आज अॅप्पल कॅलिफोर्निया मध्ये आयोजित इवेंट मध्ये आपल्या नवीन iPhones ची लाइनअप लॉन्च करण्यासाठी तयार आहे आणि सोबतच कंपनी काही नवीन प्रोडक्ट्स पण लॉन्च करेल. जर तुम्ही अॅप्पल फॅन असाल तर तुम्हाल हा इवेंट मिस करायाचा नसेल. गेल्यावर्षी प्रमाणे कंपनी Cupertino California येथील स्टीव जॉब्स थिएटर मध्ये इवेंट चे आयोजन करेल. हा इवेंट 10:00AM PDT, म्हणजे भारतात रात्री 10:30 वाजता सुरू होईल.
https://twitter.com/Apple/status/1039158183292559361?ref_src=twsrc%5Etfw
ज्या यूजर्सना लाइव इवेंट बघायचा आहे ते अॅप्पल च्या अधिकृत वेबसाइट वर जाऊ शकतात. कंपनी यावर्षी ट्विटर वर पण इवेंट चे लाइव स्ट्रीमिंग करेल.
या वर्षी अॅप्पल चा इवेंट खुप मोठा असणार आहे. गेल्या काही महिन्यांपासून बातम्या येत आहेत की या वर्षी कंपनी तीन आयफोन लॉन्च करेल. लीक्स नुसार, या तीन फोन्सची नावे iPhone XS, iPhone XS Max आणि iPhone XR/ iPhone 9 अशी असतील. या फोन्सना गेल्या वर्षीच्या iPhone X प्रमाणे डिजाइन देण्यात येईल, तसेच iPhone XS आणि iPhone XS Max मध्ये OLED स्क्रीन असेल. iPhone XS मध्ये 5.8 इंचाचा डिस्प्ले आहे, तसेच iPhone XS Max 6.5 इंचाच्या डिस्प्ले सह येईल आणि तिसरा iPhone 6.1 इंचाच्या LCD स्क्रीन सह येईल आणि हा स्वस्तातला वेरिएंट असेल.
नवीन iPhones सोबतच आशा व्यक्त केली जात आहे की Apple Watch Series 4 पण लॉन्च केली जाईल, जी मोठी स्क्रीन आणि काही नवीन हेल्थ मोनिटरिंग फीचर्स सह येईल. अॅप्पल चे नवीन वायरलेस चार्जिंग एयरपॉड्स पण एयरपॉवर चार्जिंग मेट सह लॉन्च केले जाऊ शकतात. त्याचबरोबर अॅप्पल नवीन बेजललेस आयपॅड प्रो लाइनअप स्वस्त मॅकबुक सोबत लॉन्च करू शकते. पण, या डिवाइसेज बद्दल या पेक्षा जास्त माहिती अजूनतरी समोर आलेली नाही.