जानेवारी एंड्रॉयड सिक्योरिटी पॅच नोकिया ने आपल्या Nokia 6.1 Plus आणि Nokia 8 मॉडेल्स वर अपडेट करायला सुरवात केली आहे. त्याचबरोबर हा सॉफ्टवेयर अपडेट भारतासह ईराण आणि नेदरलँड्स मध्ये पण मिळायला सुरवात झाली आहे.
खास अपडेट:
जानेवारी 2019 एंड्रॉयड सिक्योरिटी पॅच सह येतो
भारतात मिळत आहे अपडेट
Nokia 5 ला गेल्या आठवड्यात मिळाला हा अपडेट
नोकियाच्या Nokia 5 ला गेल्याच आठवड्यात जानेवारी सिक्योरिटी पॅच मिळाला होता तर आता पुन्हा एकदा नोकियाच्या दोन नवीन मॉडेल्सला पण सॉफ्टवेयर अपडेट मिळायला सुरवात झाली आहे. यूजर रिपोर्ट्सनुसार Nokia 6.1 Plus आणि Nokia 8 ला कंपनी ने नवीन सॉफ्टवेयर अपडेट उपलब्ध केला आहे ज्या अंतर्गत जानेवारी 2019 एंड्रॉयड सिक्योरिटी पॅच यूजर्ससाठी उपलब्ध आहे. विशेष म्हणजे अनेक यूजर्सनी असा दावा केला आहे कि हा अपडेट जानेवारी 2019 च्या सिक्योरिटी पॅच सह येतो.
फेज मध्ये हा अपडेट रिलीज केला जात आहे. विशेष म्हणजे HMD Global ने काही दिवसांपूर्वी Nokia 5 साठी जानेवारी 2019 चा सिक्योरिटी पॅच अपडेट जारी केला होता. Nokia 6.1 Plus आणि Nokia 8 ला याआधी गेल्या काही दिवसांत एंड्रॉयड Pie चा अपडेट मिळाला होता. या अपडेटच्या माध्यमातून नोकिया 6.1 प्लस ला प्रो कॅमेरा मोड देण्यात आला आहे. सोबतच यूजर्सना अशी सुविधा पण देण्यात आली आहे कि ते डिस्प्ले नॉच लपवू शकतात.
NokiaPowerUser च्या रिपोर्ट्सनुसार Nokia 6.1 Plus आणि Nokia 8 ला नवीन सॉफ्टवेयर अपडेट मिळायला सुरवात झाली आहे. विशेष म्हणजे Nokia 6.1 Plus साठी जारी करण्यात आलेल्या अपडेट ची साईझ 60.9MB आहे आणि तर Nokia 8 चा अपडेट 78.5MB चा आहे. Nokia 6.1 Plus किंवा Nokia 8 यूजर्स आपल्या फोनच्या सेटिंग्स मध्ये जाऊन अपडेट चेक करू शकतात.
महत्वाचे म्हणजे HMD Global ने नोकिया 5 साठी जानेवारी 2019 चा एंड्रॉयड सिक्योरिटी पॅच आधीच रिलीज केला आहे तसेच हा सिक्योरिटी पॅच Nokia 5.1 Plus, Nokia 8.1 आणि Nokia 8 Sirocco मध्ये पण मिळाल्याचे समोर आले आहे.