मोटोरोलाने भारतात लवकरच मोटो X फोर्स लाँच करण्याचे दिले संकेत

Updated on 20-Jan-2016
HIGHLIGHTS

मोटोरोला आपल्या कधीही न तुटणा-या शटरप्रुफ डिस्प्लेसह आपला मोटो X फोर्स लवकरच भारतात लाँच करणार आहे. मोटोरोलाने ट्विट करुन ही माहिती दिली आहे.

मोटोरोलाने कधीही न तुटणारी शटरप्रुफ डिस्प्लेसह आपला एक खास स्मार्टफोन निर्मित केला आहे. हा स्मार्टफोन लवकरच भारतात लाँच करणार आहे. ह्याविषयी मोटोरोलाने ट्विट केले आहे, ज्यात असे सांगितले गेले आहे की, ह्या स्मार्टफोनला लवकरच भारतात लाँच करणार असल्याचे संकेत दिले आहेत.

 

मोटोरोलाने ह्या स्मार्टफोनला मागील वर्षी २०१५ मध्ये लाँच केले होते, मात्र त्यावेळी ह्याला भारतात लाँच करण्यात आले नव्हते. हा स्मार्टफोन अलीकडेच लाँच झालेल्या मोटोरोला ड्रोइड टर्बो 2 चे आंतरराष्ट्रीय रुपये आहे. मोटोरोलाने असे सांगितले आहे की, ह्या स्मार्टफोनला आता UK सह लॅटिन अमेरिका, EMEA आणि APAC मध्ये लाँच केले गेले आहे.

 

मोटोरोलाने आपल्या युकेच्या ब्लॉगवर घोषणा करताना असे सांगितले आहे की, ह्याच्या 32GB च्या प्रकाराची किंमत GBP 499 (जवळपास ४९,९०० रुपये) आणि 64GB प्रकाराची किंमत GBP 534(जवळपास ५३,४०० रुपये) ठेवण्यात आली आहे.

ह्या स्मार्टफोनमध्ये 5.4 इंचाची QHD 1440×2560 पिक्सेलची डिस्प्ले दिली गेली आहे आणि कंपनीचा दावा आहे की, ह्याची डिस्प्ले Shatterproof आहे, ज्याला तोडले जाऊ शकत नाही. ह्याचाच अर्थ ह्या डिस्प्लेला कितीही उंचावरुन फेका, तो तुटणार नाही. ह्या डिस्प्लेला रिजिड कोरने बनवले आहे. हा फ्लेक्सिबल AMOLED स्क्रीन आणि ड्यूल लेयर टचस्क्रीन पॅनलने बनवली आहे. त्याचबरोबर हा स्मार्टफोन वॉटर-रिपेलेंट नॅनो कोटिंगसह येतो.

स्मार्टफोनमध्ये क्वाल-कॉम स्नॅपड्रॅगन ८१० ऑक्टा-कोर प्रोसेसर दिला गेला आहे, जो 2Ghz ची गती देतो. त्याचबरोबर ह्यात आपल्याला 3GB ची LPDDR4 रॅम मिळत आहे. हा स्मार्टफोन आपल्याला 32GB आणि 64GB च्या प्रकारात मिळेल. आणि प्रकारांना मायक्रो-एसडी कार्डच्या साहाय्याने 2TB पर्यंत वाढवू शकतो. स्मार्टफोनमध्ये 3760mAh क्षमतेची बॅटरी दिली गेली आहे. आणि कंपनीचा दावा आहे की, स्मार्टफोनमध्ये दिली गेलेली बॅटरी मिक्स वापरल्यावरसुद्धा २ दिवसाचा बॅटरी बॅकअप देते आणि बॅटरी क्विक चार्जला सपोर्ट करते.

Ashvani Kumar

Ashvani Kumar is Tech, Politics, and Sports lover.

Connect On :