लवकरच लॉन्च होणार्या या एंड्राइड फोन्स मध्ये असू शकतो नॉच डिस्प्ले
या स्मार्टफोन्स मध्ये OnePlus 6, LG G7 ThinQ आणि Xiaomi Mi 7 सामील आहेत.
दरवर्षी स्मार्टफोन बाजारात एक नवीन ट्रेंड बघायला मिळतो, तो मग डुअल कॅमेरा असो, बेजल-लेस डिस्प्ले असो किंवा मग ट्रेंडिंग नॉच डिस्प्ले. Apple iPhone X मधील नॉच डिस्प्ले ट्रेंड आता हळू हळू इतर एंड्राइड फोन निर्माता कंपन्या आजमावत आहेत. भारतात काही दिवसांपूर्वी लॉन्च झालेल्या Vivo V9 मध्ये नॉच डिस्प्ले डिस्प्ले दिसला होता. Vivo V9 भारतातील पहिला असा एंड्राइड स्मार्टफोन लॉन्च झाला आहे ज्यात नॉच (Notch) डिस्प्ले आहे.
आम्ही या आर्टिकल मध्ये अशाच काह आगामी एंड्राइड स्मार्टफोन्स बद्दल बोलणार आहोत जे नॉच डिस्प्ले सह सादर केले जाऊ शकतात. पण अजून याबद्दल काही स्पष्ट झाले नाही की या स्मार्टफोन्स मध्ये नॉच डिस्प्ले असेल की नाही. पण मागच्या काही काळात येत असलेल्या लीक्स आणि रुमर्स च्या आधारावर आम्ही या फोन्स बद्दल बोलत आहोत.
OnePlus 6:
या फोन OnePlus 6 बद्दल बोलायचे झाले तर मागच्या आठवड्यापासून या फ्लॅगशिप डिवाइस बद्दल अनेक लीक्स आणि रुमर्स आल्या आहेत ज्यात याच्या नॉच डिस्प्ले चा खुलासा झाला आहे. OnePlus 6 स्मार्टफोन ची भारतातील किंमत समोर आली आहे. True Tech च्या माध्यमातून आलेल्या माहितीनुसार OnePlus 6 स्मार्टफोन ची भारतातील सुरुवाती किंमत Rs 33,999 असू शकते. मागच्या महिन्यात कंपनी चे को-फाउंडर कार्ल पाई ने OnePlus 6 स्मार्टफोन ch एक अधिकृत फोटो टीज केला होता ज्यातून याच्या नॉच डिस्प्ले चा खुलासा झाला होता.
आशा केली जात आहे की OnePlus 6 मध्ये एक मोठा डिस्प्ले असेल जो हाय स्क्रीन-टू-बॉडी रेश्यो सह येऊ शकतो आणि या डिवाइस वर ऑनस्क्रीन जेस्चर एक उत्तम नेविगेशन चा अनुभव देतील. OnePlus 6 मध्ये notch असेल पण कंपनी ने स्पष्ट केले आहे की ही लपवता येऊ शकते. OnePlus 6 बद्दल अधिकृतपणे समोर आले आहे की या स्मार्टफोन मध्ये स्नॅपड्रॅगन 845 चिपसेट, 8GB रॅम आणि 256GB स्टोरेज असेल. कंपनी चा हा फ्लॅगशिप स्मार्टफोन या महिन्याच्या अखेरीस लॉन्च होण्याची शक्यता आहे.
LG G7 ThinQ:
LG G7 ThinQ स्मार्टफोन्स पुढच्या महिन्यात म्हणजे 2 मे ला न्यू यॉर्क मध्ये लॉन्च केले जाऊ शकतात. LG च्या या डिवाइस बद्दल रुमर्स पाहता हा डिवाइस नॉच डिस्प्ले ऑफर करेल आणि याचा डिस्प्ले स्क्रीन-टू-बॉडी रेश्यो ऑफर करेल. या डिवाइस च्या अन्य स्पेसिफिकेशन्स बद्दल बोलायचे झाले तर या स्मार्टफोन मध्ये स्नॅपड्रॅगन 845, 4GB रॅम आणि 64GB बिल्ट-इन स्टोरेज असेल. त्याचबरोबर या डिवाइस चा 6GB रॅम वेरिएंट पण सादर केला जाऊ शकतो. तसेच रुमर्स नुसार या डिवाइस मध्ये स्नॅपड्रॅगन 845 आणि AI फीचर असेल.
त्याचबरोबर, डिवाइस मध्ये डेडिकेटेड AI बटन पण असेल. पण अजून हे समोर आले नाही की या डिवाइस मधील AI बटन Google Assistant लॉन्च करेल की LG चा AI. हे पण समजायचे बाकी आहे की या बटनचा वापर बदलता येईल की नाही ते.
हमें Instagram पर फॉलो करने के लिये यहां क्लिक करें
हमें YouTube पर सब्सक्राइब करने के लिये यहां क्लिक करें
Xiaomi Mi 7:Xiaomi च्या Mi 7 स्मार्टफोन ची खुप आतुरतेने लोक वाट बघत आहेत. या स्मार्टफोन बद्दल नवीन लीक समोर आला होता ज्यातून समजले होते की या डिवाइस मध्ये नॉच डिस्प्ले असेल आणि सोबतच या डिवाइस मध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर असेल. जर असे झाले तर हा OnePlus 6 पेक्षाही जास्त उत्साहित करणारा डिवाइस आहे असे आपण म्हणू शकतो. हा डिवाइस कंपनी MIUI ची नवीन आवृत्ती म्हणजे MIUI 9.5 सह सादर केला जाऊ शकतो. त्याचबरोबर हा स्मार्टफोन एंड्राइड 8.1 Oreo सह येईल.
या डिवाइस मधील काही स्पेक्स बद्दल बोलायचे झाले तर असा अंदाज लावला जात आहे की हा स्मार्टफोन एका 6.01-इंचाच्या FHD+ डिस्प्ले 2160×1080 पिक्सल रेजोल्यूशन सह लॉन्च केला जाऊ शकतो. तसेच फोन मध्ये तुम्हाला क्वालकॉम कडून त्यांचा लेटेस्ट प्रोसेसर म्हणजे स्नॅपड्रॅगन 845 मिळू शकतो. सोबतच फोन 6GB/8GB रॅम सह लॉन्च केला जाऊ शकतो.