लेटेस्ट Oppo F27 5G वर मिळतोय बंपर Discount! भारी ऑफर्सचा होतोय वर्षाव, पहा आकर्षक डील 

लेटेस्ट Oppo F27 5G वर मिळतोय बंपर Discount! भारी ऑफर्सचा होतोय वर्षाव, पहा आकर्षक डील 
HIGHLIGHTS

Oppo F27 5G वर सणासुदीनिमित्त भारी ऑफर्सचा वर्षाव

दिवाळी सेलमध्ये कंपनी या फोनवर 10% झटपट डिस्काउंट देत आहे.

ऑफर्स Oppo च्या अधिकृत वेबसाइट म्हणजेच Oppo Store वर उपलब्ध आहे.

अलीकडेच Oppo या प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता कंपनीने आपला नवीनतम फोन Oppo F27 5G भारतात लाँच केला. आम्ही तुम्हाला सांगतो की, दिवाळी सेलमध्ये कंपनी या फोनवर 10% झटपट डिस्काउंट देत आहे. एवढेच नाही तर, कंपनी दिवाळी सेल अंतर्गत इतर अनेक ऑफर्स देखील देत आहे. म्हणजेच, Oppo F27 5G वर सध्या ऑफर्सचा वर्षाव सुरु आहे.

तसेच, यावर नो कॉस्ट EMI, 10 रुपयांचा गिफ्ट बॉक्स खरेदी केल्यावर 50 हजार पॉइंट्स आणि सुपर कूपन इ. ऑफर Oppo च्या अधिकृत वेबसाइट म्हणजेच Oppo Store वर उपलब्ध आहे. चला तर मग जास्त वेळ न घालवता Oppo F27 5G ची किंमत आणि सर्व ऑफर्स-

OPPO F27 5G

Also Read: Infinix Zero Flip 5G Sale: लेटेस्ट फ्लिप स्मार्टफोनची भारतात आज पहिली सेल, मिळतील Best ऑफर्स

Oppo F27 5G ची किंमत

भारतात Oppo F27 5G फोनच्या 8GB+128GB व्हेरिएंटची किंमत 22,999 रुपये इतकी आहे. तर, फोनचा 8GB+256GB व्हेरिएंट 24,999 रुपयांना लाँच करण्यात आला आहे. तुमच्या माहितीनाही सांगतो की, सध्या Oppo स्टोअरवर OPPO F27 च्या 8GB+128GB व्हेरिएंटची किंमत 20,999 रुपये आणि 8GB+256GB व्हेरिएंटची किंमत 22,999 रुपये सूचिबद्ध करण्यात आली आहे.

Oppo F27 5G वरील ऑफर्स

Oppo F27 5G वर कंपनी फेडरल, ICICI, बँक ऑफ बडोदा, HDFC, OneCard, SBI, Axis, Yes Bank, IDFC First Bank, Kotak Mahindra Bank क्रेडिट आणि डेबिट कार्डद्वारे पेमेंट व्यवहार केल्यास 10% झटपट सूट देत आहे. 10% इन्स्टंटनुसार व्हेरिएंट्सवर सुमारे 2100 आणि 2300 रुपयांची सूट असेल. कंपनी बजाज नो कॉस्ट EMI वर 500 रुपयांपर्यंत कॅशबॅक देखील देत आहे. इतकेच नाही तर 10 रुपयांचा गिफ्ट बॉक्स खरेदी केल्यावर तुम्हाला 50000 पॉइंट्स आणि OPPO F27 5G मिळेल. याव्यतिरिक्त, 1700 रुपयांचे कूपन देखील उपलब्ध आहे. या सर्व ऑफर्स तुम्हाला Oppo India या अधिकृत साईटवर मिळतील.

Oppo F27 5G चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

OPPO F27 मध्ये 6.67-इंच लांबीचा FHD+ OLED डिस्प्ले देण्यात आला आहे, जो 120Hz रिफ्रेश रेटसह येतो. हा फोन MediaTek Dimensity 6300 चिपसेटसह कार्य करतो. स्टोरेज सेक्शनबद्दल बोलायचे झाल्यास, हा फोन 8GB विस्तारित रॅमसह 8GB LPDDR4X RAM आणि 128GB/256GB UFS 2.2 स्टोरेज पॅक करतो. मायक्रो SD कार्डद्वारे फोनची स्टोरेज वाढवता येईल. फोन आर्मर बॉडीसह येतो, IP64 डस्ट आणि वॉटर रेझिस्टन्स रेटिंग मिळाली आहे.

Oppo F27 5G features

फोटोग्राफीसाठी, OPPO F27 5G फोनमध्ये 50MP Omnivision OV50D प्राथमिक कॅमेरा आणि 2MP Omnivision OV02B1B पोर्ट्रेट कॅमेरा हॅलो लाइट मिळेल. तर, फोनच्या समोर 32MP Sony IMX615 सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. पॉवर बॅकअपसाठी, या बॅटरी OPPO F27 मध्ये 5000mAh बॅटरी आणि 45W SuperVOOC फास्ट चार्जिंग सपोर्ट आहे. फोनमधील इतर उपलब्ध फीचर्सबद्दल बोलायचे झाल्यास, कनेक्टिव्हिटीसाठी यात 5G, ड्युअल सिम, ब्लूटूथ 5.3, USB टाइप-सी पोर्ट, GPS इ. फीचर्स मिळतील.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo