दिवाळी सेलमध्ये Samsung Galaxy A25 5G वर 6000 रुपयांचा Discount, सर्वोत्तम ऑफर्स उपलब्ध

Updated on 31-Oct-2024
HIGHLIGHTS

दिवाळीनिमित्त Samsung Galaxy A25 5G मोठ्या डिस्काउंटसह उपलब्ध

Samsung च्या या फोनवर 128GB व्हेरिएंटवर 9,124 रुपयांची पूर्ण सूट उपलब्ध

SBI क्रेडिट कार्डद्वारे पेमेंट केल्यास 10% म्हणजेच 1000 रुपयांची सूट

Samsung Galaxy A25 5G: साऊथ कोरियची टेक जायंट Samsung चे भारतीय बाजारात अनेक चाहते आहेत. मात्र, या ब्रँडच्या फोन्सच्या किमती अधिक असल्यामुळे ग्राहक बरेचदा इतर पर्याय बघतात. मात्र, दिवाळीनिमित्त Flipkart सेलमध्ये हे फोन्स स्वस्तात खरेदी करण्याची संधी आहे. होय, Samsung Galaxy A25 5G सध्या 6,000 रुपयांपेक्षा जास्त डिस्काउंटसह उपलब्ध आहे. कंपनीने हा फोन गेल्या वर्षी भारतात लाँच केला होता. यासह या फोनवर अनेक ऑफर्सचा वर्षाव देखील होतोय. जाणून घ्या ऑफर्स-

Also Read: Google Pay ची दिवाळीनिमित्त धमाकेदार ऑफर! तब्बल 1,001 कॅशबॅक जिंकण्याची संधी

Samsung Galaxy A25 5G ची किंमत आणि ऑफर्स

Samsung Galaxy A25 5G डिव्हाइसच्या 8GB RAM + 128GB व्हेरिएंटवर 9,124 रुपयांची पूर्ण सूट उपलब्ध आहे. हा फोन 26,999 रुपयांना लाँच करण्यात आला होता. मात्र, या डिस्काउंटसह डिव्हाइसची किंमत केवळ 17,875 रुपये झाली आहे. त्याचप्रमाणे, 8GB RAM + 256GB वेरिएंटची किमत 6,000 रुपयांच्या डिस्काउंटसह 23,990 रुपये आहे. हा फोन 29,999 रुपयांना लाँच करण्यात आला होता.

या फोनवर मोठ्या प्रमाणात ऑफर्स देखील उपलब्ध आहेत. SBI क्रेडिट कार्डवर 10% म्हणजेच 1,000 रुपयांपर्यंत सूट मिळेल. तसेच, Flipkart Axis Bank क्रेडिट कार्डद्वारे तुम्हाला 5% अतिरिक्त कॅशबॅक मिळेल. तसेच, तुमच्याकडे जुना किंवा विद्यमान फोन खरेदीसाठी उपलब्ध असेल तर, या फोनसह तुम्हाला एक्सचेंज ऑफर देखील मिळेल. येथून खरेदी करा

Samsung Galaxy A25 5G चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

Galaxy A25

Samsung Galaxy A25 5G मध्ये 6.5 इंच लांबीचा फुल HD+ सुपर AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी, फोनमध्ये Exynos 1280 octacore चिपसेट आहे, जो 5 नॅनोमीटर फॅब्रिकेशनवर तयार केला आहे. डिव्हाइस ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअपसह येतो. यात LED फ्लॅश, OIS सह 50MP प्राइमरी, 8MP अल्ट्रा वाइड आणि 2MP डेप्थ लेन्स आहे. तसेच, आकर्षक सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 13MP लेन्स आहे. ग्राहकांना 5,000mAh बॅटरी मिळेल, जी 25W फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीसह येईल.

डिस्क्लेमर: या स्टोरीमध्ये एफिलिएट लिंक्स उपलब्ध आहेत.

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :