मोबाईल निर्माता कंपनी कार्बनने बाजारात आपले दोन नवीन स्मार्टफोन्स टायटेनियम मुगल आणि टायटेनियम S205 2GB सादर केला आहे. कार्बन टायटेनियम मुगलची किंमत ५,७९० रुपये आणि टायटेनियम S205 2GB ची किंमत ६,७९० रुपये ठेवण्यात आली आहे. हे दोन्ही स्मार्टफोन्स लवकरच रिटेल स्टोरमध्ये उपलब्ध होतील.
कार्बन टायटेनियम मुगल आउट ऑफ बॉक्स अॅनड्रॉईड ऑपरेटिंग सिस्टम 4.4 किटकॅटवर चालेल, तर कार्बन टायटेनियम S205 2GB अॅनड्रॉईड ऑपरेटिंग सिस्टम 5.1 लॉलीपॉपवर आधारित असेल.
जर कार्बन टायटेनियम मुगल स्मार्टफोनच्या वैशिष्ट्यांविषयी बोलायचे झाले तर, ह्यात 5 इंचाची QHD IPS डिस्प्ले आहे, ज्याचे रिझोल्युशन 540×960 पिक्सेल आहे. ह्या डिस्प्लेमध्ये ड्रॅगनटेल ग्लासचे संरक्षण आहे. हा स्मार्टफोन 1.2GHz क्वाड-कोर प्रोसेसर आणि 1GB रॅमने सुसज्ज आहे. ह्या स्मार्टफोनमध्ये 8GB चे अंतर्गत स्टोरेजसुद्धा आहे, ज्याला मायक्रो-एसडी कार्डच्या साहाय्याने 32GB पर्यंत वाढवू शकतो. ह्या स्मार्टफोनमध्ये LED फ्लॅशवाला ८ मेगापिक्सेलचा ऑटोफोकस कॅमेरासुद्धा आहे आणि ह्यात 3.2 मेगापिक्सेलचा फ्रंट फेसिंग कॅमेरासुद्धा दिला गेला आहे. हा स्मार्टफोन 2000mAh च्या बॅटरीने सुसज्ज आहे. ह्यात 3G सपोर्टसुद्धा आहे.
कार्बन टायटेनियम S205 2GB विषयी बोलायचे झाले तर, ह्यात ५ इंचाची HD IPS डिस्प्ले दिली गेली आहे, ज्याचे रिझोल्युशन 720×1280 पिक्सेल आहे. ह्या डिस्प्लेवर ड्रॅगनटेल ग्लासचे संरक्षण आहे. हा स्मार्टफोन 1.2GHz क्वाडकोर प्रोसेसर आणि 2GB ची रॅम दिली आहे. ह्यात 16GB चे अंतर्गत स्टोरेजसुद्धा दिले आहे, ज्याला मायक्रो-एसडी कार्डच्या साहाय्याने 32GB पर्यंत वाढवू शकतो. ह्या स्मार्टफोनमध्ये LED फ्लॅशवाला ८ मेगापिक्सेलचा रियर कॅमेरा आणि 3.2 मेगापिक्सेलचा फ्रंट फेसिंग कॅमेरासुद्धा दिला आहे. हा स्मार्टफोन 2200mAh च्या बॅटरीने सुसज्ज आहे.