे. सेल्फी कॅमेऱ्या सह LED लाइट पण देण्यात आली आहे. यात पोर्ट्रेट सेल्फी फीचर पण देण्यात आला आहे, जो बोकेह इफेक्ट देतो. सोबतच या फोन मध्ये डुअल रियर कॅमेरा सेटअप पण आहे. यात 12MP+5MP चा रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे.
हॉनर 8X
Honor 8X मोबाईल मध्ये एक 6.5-इंचाचा FHD+ TFT IPS नॉच डिस्प्ले मिळत आहे, जो 1080×2340 पिक्सल रेजोल्यूशन सह येतो. फोन मध्ये ओक्टा-कोर हीसिलिकॉन किरिन 710 प्रोसेसर मिळत आहे, जो कंपनीच्या GPU टर्बो टेक सह येतो. तसेच यात तुम्हाला दोन स्टोरेज आणि रॅम वेरिएंट मिळत आहेत.
हा डिवाइस तुम्ही 4GB रॅम आणि 64GB स्टोरेज सह घेऊ शकता, तसेच यात तुम्हाला 6GB चा रॅम पण मिळत आहे. या स्टोरेज वेरिएंट मध्ये तुम्हाला दोन वेगवेगळे स्टोरेज वेरिएंट पण मिळत आहेत. तुम्ही हा 64GB आणि 128GB स्टोरेज मध्ये घेऊ शकता. हि स्टोरेज तुम्ही वाढवू पण शकता. फोन एंड्राइड 8.1 Oreo वर चालतो, सोबतच यात 3,750mAh क्षमता असलेली बॅटरी मिळत आहे.
असुस झेनफोन मॅक्स प्रो M1
Asus Zenfone Max Pro M1 बद्दल बोलायचे झाले तर तुम्हाला सांगू इच्छितो कि या डिवाइस मध्ये एक 5.99-इंचाचा FHD+ डिस्प्ले 2180×1080 पिक्सल रेजोल्यूशन सह मिळत आहे. फोन क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 636 प्रोसेसर सह लॉन्च करण्यात आहे. Redmi Note 5 Pro डिवाइस मध्ये पण तुम्हाला हाच चिपसेट मिळत आहे.
फोन मध्ये एक ड्यूल कॅमेरा सेटअप आहे. यात तुम्हाला एक 13-मेगापिक्सल (6GB वेरिएंट मध्ये 16 मेगापिक्सल) आणि एक 5-मेगापिक्सलचा ड्यूल सेंसर मिळत आह. तसेच फोन मध्ये एक 8-मेगापिक्सल (6GB रॅम वेरिएंट मध्ये 16 मेगापिक्सल) चा फ्रंट कॅमेरा आहे. त्याचबरोबर फोन मध्ये तुम्हाला रियर कॅमेरा सोबत एक LED फ्लॅश मिळत आहे, इसके अलावा तुम्हाला फ्रंट कॅमेरा सह एक सॉफ्ट फ्लॅश मिळत आहे. फोन मध्ये ड्यूल सिम सपोर्ट आहे, तसेच या मध्ये एंड्राइड 8.1 Oreo व्यतिरिक्त 5,000mAh क्षमता असलेली बॅटरी पण आहे.
Realme 2 Pro
Realme 2 Pro मध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 660 SoC आहे आणि हा ओप्पोच्या कलर OS सह एंड्राइड 8.1 ओरियो वर चालतो. या मोबाईल फोन मध्ये 3,500mAh ची बॅटरी देण्यात आली आहे आणि या मध्ये 6.3 इंचाची फुल HD+ IPS LCD स्क्रीन आहे आणि याचा एस्पेक्ट रेश्यो 19:9 आहे जो आजकल ट्रेंडिंग आहे आणि सोबतच डिस्प्लेच्या वरच्या बाजूला वॉटर ड्राप नॉच पण देण्यात आली आहे. स्मार्टफोन मध्ये दोन सिम कार्ड स्लॉट व्यतिरिक्त माइक्रो एसडी कार्ड स्लॉट पण देण्यात आला आहे. फोन चार्ज किंवा डाटा ट्रान्सफर करण्यासाठी माइक्रो-USB पोर्ट देण्यात आला आहे. हा फोन तीन कलर पर्यायांमध्ये उपलब्ध आहे ज्यात ब्लॅक सी (ब्लॅक), आइस लेक (लाइट ब्लू) आणि ब्लू ओशेन (डार्क ब्लू) रंगांचा समावेश आहे.
कॅमेरा बद्दल बोलायचे तर रियलमी 2 प्रो मध्ये 16 मेगापिक्सल आणि 2 मेगापिक्सलचा रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे आणि डिवाइस मध्ये देण्यात आलेला सेकंडरी सेंसर डेप्थ-इफेक्ट शॉट्स घेण्यास मदत करतो. रियलमी 2 प्रो च्या फ्रंटला 16 मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला आहे, जो AI आधारित डेप्थ इफेक्ट पोर्ट्रेट शॉट्स घेऊ. या स्मार्टफोनच्या बॅक पॅनल वर एक फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे आणि सोबत डिवाइस मध्ये फेस अनलॉक फीचर पण आहे. हा मोबाईल फोन गेल्या महिन्यात लॉन्च झालेल्या Realme 2 चा पुढील वर्जन आहे जो Rs 8,990 मध्ये लॉन्च करण्यात आला होता.
Realme 1
जर डिवाइसच्या फीचर्स बद्दल बोलायचे झाले तर तुम्हाला सांगू इच्छितो कि हा डायमंड ब्लॅक फिनिश सह लॉन्च करण्यात आला आहे, तसेच याची बॅक खूप रेफ्लेक्टिव आहे, फोन 12-लेयर नॅनो-टेक मटेरियल सह लॉन्च करण्यात आला आहे. स्मार्टफोन मध्ये तुम्हाला एक 6-इंचाचा FHD+ डिस्प्ले मिळत आहे. तसेच यात तुम्हाला मीडियाटेक हेलिओ P60 चिपसेट देण्यात आला आहे, हा फोन ड्यूल 4G सपोर्ट सह लॉन्च करण्यात आला आहे. फोन 3GB रॅम आणि 32GB इन्टरनल स्टोरेज व्यतिरिक्त एक 4GB चा रॅम आणि 64GB ची इन्टरनल स्टोरेज आणि 6GB चा रॅम सोबत 128GB ची इंटरनल स्टोरेज सह लॉन्च करण्यात आला आहे.
फोन मध्ये तुम्हाला एक माइक्रोएसडी कार्ड सपोर्ट पण मिळतो, ज्याच्या माध्यमातून तुम्ही याची स्टोरेज 128GB पर्यंत वाढवू शकता. कंपनी असे म्हणणे आहे कि हा स्मार्टफोन Xiaomi Redmi Note 5 Pro आणि Asus Zenfone Max Pro M1 स्मार्टफोनला चांगलीच टक्कर देणार आहे. फोन मध्ये एक 3410mAh क्षमता असलेली बॅटरी देण्यात आली आहे, जी AI बॅटरी मॅनेजमेंट सह येते.
नोकिया 5.1
Nokia 5.1 Plus ची डिजाइन Nokia 6.1 Plus सारखीच वाटते, डिवाइस मध्ये नॉच डिस्प्ले, ग्लास डिजाइन आणि रियर-माउंटेड फिंगरप्रिंट सेंसर आहे. डिवाइस मध्ये 5.86 इंचाचा HD+ (720×1520) डिस्प्ले देण्यात आला आहे आणि डिवाइसच्या टॉप वर 2.5D कर्व्ड ग्लास देण्यात आली आहे तसेच याचा एस्पेक्ट रेश्यो 19:9 आहे. स्मार्टफोन मध्ये ओक्टा-कोर 2.0GHz हेलिओ P60 चिपसेट, 3GB रॅम आणि 32GB स्टोरेज देण्यात आली आहे.
Nokia 5.1 Plus च्या बॅक पॅनल वर 13 आणि 5 मेगापिक्सलचा डुअल रियर कॅमेरा देण्यात आला आहे. तसेच डिवाइसच्या फ्रंटला 8 मेगापिक्सलचा शूटर आहे जो AI फेस अनलॉक सह येतो. दोन्ही फोन्स मधील फ्रंट कॅमेरा AI असिस्टेड पोर्ट्रेट लाइटिंग फीचर सह येतो. फोन मध्ये 3060mAh ची बॅटरी आहे आणि डिवाइस एंड्राइड वन प्रोग्रामचा भाग आहे तसेच स्टॉक एंड्राइड 8.1 ओरियो वर आधारित आहे.
नोकिया 6.1
Nokia 6.1 Plus ला एज-टू-एज डिस्प्ले देण्यात आला आहे. फोन मध्ये 5.8 इंचाचा FHD+ (2280×1080) डिस्प्ले देण्यात आला आहे ज्याचा एस्पेक्ट रेश्यो 19:9 आहे आणि हा हाई स्क्रीन-टू-बॉडी रेश्यो ऑफर करतो. डिवाइसच्या फ्रंट आणि बॅक पॅनल वर गोरिला ग्लास 3 देण्यात आली आहे आणि हा ग्लॉस मिडनाईट ब्लू, ग्लॉस ब्लॅक आणि ग्लॉस वाइट कलर मध्ये उपलब्ध होईल.
Nokia 6.1 Plus मध्ये ओक्टा-कोर स्नॅपड्रॅगॉन 636 चिपसेट, 4GB रॅम आणि 64GB इंटरनल स्टोरेज आहे आणि याची स्टोरेज माइक्रो एसडी कार्ड ने 400GB पर्यंत वाढवता येईल. Nokia 6.1 Plus पण एंड्राइड वन डिवाइस आहे याचा अर्थ असा कि डिवाइसला वेळोवेळी सिक्योरिटी अपडेट्स मिळतिल आणि भविष्यात डिवाइस एंड्राइड 9 पाई वर पण अपडेट केला जाईल. Nokia 6.1 Plus आणि 5.1 Plus दोन्ही ही गूगल लेंस सह येतिल.