अगदी स्वस्त दरात मिळतायेत हे ‘5’ जबरदस्त स्मार्टफोन्स, बघा यादी

अगदी स्वस्त दरात मिळतायेत हे ‘5’ जबरदस्त स्मार्टफोन्स, बघा यादी
HIGHLIGHTS

Amazon वर Amazon Fab Phones Fest Sale सुरू.

Redmi, Vivo यांसारखे ब्रँडवर भारी सूट.

स्मार्टफोन्सवर प्रचंड सवलत, एक्सचेंज आणि बँकिंग ऑफर.

ऑनलाईन शॉपिंग प्लॅटफॉर्म Amazon स्वस्त ते प्रीमियम सेगमेंटमधील स्मार्टफोन्सवर प्रचंड सवलत, एक्सचेंज आणि बँकिंग ऑफर देत आहे. जर तुम्ही उत्तम ऑफरसह नवीन फोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही संधी खास तुमच्यासाठी आहे. Redmi, Vivo सह अनेक ब्रँडेड फोन मोठ्या सवलतीसह साइटवर उपलब्ध आहेत. खरं तर, ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर Amazon Fab Phones Fest Sale सुरू आहे आणि आज सेलचा शेवटचा दिवस आहे. 
जर तुमचे बजेट सुमारे 20,000 रुपये असेल, तर तुमच्या सोयीसाठी आम्ही 5 स्मार्टफोन्सची यादी तयार केली आहे. या यादीत Redmi, Vivo यांसारख्या सर्व ब्रँडचा समावेश आहे. चला तर बघुयात स्मार्टफोन्सची यादी…

1. Redmi Note 11S 

Redmi Note 11S चा 6GB RAM आणि 128GB स्टोरेज व्हेरिएंट Amazon वर 17 % सवलतीसह केवळ 17,499 रुपयांमध्ये उपलब्ध आहे. एक्सचेंजमधून खरेदी केल्यास, फोनची किंमत आणखी 10,550 रुपयांनी कमी केली जाऊ शकते. मात्र, यासाठी तुमचा जुना किंवा आताचा फोन चांगल्या स्थितीमध्ये हवा. Amazon या फोनच्या खरेदीवर सुमारे 10 बँकिंग डील देखील ऑफर करत आहे.

2. Vivo Y33T

Vivo Y33T चे 8GB RAM आणि 128GB स्टोरेज व्हेरिएंट Amazon वर 22 % सवलतीसह फक्त 17,990 रुपयांना उपलब्ध आहे. म्हणजेच, डिस्काउंट ऑफरच्या मदतीने तुम्हाला फोनवर 5000 रुपयांची बचत करता येईल, कारण फोनची किंमत 22,990 रुपये आहे. एक्सचेंजमधून खरेदी केल्यास, फोनची किंमत आणखी 10,450 रुपयांनी कमी केली जाऊ शकते. मात्र, यासाठी तुमचा जुना किंवा आताचा फोन चांगल्या स्थितीमध्ये हवा. Amazon या फोनवर विविध बँकिंग ऑफर देखील देते, ज्या वेबसाइटवर जाऊन तपासता येतील.

3. Redmi Note 10 Pro 

Redmi Note 10 Pro चे 6GB RAM आणि 128GB स्टोरेज व्हेरिएंट देखील Amazon वर 20 % सवलतीसह फक्त 15,999 रुपयांमध्ये उपलब्ध आहे. एक्स्चेंजवरून खरेदी केल्यास फोनची किंमत 10,550 रुपयांपर्यंत कमी केली जाऊ शकते. या फोनवर अनेक बँकिंग डील देखील उपलब्ध आहेत.

4. Oppo A74 5G 

Oppo A74 5G चा 6GB रॅम आणि 128GB स्टोरेज व्हेरिएंट Amazon वर 26% सवलतीसह फक्त 15,490 रुपयांमध्ये उपलब्ध आहे. एक्सचेंजवर खरेदी केल्यावर फोनची किंमत आणखी 10,550 रुपयांनी कमी केली जाऊ शकते. फोनवर पाच बँकिंग डील्स उपलब्ध आहेत.

5. iQOO Z6 

iQOO Z6 चा 4GB RAM आणि 128GB स्टोरेज व्हेरिएंट Amazon वर 28% सवलतीसह फक्त 14,499 रुपयांमध्ये खरेदीसाठी उपलब्ध आहे. मात्र, एक्सचेंजवर खरेदी केल्यास फोनची किंमत आणखी 11,550 रुपयांनी कमी केली जाऊ शकते. यासाठी तुमचा जुना किंवा आताच फोन चांगल्या स्थितीमध्ये हवा. फोनवर 7 बँकिंग डील्स देखील उपलब्ध आहेत.

 

 

 

 

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo