How to: तुमचा स्मार्टफोन पुन्हा पुन्हा हँग होतोय? घरीच दुरुस्त करा, जाणून घ्या अगदी सोप्या Tips । Tech News

How to: तुमचा स्मार्टफोन पुन्हा पुन्हा हँग होतोय? घरीच दुरुस्त करा, जाणून घ्या अगदी सोप्या Tips । Tech News
HIGHLIGHTS

तुमचा स्मार्टफोन देखील पुन्हा पुन्हा हँग होत असेल तर, त्याची करणे आणि उपाय

फोन रीस्टार्ट केल्यावर फोनचा वेग सुधारतो आणि फोनचा परफॉर्मन्स चांगला होतो.

जर तुम्ही Android युजर असाल तर ऍप्स केवळ Google Play स्टोअरवरून डाउनलोड करा.

आजकाल प्रत्येकाच्या हातात स्मार्टफोन असतो, कारण सर्व कामे तुमच्या राहतात मावणाऱ्या या छोट्याशा डिव्हाइसवरच होतात. या डीवाईसची आता तुम्हाला इतकी सवय झाली आहे की, याशिवाय तुमचं बहुतेक प्रत्येक महत्त्वाचं काम अडून राहतं. बाजारात तुमच्या प्रत्येक गरजेनुसार हवे असलेल्या फीचर्सचे स्मार्टफोन्स उपलब्ध आहेत. पण, डिवाइस म्हटले की, काही समस्या येतंच असतात. त्यामधून महत्त्वाची आणि कॉमन समस्या म्हणजे फोन हँग होणे. तुमचा स्मार्टफोन देखील पुन्हा पुन्हा हँग होत असेल तर, त्याची करणे आणि उपाय जाणून घ्या. 

फोन सतत हँग का होतो? 

 तुमचा फोन अनेक कारणांमुळे हँग होऊ शकतो. उदाहरणार्थ, तुमच्या फोनची RAM कमी आहे आणि तुम्ही एकाधिक ऍप्स चालवत आहात. कॅशे फाइल्स फोनमध्ये स्टोअर झाल्या असतील किंवा फोन अपडेट केला गेला नसेल. यापैकी कोणतेही कारण असू शकते ज्यामुळे फोन हँग होतो. चला तर मग बघुयात फोन हँग होण्याच्या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी काही टिप्स. 

एकाच वेळी मल्टिपल Apps युज करू नका. 

तुम्ही तुमच्या फोनवर एकाच वेळी अनेक ऍप्स चालवत असाल तर तुम्ही ते टाळावे. विशेषत: जेव्हा तुमच्या फोनमध्ये RAM स्टोरेज कमी असते. असे केल्याने तुमच्या फोनच्या रॅमवर ​​अधिक ताण येतो आणि फोनच्या कार्यक्षमतेवर परिणाम होतो. 

सॉफ्टवेअर अपडेट ठेवा.

smartphone user

जर तुम्ही फोनची कॅशे फाइल डिलीट केली असेल आणि एकापेक्षा जास्त ऍप्स वापरत नसाल आणि तरीही फोन वारंवार वापरताना हँग होत असेल, तर तुम्हाला फोनचे सॉफ्टवेअर अपडेट करावे लागेल. अनेक वेळा फोनचे सॉफ्टवेअर अपडेट नसले तरी फोन हँग होऊ लागतो. यासोबतच तुम्ही तुमच्या फोनवर वापरत असलेली Apps  वेळोवेळी अपडेट करणे महत्त्वाचे आहे. 

थर्ड पार्टी स्टोअरमधून Apps डाउनलोड करू नका

बरेचद Google Play स्टोअर वरून ऍप डाउनलोड करण्याऐवजी, लोक कोणत्याही थर्ड पार्टी स्टोअरमधून ऍप डाउनलोड करतात. हे देखील फोन हँग होण्याचे महत्त्वाचे कारण आहे. हे अनधिकृत ऍप्स बरेच व्हायरस आणि मालवेअर आणतात आणि तुमचा फोन एक्सपेरियन्स खराब करतात. त्यामुळे जर तुम्ही Android युजर असाल तर ऍप्स केवळ Google Play स्टोअरवरून डाउनलोड करा. 

फोन रीस्टार्ट करा 

तुमच्या वापरासह फोनची कार्यक्षमता वेळोवेळी कमी होऊ लागते. यामुळे फोन हळू हळू हँग होऊ लागतो. फोन हँग होणार नाही याची खात्री करण्यासाठी, कॅशे फाइल्स वेळोवेळी डिलीट करणे, सॉफ्टवेअर आणि Apps अपडेट करणे, एकापेक्षा जास्त Apps चालवणे टाळणे यासारखे वरील उपाय केले पाहिजेत. 

त्याबरोबरच, फोनही वेळोवेळी रिस्टार्ट करावा. फोन रीस्टार्ट केल्यावर, फोनमध्ये साठवलेल्या तात्पुरत्या फाइल्स हटवल्या जातात आणि फोनचे मेमरी मॅनेजमेंट रीसेट केले जाते. फोनचा वेग सुधारतो आणि फोनचा परफॉर्मन्स चांगला होतो.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo