दिवाळीला iPhone 15 Pro ची किंमत झाली कमी! येथे Apple च्या लोकप्रिय फोनवर मिळतोय जबरदस्त Discount

Updated on 25-Oct-2024
HIGHLIGHTS

Apple iPhone 15 Pro फोन प्रचंड मोठ्या सवलतीसह उपलब्ध आहे.

iPhone 15 Pro वर SBI क्रेडिट कार्डद्वारे पेमेंट व्यवहार केल्यास मोठी सूट

iPhone 15 Pro फोनमध्ये 48MP अल्ट्रा-वाइड अँगल प्राइमरी लेन्स आहे.

iPhone लव्हर्ससाठी एक अप्रतिम बातमी पुढे आली आहे. तुम्ही देखील iPhone 15 Pro या पॉप्युलर स्मार्टफोनवर डिस्काउंटची वाट पाहत असाल तर, तुम्ही अगदी योग्य ठिकाणी आहात. आम्ही तुम्हाला सांगतो की, दिवाळीच्या मुहूर्तावर नवीन आणि जुने Apple मोबाईल्स मोठ्या प्रमाणात सवलतीसह उपलब्ध आहेत. या रिपोर्टमध्ये आम्ही तुम्हाला सांगतो की, iPhone 15 Pro ची किंमतही खूप कमी झाली आहे. जाणून घेऊयात iPhone 15 Pro ची किंमत आणि सवलत-

Also Read: लेटेस्ट Oppo F27 5G वर मिळतोय बंपर Discount! भारी ऑफर्सचा होतोय वर्षाव, पहा आकर्षक डील

iPhone 15 Pro ची किंमत आणि ऑफर्स

मागील वर्षी iPhone 15 Pro भारतात 1 लाख 34 हजार 900 रुपयांना लाँच करण्यात आला होता. पण आता हा फोन फक्त 1,03,999 रुपयांना विक्रीसाठी उपलब्ध आहे. आम्ही तुम्हा सांगतो की, फोनवर वर 2,500 रुपयांची अतिरिक्त सूट देखील उपलब्ध आहे, त्यानंतर iPhone 15 Pro फोन 1,01,499 रुपयांना खरेदी करता येईल. Apple iPhone या ऑफरसह शॉपिंग साइट Flipkart वर उपलब्ध आहे.

2,500 रुपयांची सूट मिळविण्यासाठी, तुम्हाला SBI क्रेडिट कार्डद्वारे पेमेंट करावे लागेल. तसेच, वापरकर्ते हा फोन नो कॉस्ट EMI द्वारे देखील खरेदी करू शकतात. तसेच, तुमच्याकडे जुना किंवा विद्यमान फोन खरेदीसाठी उपलब्ध असल्यास, 41,050 एक्सचेंज ऑफरदेखील उपलब्ध आहे. मात्र, तुमच्या जुन्या फोनच्या मॉडेल आणि स्थितीवर एक्सचेंज व्हॅल्यू अवलंबून असेल. फ्लिपकार्ट वरून iPhone 15 Pro स्वस्तात खरेदी करा. Buy From Here

iPhone 15 Pro चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

iPhone 15 Pro मध्ये 6.1-इंच लांबीचा सुपर रेटिना XDR OLED डिस्प्ले आहे. डिस्प्लेची कमाल ब्राइटनेस 2,000 nits आहे आणि फोनला IP68 रेटिंग मिळाली आहे. स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी, या फोनमध्ये 3nm प्रक्रियेवर बनलेला A17 Bionic प्रोसेसर आहे. iPhone 15 Pro फोनमध्ये 48MP अल्ट्रा-वाइड अँगल प्राइमरी लेन्स आहे. यासोबतच 12MP चा अल्ट्रा वाइड अँगल लेन्स उपलब्ध आहे. तसेच, या फोनमधील तिसरा लेन्स 12MP चा आहे, जो एक टेलीफोटो लेन्स आहे आणि त्यासोबत 3x झूम उपलब्ध आहे. पॉवर बॅकअपसाठी, या फोनमध्ये 3274mAh बॅटरी देण्यात आली आहे.

डिस्क्लेमर: या आर्टिकलमध्ये एफिलिएट लिंक्स आहेत.

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :